वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या
परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या शाखेतील घाणा देशातील विद्यार्थी
केटेकु अ्रगबेसी क्वाडझो यांने डॉ व्ही एन नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मका
पीकावर संशोधन करून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण केला. त्यास कुलगुरू मा डॉ
बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते दि ४ जुलै रोजी पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु म्हणाले की, विद्यापीठातील केलेल्या संशोधनाचा
उपयोग घाणा देशातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी करावा व हेच विद्यापीठाच्या दृष्टीने
मोठे योगदान ठरेल, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यास दिला. यावेळी शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव,
प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ व्ही एन नारखेडे आदी उपस्थित होते.