वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत शिक्षक दिनानिमित्त दिनांक ५ सप्टेबर रोजी सन्मान गुरूजनांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिध्द कवी सिने अभिनेते तथा ग्रामविकास मंत्रालयाचे माजी उपसचिव श्री अनिलजी मोरे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ गोविंदजी नांदेडे हे उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, माजी शिक्षण संचालक डॉ पी आर शिवपुजे, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ एस डी मोरे, माजी कुलसचिव डॉ डि ए चव्हाण, डॉ डि डि निर्मल, डॉ ए एन गिते, प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांपुढे
शिक्षकांचा आदर्श असतो, शिक्षक हा चारित्र्य संपन्न असला पाहिजे. विद्यार्थी हा
शिक्षकांचा मानस पुत्रासारखा असतो. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील संस्कार हे आयुष्यभर टिकतात.
मार्गदर्शनात
प्रसिध्द सिने अभिनेते श्री अनिलजी मोरे म्हणाले की, शाळा व महाविद्यालयाच्या
ज्ञान मंदिरात विद्यार्थी घडतात. ज्या प्रमाणे शेतकरी शेतात बियानांची पेरणी करतो, त्याच प्रमाणे
शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची पेरणी करतात. राष्ट्र उभारणीचे महान कार्य
शिक्षकच करतात, देश बांधणीमध्ये प्रत्येकांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन
यांनी केले.
माजी शिक्षण
संचालक डॉ गोविंदजी नांदेडे म्हणाले की,
जीवनात यश प्राप्त करण्याकरिता अथक परिश्रमाशिवाय पर्याय
नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वत:च्या हिंमतीवर सुराज्य निर्माण केले तसेच
महाराष्ट्राला शाहु – फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे, यासर्वांनी
कठिन परिस्थितीत इतिहास घडविला आहे. ज्या देशाची शिक्षण व्यवस्था डळमळीत असते, त्या देशाचा
नाश होण्यास वेळ लागत नाही. मोठे होण्याकरिता बुध्दी पेक्षा जिध्द असली पाहिजे.
कर्मयोगी व्हावा, कार्यमग्न रहा, असा सल्ला
त्यांनी दिला.
माजी शिक्षण
संचालक डॉ पी आर शिवपुजे म्हणाले की,
शिक्षकांचे चरित्र शुध्द असले पाहिजे, विचार प्रगल्भ
असले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार व डॉ प्रितम भुतडा यांनी केले. आभार डॉ सचिन मोरे यांनी
मानले. कार्यक्रमात माजी शिक्षण संचालक डॉ पी आर शिवपुजे, माजी विस्तार
शिक्षण संचालक डॉ एस डी मोरे, माजी कुलसचिव डॉ डि ए चव्हाण, डॉ डि डि
निर्मल, डॉ ए एन गिते आदी आदर्श शिक्षकांचा विद्यापीठाच्या वतीने
सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी
व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.