वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याकरिता
विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या विस्तार उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण
मोहिम दिनांक १९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण
५६ गावांमध्ये राबविण्यात येते असुन या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू मा. डॉ. अशोक
ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्य विस्तार शिक्षण
अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. दिनांक १९ सप्टेंबरपासून
सुरवात करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे,
गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे
मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञाचे दोन पथक करण्यात येऊन
यात कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र
आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ञांचा समावेश आहे. या पथकात कृषि विद्यावेत्ता
डॉ यू एन आळसे यांच्या नेतृत्वात डॉ एस जी पुरी, डॉ एम एस दडके, डाँ पी बी केदार, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ अे जी बडगुजर, डॉ एस आर बरकुले, डॉ सी व्ही अंबाडकर,
डॉ एस व्ही पवार, डॉ आर एस जाधव, डॉ आय
ए बी मिर्झा आदींचा समावेश आहे.
या
उपक्रमांतर्गत दिनांक २४ सप्टेबर रोजी सोनपेठ तालुक्यातील मौजे नारवाडी, खपाट पिंपरी आणि धामोणी येथे भेट देऊन विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केले. मौजे नारवाडी आणि खपाट पिंपरी येथे शेतकरी मेळाव्यात किटकशास्त्रज्ञ
डॉ पी बी केदार यांनी कापूस, सोयाबीन, तूर,
मका आदीं पिकावरील किडींच्या नियंत्रणाकरिता विविध उपाययोजन व कीटकनाशक हाताळताना
घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच डॉ एस व्ही पवार यांनी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत
माहिती सांगून रबी हंगामाच्या नियोजनात बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात
डॉ एस जी पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. मौजे नारवाडी येथील
शेतकरी श्री. अर्जुन जोगदंड यांचे ठिबक सिंचनावरील नांदेड-४४ बीटी कापसाच्या प्रक्षेञास
शास्त्रज्ञांनी भेट दिली. तसेच मौजे धामोणी येथे प्रगतशील शेतकरी कृषिभूषण श्री नाथराव
कराड यांच्या प्रक्षेत्र आणि पूरक उद्योग समूह एक हजार कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायास
भेट दिली. सोनपेठ तालुक्यातील सदरिल उपक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री गणेश कोरेवाड,
मंडळ कृषी अधिकारी श्री वाळके, कृषी विभाचे श्री
मुंडे, श्री पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.