वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने कृषी शिक्षण
दिनाचे औचित्य साधुन माध्यामिक शालेय विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय वक्तृत्व
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हातील पाच शाळेतील
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात कु. वसुंधरा जाधव हीने प्रथम, कु. साक्षी
आसेवार हीने व्दितीय तर कु. सुरेखा माने हीने तृतीय क्रमांक पटकविला. कु. गायत्री
कुलकर्णी हीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण
कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी
प्राचार्य डॉ डि एन गोखले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अण्णासाहेब शिंदे, डॉ पी आर
झंवर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. मार्गदर्शनात कुलगुरू मा.
डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी शालेय मुलांमध्ये कृषि व कृषि शिक्षणाबाबत जनजागृती करण्याची
गरज असल्याचे सांगितले. सदरिल
स्पर्धेचे आयोजन भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या सुचनेवर करण्यात
आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर
आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.