वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी २२ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या नवीन विकसित होणाऱ्या क्षेत्राला भेट दिली. त्यांनी शेतजमिनीच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले तसेच जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणण्याच्या सूचना दिल्या.
माननीय कुलगुरूंनी जे
फार्म आणि त्याच्या संशोधन क्षेत्राला भेट देत पीजी व पीएचडी विद्यार्थ्यांनी कीड
व रोग व्यवस्थापन तसेच अचूक शेतीतील खत व्यवस्थापनावर संशोधन करावे, असे
आवाहन केले.
त्यानंतर सेंद्रिय शेती
संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन टोमॅटो व कांदा संशोधन प्रयोग, हरभऱ्यावर
योगिक प्रयोग, गांडूळ खत निर्मिती यांसारख्या विविध
उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी उच्च दर्जाचे गांडूळ खत उत्पादनावर भर द्यावा तसेच
विद्यापीठांतर्गत उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्राद्वारे मध्यवर्ती
प्रक्षेत्रातील १०० हेक्टर पडीक जमिनीवर फळबाग लागवडीसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
या प्रक्षेत्रास सिंचनासाठी नवीन दोन बोरवेलचे उद्घाटन करून फळबाग लागवडीच्या कार्याची
प्रगती पहिली. याबरोबरच विद्यापीठातील विविध संशोधन योजनांतर्गत उत्पादित होणाऱ्या
फळे व भाजीपाला विक्रीसाठी एकाच ठिकाणी लिलाव पद्धती लागू करावी, असे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी मध्यवर्ती
प्रक्षेत्रातील बीटी कापूस (एनएच १९०१ बीटी व एनएच १९०२ बीटी) आणि परभणी शक्ती
ज्वारीच्या बियाणे उत्पादन प्लॉट्सला भेट देऊन समाधान व्यक्त केले.