वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्या वतीने दिनांक ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान शास्त्रोक्त लेखन आणि भाषा क्षमता या विषयावर आयोजित चार दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी शिक्षण संचालक डॉ उदय खोडके हे होते. व्यासपीठावर गोळेगांव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भगवान असेवार, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉ वीणा भालेराव यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना करीअर मध्ये प्रगती साधण्यासाठी भाषा कौशल्य व लेखन कौशल्य अत्यंत महत्वाचे बाबी असुन व्यक्तिमत्व विकासाकरिता विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांनी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शास्त्रोक्त लेखन करण्यासाठी आवश्यक बाबी या विषयावर प्रकाश टाकला तसेच विद्यापीठाचे नामांकन वाढवण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांनी अधिकाधिक प्रमाणात उच्च प्रतीचे लेखन करावे असेही मत व्यक्त केले.
डॉ
भगवान असेवार यांनी या चार दिवसीय कार्यशाळेत समाविष्ट विषयांचा आढावा सादर केला. कार्यक्रमात
आचार्य पदवी विद्यार्थी प्रीती वायकुळे,
अभिषेक हिवराळे, संगीता
होलमुखे, अंकुश खांडरे,
प्रिया सत्वधर,
प्राध्यापक डॉ.अरुण गायकवाड यांनी या कार्यशाळेचा
त्यांना विविध शास्त्रोक्त लेखनासाठी झालेला लाभ याविषयी विस्तृतपणे सांगितले. कार्यक्रमात
सहभागी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच डॉ
नितीन कदम उच्च विद्या विभूषित साधन व्यक्ती यांचा देखील प्रमाणपत्र देऊन सन्मान
करण्यात आला. सुत्रसंचलन डॉ वीणा भालेराव
यांनी तर इंजि. संजय पवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी
प्रा. संजय पवार, डॉ मेघा जगताप,
डॉ. शिवराज शिंदे, इंजि.
तनजीम खान, इंजि. अक्षय गायकवाड, इंजि
आमिर खान, इंजि. गोपाळ रनेर, रामदास
शिंपले, नितीन शहाणे,
मारुती रणेर,
जगदीश माने यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे आयोजन आचार्य
पदवी विद्यार्थ्यांची तसेच प्राध्यापकांची लेखन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी तथा
प्रभावी लेखनशैली विकसित करण्यासाठी करण्यात आले होते.