वनामकृवित
जागतिक महिला दिन साजरा
शस्त्र
,
चित्रकला, शेती, अन्न शिजवणे आधीचा शोध स्त्रीयांनीच लावला. स्त्री ही सृजनशील आहे, समाजातील
नवनिर्माणाची केंद्रबिंदु ही स्त्रीच आहे. स्त्रीही
एक भोगवस्तु नाही, आज स्त्रीयावर अनेक अत्याचार
होत आहे, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन
बदलला पाहिजे. जीवनात स्त्रीयावर अनेक निर्णय ही
लादलेली जातात, दुस-यांच्या
अपेक्षानुसार स्वत: निर्णत घेतात. समाजामध्ये स्त्रीला स्वत:ची खरच ओळख आहे
का, हा प्रश्न आहे. स्वत:ची स्वातंत्र विचारसरणी जपा, स्वत:चा सन्मान करा, अन्याय व अत्याचार विरूध्द
लढा. स्वाभिमान बाळगा. निर्णयक्षम
बना, स्वयंसिध्दा व्हा. स्वत:चे अस्तित्व सिध्द करा, असे प्रतिपादन प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या तथा कवियत्री मा दिशा शेख
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने
दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्त आयोजित 'मी सिध्दा, मी स्वयंसिध्दा' याविषयावर त्या
बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू यांच्या सुविद्य
पत्नी सौ उषाताई अशोक ढवण या होत्या, तर व्यासपीठावर
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ संदिप बडगुजर, डॉ अनुराधा लाड, सहाय्यक वसतीगृह अधिक्षीका डॉ मिनाक्षी पाटील, डॉ सुनिता पवार आदींची प्रमुख
उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ राजेश कदम यांच्या मार्गदर्शन नुसार करण्यात आले होते.
मा
दिशा शेख पुढे म्हणाल्या की, पुर्वी समाजात मातृप्रधान संस्कृती होती. पितृसत्ताक समाजात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. कुंटुबव्यवस्थेते आज स्त्रीयांना अनेक बंधनात जखडेले आहे. स्त्रीही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते. स्त्रीयांनी स्वत:ची शक्ती ओळखली पाहिजे.
आज मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत, परंतु शेतकरी महिला आत्महत्या आपण क्वचितच ऐकतो. कारण स्त्री मध्ये सहनशिलता आहे, अपमान सहन
करण्याची शक्ती तीच्या आहे. मातृत्व, करूणा, आदर्श म्हणजे बाईपण, बाईपण हाच मोठा गुण स्त्रीयात असतो. महान
पुरूषातही आईपणा असते, म्हणुनच आपण विठाई,
माऊली, भिमाई असे म्हणतो,
असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय
भाषणात सौ उषाताई अशोक ढवण म्हणाल्या की, आज स्त्रीया
विविध क्षेत्रात मोठ योगदान देत आहे. तरिही स्त्री
अत्याचार व भ्रुणहत्या होतच आहेत. महिला सक्षमीकरण
व सबलीकरण झाले पाहिजे. स्त्रीयांनी जीवनात न्युंनगंड
बाळगु नये, स्त्रीयांमध्ये आत्मविश्वास पाहिजे.
वाचन करा, वाचनाने विचारात प्रगल्भता
येते. संकटांनी खचुन न जाता, संकटांकडे संधी म्हणुन पाहा, असा सल्ला त्यांनी
दिला.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ मिनाक्षी पाटील यांनी केले. सुत्रसंचालन विद्यार्थ्यीनी स्नेहल
मिटकरी हिने केले तर आभार डॉ सुनीता पवार यांनी मानले. कार्यक्रमास कृषि
महाविद्यालयातील विद्यार्थ्यींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.