वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्याक्रमातंर्गत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प येथे कार्यरत असलेल्या
कृषिकन्यांनी दि १ जुलै रोजी मौजे बाभुळगांव येथे कै वसंतराव नाईक यांच्या १०२
व्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा केला. याप्रसंगी बाभुळगांवचे प्रगतशील शेतकरी
विठ्ठलराव पारधे, कार्यक्रमाधिकारी डॉ जयश्री एकाळे, डॉ मेधा सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पारधे,
गणपतराव दळवे, मुजांजी पारधे, गिरीश पारधे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गावात
पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात येऊन वृक्षरोपण करण्यात
आले. डॉ जयश्री एकाळे यांनी कोरडवाहू पिकांच्या पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल
मार्गदर्शन केले. तसेच कृषिकन्या उर्मिला दराडे हीने विहीर व कुपनलिका पाणी
पुर्नभरण या विषयी तर कृषिकन्या अनुजा भोसकर हिने कापुस पिकात पाणी व तण व्यवस्थापनाबद्दल
शेतक-यांना माहिती दिली. यावेळी अनुराधा बुचाले हिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
केले.