परभणी : वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिना साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर या होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सहाय्यक माहिती अधिकारी डॉ. जया बंगाळे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करतांना
प्राचार्या डॉ. हेमांगिनी
सरंबेकर म्हणाल्या की, माहिती
अधिकारांतर्गत असलेल्या प्रत्येकांना आपल्या कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. यावेळी जागतिक हृदयरोग दिना निमित्तही उपस्थितांना
हृदय स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्षा डॉ. सुनिता काळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.