विद्यापीठाच्या
वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
असेलल्या उस्मानबाद येथील
कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्यी
ऋषिकेश साहेबराव एंगडे यांचे
दिनांक 5
सप्टेबर
रोजी उस्मानाबाद येथे एका
अज्ञात वाहनाच्या धडकेने
अपघात झाला,
त्यात
तो गंभीर जखमी झाला.
त्यास
प्रथम उस्मानाबाद येथील
हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात
आले,
नंतर
त्यास सोलापुर येथील रूग्णालयात
दाखल करण्यात आले.
प्रकृती
गंभीर बनत होती,
तज्ञ
डॉक्टरांनी ऋषिकेश यांचा
मेंदुमृत झाल्याचे घोषित
केले.
सोलापुर
येथील डॉक्टरांनी नातेवाइकांचे
अवयवदान करण्याच्या दृष्टीने
समुपदेशन केले.
यावेळी
ऋषिकेशचे वडील साहेबराव एंगडे,
मामा
रोहीत गाडे,
प्रा.
के
एस गाडे व संपुर्ण परिवारांनी
अवयवदानाचा निर्णय घेतला.
त्यानुसार
त्याचे दोन डोळयाचे रेटिना,
किडनी,
लिव्हर
आदी अवयवदान करून विविध शहरातील
रूग्नांना देण्यात आले,
यामुळे
पाच रूग्नांना हे अवयव उपयोगात
आले.
दिनांक
9
सप्टेबर
रोजी त्यांचे मुळगांव पुर्णा
येथे अंत्यसंस्कार करण्यात
आला.
यावेळी
कुलगुरू मा.
डॉ.
अशोक
ढवण यांनी व्यक्तीश:
उपस्थित
राहुन विद्यापीठाच्या वतीने
श्रध्दांजली वाहीली.
कुलगुरू
मा.
डॉ.
अशोक
ढवण श्रध्दांजली वाहतांना
म्हणाले की,
ऋषिकेशाच्या
परिवाराच्या
दु:खात
विद्यापीठ सामिल असुन संपुर्ण
विद्यापीठ परिवारास अतिव
दु:ख
झाले आहे.
ऋषिकेशाच्या
परिवारांचा अवयवदानाच्या
निर्णयामुळे एक आदर्श समाजापुढे
ठेवला आहे.
याबाबत
ऋषिकेश व त्यांच्या परिवारास
समाजाचा व विद्यापीठाचा सलाम,
आजही
ऋषिकेश आपल्यामध्ये अवयवाच्या
स्वरूपात जीवंत आहे,
अशी
भावना त्यांनी व्यक्त
केली.
प्राचार्य
डॉ के आर कांबळे आपल्या भावना
व्यक्त करतांना म्हणाले
की,
ऋषिकेश
शांत,
सोज्वळ
व होतकरू विद्यार्थ्यी होता,
त्याचा
मृत्यु हा सर्वांसाठी मन
पिळवटुन टाकणारा आहे.
ऋषिकेशचा
मागे आजी,
आई-वडील,
दोन
बहीनी असा मोठा परिवार असुन
वडील साहेबराव एंगडे हे शेतमजुर
आहेत.
अंतविधीसाठी
आप्तस्वकिय,
उस्मानाबाद
कृषि महाविद्यालयाचे
विद्यार्थ्यी,
प्राध्यापकवृंद
आदीसह मोठा जनसमुदाय उपस्थित
होता.