वनामकृविच्या संघाने सर्वसाधारण उपविजेतेपदासह पटकावीले तीन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य पदके
कोंईबतुर
येथील
तामीळनाडू
कृषि विद्यापीठात
२२ ते
२६
फेब्रुवारी
दरम्यान
आयोजित
अखिल
भारतीय आंतर
कृषि विद्यापीठ स्पर्धेत
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
३९
विद्यार्थ्यानी
विविध क्रीडा प्रकारात
सहभाग
नोंदविला.
सदर
स्पर्धेमध्ये वनामकृविच्या
हॉलीबॉल मुलींच्या संघाने
चुरशीच्या
सामन्यात
बँगलोर कृषि
विद्यापीठाच्या संघाचा पराभव
करत सुवर्ण
पदक
मिळविले तर
ॲथेलेटीक्स
क्रिडा प्रकारात वनामकृविच्या
संघास दोन सुवर्ण,
दोन
रौप्य
व दोन
कांस्य
पदके
प्राप्त
केली.
स्पर्धेत
सर्वसाधारण
विजेतेपद बँगलोर कृषि
विद्यापीठाने
पटकावीले तर उपविजतेपद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ परभणीच्या संघाने
पटकावीले.
विद्यापीठ
संघाच्या
या उत्कृष्ट प्रदर्शनाबददल
कुलगुरू
मा.
डॉ
बी
व्यंकटेश्वरलु,
शिक्षण
संचालक डॉ.
अशोक
ढवण
व
विद्यार्थी कल्याण अधिकारी
डॉ महेश देशमुख यांनी
अभिनंदन
केले.
सदर
संघाचे
संघ
व्यवस्थापक म्हणुन डॉ आशा
देशमुख,
प्रा.
डि.
एफ.
राठोड
व प्रा.
एस.
यु.
चव्हाण
यांनी काम पाहिले.