एक लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण
ओंकार ग्राफिक्सच्या वतीने शंभर बहावाची वृक्ष व ट्रि गार्ड भेट
ओंकार ग्राफिक्सच्या वतीने शंभर बहावाची वृक्ष व ट्रि गार्ड भेट
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्या संकल्पनेतुन
स्वच्छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ, सुरक्षीत विद्यापीठ व हरित विद्यापीठ उपक्रम
राबविण्यात येत असुन हरित विद्यापीठ उपक्रमात संपुर्ण मराठवाडयातील
विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महावि़द्यालय, विद्यालय, संशोधन केंद्रे व कृषि
विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर यावर्षी एक लक्ष वृक्षलागवड व संगोपनाचा कार्यक्रम
हाती घेण्यात आला. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात एक लक्षापेक्षा जास्त झाडांची
लागवड करण्यात आली असुन हरित विद्यापीठ संकल्पनेस विद्यापीठातील विद्यार्थ्यी,
अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आदीसह परभणीकरांनी मोठी साथ दिली आहे. या उपक्रमात
विद्यापीठ परिसरात येणारे मार्निंग वॉक ग्रुपचे तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी आपआपल्या
परीने देणगी स्वरूपात योगदान देत आहेत, स्वातंत्र्य दिनाचे
औजित्य साधुन दिनांक 15 ऑगस्ट रोजी ओंकार ग्राफिक्सचे श्री संजय ठाकरे व श्री
उज्ज्वल पंडित यांच्या वतीने 100 बहावाची रोपे व त्यासाठी लागणारे ट्रि गार्ड
देऊन हरित विद्यापीठ उपक्रमास योगदान दिले. सदरिल रोपांची लागवडीचा शुभारंभ कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ प्रदिप
इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ
नियंत्रक श्री एन एस राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ
धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके,
प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, डॉ हिराकांत काळपांडे, श्री संजय ठाकरे, श्री उज्ज्वल
पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले
की, हरित विद्यापीठ संकल्पनेस समाजातील सर्व स्तरातुन लोकांचा हातभार लाभत असुन
विद्यापीठ प्रक्षेत्रावर एक लाख पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.
परंतु मराठवाडयातील कमी पर्जन्यमानाच्या परिस्थिती ही झाडे जोपासनेचे मोठे आव्हान
असुन विद्यापीठ ही जबाबदारी निश्चितच सर्वांच्या सहकार्य व सहभागातुन पुर्ण करील,
असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ राजेश कदम व
डॉ गोदावरी पवार या दापत्यांनीही आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हरित
विद्यापीठ उपक्रमास देणगी स्वरूपात रक्कम कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांना सुपूर्द केली.