वनामकृवी अग्रीकोस १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य
उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत
असलेल्या कृषि महाविद्यालयाच्या १९८५ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे दरवर्षी
संमेलन होत असते व त्यात यावर्षी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या व गरजु सहका-यांच्या
कुटुंबीयांना मदत करण्याचे निश्चित करण्यात आले असुन मराठवाड्यातील आठ
जिल्ह्यातून प्रत्येकी एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियास आर्थिक मदत केली
आहे. तसेच गरजु सहाक-यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली. याच उपक्रमातंर्गत परभणी
जिल्हातील मानवत तालुक्यातील मौजे शेवडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या
कुटुंबीयांना १५०००/- चा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. नुकतेच एका
कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्या हस्ते आत्महत्या केलेले
शेतकरी स्व माऊली रापतवाड यांच्या पत्नी श्रीमती वैशाली माऊली रापतवाड यांना
धनादेश देण्यात आला. याप्रसंगी भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष
डॉ. चारुदत्त मायी, शिक्षण संचालक डॉ. अशोक
ढवन, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव,
प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले,
प्राचार्य डॉ. विलास पाटील,
विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
तसेच या माजी विद्यार्थ्यानी
त्यांच्या सहकारी मित्र चांदणी (पिंपळेवाडी) (ता.
परांडा, जि. उस्मानाबाद)
येथील स्व. प्रा. हरीचंद्र पवार यांच्या कुटुंबियांस रुपये एक लक्ष दहा हजाराची आर्थिक
मदत केली. मान्यवरांच्या हस्ते श्रीमती प्रतिभा हरीचंद्र पवार यांना आर्थिक मदत
धनादेशाद्वारे देण्यात आली. याप्रसंगी ५०००/- रुपयाचा धनादेश कुलगुरू मा डॉ. बी.
वेंकटेश्वरलू यांनी व रुपये ५०००/- चा धनादेश अधिष्ठाता डॉ. अशोक ढवन यांनी मदत
म्हणून दिला. या उपक्रमातून आत्तापर्यंत श्रीमती सुनिता देवराव टोपारे यांना रुपये
एकावन्न हजार व श्रीमती सुनिता संजय सोनवणे यांना रुपये एक लक्ष एक हजारची आर्थिक
मदत या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.
परिस्थितीमुळे असहाय्य झालेल्यांच्या
मदतीसाठी समाजातल्या मंडळींनीच पुढे येणे गरजेचे असुन समाज आपल्या पाठिशी असलेच्या
भावनेमुळे अशांना उभारी मिळू शकते,
त्यामुळे समाजाचे ऋण मानून मदतीसाठी पुढे येणार्या या वनामकृवीच्या माजी
विद्यार्थ्यांचा उपक्रम आत्मिक बळ देणारे आहेत,
असे उद्गार याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी काढले. या
उपक्रमासाठी विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे,
विकास टाचले, प्रशांत सीरस,
श्रीपति डुकरे, बाबुलाल शिंदे,
रविंद्र जाधव, प्रकाश देशमुख,
राजेश्वर पाटील, भास्कर आगळे,
रविंद्र भोसले, देवीदास पालोद्कर,
संजय मिरजकर आदींनी पुढाकार घेतला.
सहकारी मित्र चांदणी (पिंपळेवाडी) (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथील स्व. प्रा. हरीचंद्र पवार यांच्या कुटुंबियांस रुपये एक लक्ष दहा हजाराची आर्थिक मदत देतांना |