वसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे इटलापूर येथे बालकांचा
विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते. कार्यशाळेत बालविकास शास्त्रज्ञ व मानव विकास विभाग प्रमुख प्रा. विशाला
पटनम यांनी बालकांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी, बालकांच्या
वाढांकाचे महत्त्व व त्याचे मूल्यमापन करण्याची शास्त्रोक्त पध्दती, विद्यार्थ्यांमध्ये
कल्पनाशक्ती कशी वाढवावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे संवर्धन याबाबत
प्रात्याक्षिकासह व्याख्यान दिले. यावेळी उपस्थित बालकांपैकी उत्कृष्ट वाढांक
असलेल्या बारा विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना बेस्ट चाईल्ड, बेस्ट पॅरेन्टस्
अॅवार्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेत दिलेल्या माहिती आधारे
घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना व
पालकांना गोल्डन स्टार अॅवार्ड प्रमाणपत्र देण्यात आली. दिव्यांग बालके असणा-या
पालकांचे प्रा. विशाला पटनम समुपदेशन
केले. प्रत्येक गावक-यांना कुटुंबाच्या कल्याणासाठी ‘सक्षम आई व्हायच
मला’ व किशोरवयीन मुलीसाठी ‘माझी काळजी मीच
घेणार’ या दोन पुस्तिका विनामुल्य देण्यात आल्या. कार्यशाळेत
130 हूनही अधिक पालक, आजी-आजोबा, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या व विद्यार्थ्यांनी सहभाग
घेतला.