वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिनांक २९ ऑगस्ट रोजी आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल मुलांच्या स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शनात डॉ डी एन गोखले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी एकतरी मैदानी खेळ जोपासला पाहिजे, नियमितपणे खेळातील सहभागामुळे आरोग्य सुदृध्ढ राहण्यास मदत होते.
कार्यक्रमात खेळाडु, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, अधिकारी व
कर्मचारी यांना फीट इंडिया ची शपथ देण्यात आली. बास्केटबॉल स्पर्धेत विद्यापीठांतर्गत
येणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय महाविद्यलयांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये सहभागी
प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडुंनी उत्तम खेळ दाखवला. बास्केटबॉल मुले स्पर्धेत परभणी
कृषि महाविद्यालयाचा संघ विजेता तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी चा संघ उपविजेता राहीले. विजेता संघास विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे यांच्या हस्ते विजयी चषकाचे प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे
सुत्रसंचलन प्रा. एस.यु. चव्हाण यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच, निवड समिती सदस्य व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.