वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल
भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प अंतर्गत पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या वतीने
कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे औचित्य साधुन दिनांक 23 फेब्रूवारी रोजी सकाळी 11.00
वाजता सुधारीत कृषि अवजारे व अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिक
कार्यक्रमाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जवळील ऊर्जा
उद्यानात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते करण्यात होणार आहे. कार्यक्रमास परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री
पी शिवा शंकर यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लाभणार असुन संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्छवे आदींची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात ट्रॅक्टर चलित विविध कंपन्याचे अवजारे, सौरचलित
अवजारे, सुधारित बैलचलित अवजारे आदींचे प्रदर्शन व प्रात्याक्षिके दाखविण्यात
येणार असुन यावर चर्चासत्रही होणार आहे. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या संशोधन
अभियंता प्रा. स्मिता एन सोलंकी यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी
या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.