Monday, March 11, 2024

कृषि महाविद्यालय परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन

 रक्तदानातून मिळणारा आनंद अतुलनीय .... डॉ उदय खोडके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जिल्हा रुग्णालय परभणी यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यानिमित्त संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि यामुळे इतरांच्या जीवनात फार मोठा होणारा होतो आणि रक्तदानातून मिळणारा आनंद हा आतुलनीय असतो असे नमूद केले. यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, जिमखाना उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. पी. आर. झंवर, विभाग प्रमुख डॉ. एच. व्ही. काळपांडे, डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे, डॉ. राजेश कदम, सहयोगी प्राध्यापक आशा देशमुख, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आत्माराम जटाळे आणि त्यांचे सहकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि प्रा संजय पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी कृषि महाविद्यालय परभणी येथील ३८ स्वयंसेवकांनी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. शिबिराचे आयोजन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि डॉ. संजय पवार यांनी केले. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.