वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने गेल्या तीन वर्षापासुन
हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ उपक्रम राबविण्यात येत असुन दिनांक 24 जुन रोजी वटपौर्णिमेचे
औजित्य साधुन मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने कुलगुरू मा डॉ
अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठातील महिला कर्मचा-यांच्या हस्ते वडाच्या
वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य
डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. अंगद सुर्यवंशी, प्राचार्या डॉ. जयश्री
झेंड, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. हिराकांत काळबांडे, डॉ. महेश देशमुख आदीसह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासुन
संपुर्ण विद्यापीठ परिसरात नियोजनबध्द पध्दतीने वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन
मोहिम राबविण्यात येत आहे, याचे दृष्य परिणाम दिसुन येत आहेत. आजपर्यंत
विद्यापीठ परिसरात पन्नास हजार पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली, यात जाणिवपुर्वक परिसरातील मधुमक्षिका व पक्षी वैभव वाढण्याच्या दृष्टीने विशिष्ट वृक्षांची
लागवड केली जात आहे, यात वड, पिंपळ, उंबर, देशी जांभुळ आदींचा समावेश असुन फुलझाडे
व फळझाडे यांचीही लागवड करण्यात येत आहे. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात हजारपेक्षा
जास्त वडांची लागवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमात मान्यवर व सामुदाईक विज्ञान महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांच्या हस्ते वड, बकुळ, महागुणी, कांचन, कॅशीओ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. डॉ. जयश्री झेंड व महिला प्राध्यापिका यांच्या हस्ते वटवृक्षाचे पुजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील डॉ. प्रविण वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. स्नेहल शिलेवंत, डॉ. जावळे, प्रा. तोडमल, श्री अक्षय इंगोले, निखील पाटील, राकेश बगमारे, अजय चरकपल्ली आदीसह कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी प्रयत्न केले.