Thursday, July 2, 2015

ग्रामीण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे रायपुर येथे कृषिदिन साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्याक्रमातंर्गत अखिल भारतीय सन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पात कार्यरत असलेल्‍या कृषिदुतांनी दि १ जुलै रोजी मौजे रायपुर येथे कै वसंतराव नाईक यांच्‍या १०२ व्‍या जयंतीनिमित्‍त कृषिदिन साजरा केला. प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच श्री मस्‍के, डॉ ए एस कडाळे, डॉ आर बी पवार, डॉ यु एन कराड, श्री दिवाकर काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी खरीप पिक व्‍यवस्‍थापन व कृषि हवामान सल्‍लाचे महत्‍व सांगितले तर डॉ ए एस कडाळे, डॉ आर बी पवार व प्रा यु एन कराड यांनी विविध कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी रायपुर येथील शालेय विद्यार्थी, शेतकरी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, कृषिदुत व कृषिकन्‍या गावात वृक्षदिंडी काढुन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्‍यात आली तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवेच हवामानशास्त्र पत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत विशाल राठोड यांनी केले. यावेळी शेतकरी, शालेय विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिदुत दत्‍ता पांचाळ, चंद्रकांत मुदिराज, आकाश खिस्‍ते, प्रतिक पठाडे, भारत खिलबाडे, आनंद शेटे, कुमार पानझडे आदींनी परिश्रम घेतले.