वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती
निमित्त दिनांक 29 एप्रिल रोजी सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उदघाटन कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ डी एस पेरके, डॉ
डब्ल्यु एन नारखेडे, डॉ आर पी कदम, डॉ आर व्ही चव्हाण, डॉ जे व्ही एकाळे, प्रा
ए एम कांबळे, डॉ आर जी भाग्यवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले
की, डॉ बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर विद्यार्थ्यी म्हणुनच राहीले. आयुष्यात यशस्वी
होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. सतत अठरा तास अभ्यास हा उपक्रम अत्यंत
कौतुकास्पद आहे, परंतु हे केवळ उपक्रमापुरते न राहता, एक संस्कार झाला पाहिजे.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ धर्मराज
गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आर जी भाग्यवंत यांनी केले तर आभार डॉ आर व्ही
चव्हाण यांनी मानले. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातही विद्यार्थ्यीनीनी
सदर उपक्रम राबविला, याचे उदघाटन श्रीमती उषाताई अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात
आले. उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचा-यांसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.