वनामकृवित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्य अधिकारी डॉ सुब्बाराव व योगशिक्षक प्रा.दिवाकरजोशी यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्या प्रात्यक्षिके करण्यात आली. शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विलास पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मागदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्हणाले की, योगा ही जगाला दिलेली भारतीय संस्कृतीची मोठी देण असुन समाजाचे तन व मन निरोगी राहण्यासाठी योग व प्राणायाम प्रत्येकांनी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले. यावेळी उत्कृष्ट योग व आसन केल्याबाबत निवड अधिकारी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी - विद्यार्थ्यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.