वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या वतीने “कृषीक्षेत्रात रैपिड प्रोटोटाइपिंग व रिवर्स इंजीनियरिंगचा वापर” या विषयावर दिनांक 7 जुन ते 18 जुन दरम्यान पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांच्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असुन दिनांक 7 जुन रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बंगलोर येथील अलटेम टेकनॉलॉजीचे संचालक श्री. प्रसाद रोदगी उपस्थित होते.
प्रमुख पाहूणे श्री. प्रसाद रोदगी (संचालक, अलटेम टेकनॉलॉजी, बंगलोर (कर्नाटक) यांनी “कृषीक्षेत्रात रैपिड प्रोटोटाइपिंग व रिवर्स इंजीनियरिंग पध्दतीसाठी 3 डी स्कॅनर आणि 3 डी प्रिंटर्स चा वापर” कृषी तंत्रज्ञानामध्ये कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले. वेगवेगळया विभागात 3 डी स्कॅनर आणि 3 डी प्रिंटर्स वापर करुन नवनवीन नमुने कसे विकसीत केल्या जातील यांची त्यांनी माहिती दिली. रिवर्स इंजीनियरिंगचा वापर वेगवेगळया कृषी विभागात कशा प्रकारे करता येईल व त्याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भविष्यात कसा उपयोग होऊ शकतो यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष्ा डॉ. गोपाळ शिंदे, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आवाहन केले.