वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या ऊती
संवर्धन प्रकल्प, परभणी येथे ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) निर्मिती केली जाते. सदरील
प्रकल्पात अर्धापुरी व ग्रँडनाईन जातीची ऊती संवर्धित रोपांची विक्री केली जाते. या ऊती संवर्धित
रोपांची प्रत उच्च दर्जाची असुन दरवर्षी शेतकरी वर्गाकडुन दोन्हीही जातीची भरपुर
मागणी असते व प्रकल्पाकडुन शेतकर्यांना पूर्वनोंदणी करूनच पुरवठा / विक्री केली
जाते. सध्या या प्रकल्पात चाळीस हजार अर्धापुरी व दहा हजार ग्रँडनाईन जातीची रोपे विक्रीसाठी
उपलब्ध आहेत. अर्धापुरी जातीच्या रोपांची वैशिष्टय म्हणजे सदरील रोपे कमी उंचीची,
मजबूत खोडाची व वादळवार्याला प्रतिरोधक आहेत. शेतकरी बंधुनी रोपे उपलब्धतेसाठी
प्रभारी
अधिकारी, ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी दुरध्वनी (०२४५२) २२८९३३ मोबाईल क्रमांक ९८५००९०३१० यांच्याशी संपर्क साधवा.