कोरडवाहु भागात मध्यम
ते हलक्या जमिनीवर घेता येऊ शकते उत्तमरित्या सिताफळाची फळशेती
सौजन्य: डॉ. गोविंद मुंडे, प्रभारी अधिकारी, सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात यावषीं सीताफळाची 60 हजार दर्जेदार कलम केलेली रोपे
तयार करण्यात आली असुन हि रोपे प्रती कलम रूपये 40 दराने उपलब्ध
करण्यात आले आहेत. यात विविध प्रकारची वाण असुन बालानगर, धारुर 6, टी.पी. 7, लाल सीताफळ आदींचा समावेश आहे. ही रोपे दर्जेदार असल्यामुळे चांगली
फळधारणा अधिक उत्पादन मिळते, ही रोपे कलम केलेली असल्याने तीन वर्षात फळधारण होते. सीताफळ
हे कोरडवाहु फळपीक म्हणुन मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये 15 जूलै ते 15 ऑगस्ट दरम्यान लागवड
करता येते. सीताफळाची फळशेती करण्यासाठी शासनाकडुन अनुदानही मिळते, हे अनुदान तीन
टप्यात तीन वर्षामध्ये देण्यात येते. सीताफळास हंगामामध्ये चांगला बाजारभाव मिळतो. कोरडवाहु शेतकऱ्यांना सिताफळाची फळशेती अर्थप्राप्तीचे एक चांगले स्त्रोत होऊ शकते, अशी माहिती
सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ गोविंद मुंडे यांनी दिली.
सौजन्य: डॉ. गोविंद मुंडे, प्रभारी अधिकारी, सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई