Saturday, October 21, 2023

आंतर महाविद्यालयीन युवक महोत्‍सवात परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांचे घवघवीत यश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयात दिनांक १७ आणि १८ ऑक्‍टोबर रोजी पार पडलेल्‍या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२३ मध्ये परभणी कृषि महाविद्यालाच्या संघाने विविध कला प्रकारात घवघवीत यश संपादित केले. पुरस्‍कार प्राप्‍त संघाचे आणि विद्यार्थ्‍यांचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते दिनांक २० ऑक्‍टोबर रोजी सत्‍कार करण्‍यात आला. फाईन आर्ट प्रकारात पोस्टर मेकिंग, स्पॉट पेंटिंग, कार्टूनिंग, कोलाज यात एक सुवर्ण पदक, ३ रजत व ३ कास्य पदके पटकावली. लिटररी स्पर्धेत २ सुवर्ण व १ रजत पदक तर शास्त्रीय संगीत, मिमिक्री, एकपात्री या कला प्रकारात सुवर्ण पदक तसेच शास्त्रीय नृत्य, लावणी, स्कीट या प्रकारात कांस्यपदक, अशी प्रकारे एकूण ९ सुवर्ण,४ रजत व ६ कास्य पदके पटकावुन घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले तर उपाध्यक्ष जिमखाना डॉ पी आर झंवर, डॉ एम एम सोनकांबळे, संघ व्यवस्थापक डॉ नरेंद्र कांबळे, डॉ अनुराधा लाड, श्री अमोल सोनकांबळे आदींनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.

Thursday, October 19, 2023

रबी हंगामात कमी पाण्‍यात येणा-या पिकांची लागवडी करीता निवड करावी .... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित एल-निनोच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे व्‍यवस्‍थापन कार्यशाळा संपन्‍न 

अल-निनोच्‍या प्रभावामुळे मराठवाडा विभागात यंदा कमी पर्जन्‍यमान झाले, येणा-या रबी हंगामात ही पाऊसाची शक्‍यता कमी आहे. सद्यस्थितीत जमीनीतील ओलावाचा विचार करता कमी पाण्‍यात येणारे रबी पिके जसे ज्‍वारी व करडई यासारख्‍या पिकांची लागवड करणे आवश्‍यक असुन कमी कालावधीत येणारी वाण निवडावीत असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने कृषि विद्यापीठ, जिल्‍हा प्रशासन आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्‍तारक यांच्‍याकरिता दिनांक १८ ऑक्‍टोबर २०२३ रोजी अल-निनोच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन यावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री रवी हरणे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, मर्यादित उपलब्‍ध जमिनीतील ओलावा, मर्यादित पाणी, व कृषि निविष्‍ठात पिकांची लागवड करण्‍याकरिता कृषि तंत्रज्ञान व विज्ञानाची जोड पाहिजे. राज्‍यात अनेक शेतकरी नावीन्‍यपुर्ण शेती करतात, त्‍यांचे अनुभवाचा उपयोग कृषि संशोधनात होऊ शकतो. त्‍यामुळे शेतकरी सहभाग कृती संशोधन करण्‍याची गरज आहे. कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍यातील कृषि विभागातील कृषि विस्‍तारक महत्‍वाचा दुवा आहेत. अन्‍न सुरक्षा पुर्णपणे शेतकरी बांधवाच्‍या हाती असुन राज्‍य शासन, कृषी विद्यापीठ, कृषि विभाग, आणि शेतकरी यांच्‍यात सातत्‍याने संवाद पाहिजे. यावर्षी विद्यापीठाने राबविलेला शेतकरी – शास्‍त्रज्ञ संवाद कार्यक्रमास शेतकरी बांधव आणि कृषि अधिकारी यांनी मोठा प्रतिसाद दिला. शेतकरी बांधवांना सहज समजू शकेल असे वैज्ञााानिक ज्ञान व माहिती पोचविण्‍यावर भर द्यावा लागेल. 

प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, मराठवाडा साधारणत: १५ टक्के पर्जन्‍यमान कमी झाले असुन जनावरांकरिता चारापिकांचे नियोजन करावे लागेल.

कार्यशाळेत या वर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा विभागात झालेल्या अपु-या पावसाच्या पार्श्‍वभुमीवर पुढील हंगामात पिकांचे नियोजन, उपाययोजना आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यशाळेत अल-निनो वर्षाच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन, मुख्‍य रबी पिकांचे लागवड, किड व रोग व्‍यवस्‍थापन, कार्यक्षम पाणी व्‍यवस्‍थापन, दुष्‍काळ परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठीच्‍या उपाययोजना, कमी पाण्‍यावर येणा-या भाजीपाल्‍याची लागवड, पशुधनाकरिता चारापिकांचे नियोजन, पशुधनाचे लंपीरोग व उष्‍णतेपासुन संरक्षण आदी विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सादरीकरण करून मार्गदर्शन केले. रबी हंगामात पीक हवामान दिनदर्शिकेचे विमोजन  मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डि डि पटाईत यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यशाळेत मराठवाडा विभागातील कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्‍तारक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, प्रगतशील शेतकरी आदींनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन

मार्गदर्शनात कृषि हवामान तज्ञ डॉ कैलास डाखोरे म्‍हणाले की, सोयाबीन काढणीनंतर दोन ते तीन दिवसात पेरणी करणे गरजेचे असुन उपलब्‍ध जमीनीतील ओलावा कमी होण्‍याची शक्‍यता आहे. कृषि विद्या तज्ञ डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे म्‍हणाले की, रबी ज्‍वारीचे परभणी सुपर मोती आणि परभणी शक्‍ती या वाणांचा पेरणीकरिता वापर करावा, या वाणाची धान्‍य व कडब्‍याची प्रत चांगली आहे. किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी एस नेहरकर यांनी केवळ रासायनिक किटकनाशकांचा वापर न करता एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन करण्‍याचा सल्‍ला दिला तर डॉ एस एल बडगुजर यांनी हरभरा पिकात मर रोगाच्‍या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा, बीजप्रक्रिय करूनच पेरणी करण्‍याचा सल्‍ला दिला.उद्यानविद्या तज्ञ डॉ संजय पाटील यांनी दुष्‍काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्‍याकरिता मल्‍जींग किंवा आच्‍छादनाचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. डॉ आर जी भाग्‍यवंत यांनी रबी पिकांतील कार्यक्षम पाणी व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले, कमी पाण्‍यावर येणा-या भाजीपाल्‍याची लागवडीबाबत डॉ व्‍ही एस खंदारे यांनी मार्गदर्शन केले तर चारा व्‍यवस्‍थापनावर डॉ जी के लोंढे यांनी मार्गदर्शन केले.



Monday, October 16, 2023

वनामकृवित एल-निनोच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे व्‍यवस्‍थापन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने कृषि विद्यापीठ, जिल्‍हा प्रशासन आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्‍तारक यांच्‍याकरिता दिनांक १८ ऑक्‍टोबर २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता विद्यापीठाच्या परभणी येथील प्रशासकीय इमारतीतील सिम्‍पोजिम हॉल (हॉल क्रमांक १८) येथे एल-निनोच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि राहणार आहे. या वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा विभागात झालेल्या अपु-या पावसाच्या पार्श्‍वभुमीवर पुढील हंगामात पिकांचे नियोजन, उपाययोजना आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍याच्‍या अनुषंगाने कार्यशाळेत विचारमंथन करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत एल-निनो वर्षाच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन, मुख्‍य रबी पिकांचे लागवड, किड व रोग व्‍यवस्‍थापन, कार्यक्षम पाणी व्‍यवस्‍थापन, दुष्‍काळ परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठीच्‍या उपाययोजना, कमी पाण्‍यावर येणा-या भाजीपाल्‍याची लागवड, पशुधनाकरिता चारापिकांचे नियोजन, पशुधनाचे लंपीरोग व उष्‍णतेपासुन संरक्षण आदी विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सादरीकरण करून विचारविनिमय करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत मराठवाडा विभागातील जिल्‍हा प्रशासन आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्‍तारक, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदींनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Sunday, October 15, 2023

वनमकृवित वाचन प्रेरणा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या जयंतीचे औजित्‍य साधुन दिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीने वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचनामुळे व्‍यक्‍तींचे विचार प्रगल्‍भ होतात. भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांचे जीवनचरित्र युवकांना प्रेरणादायी असुन प्रत्‍येकांनी त्‍याचे वाचन केले पाहिजे. 

यावेळी शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ डब्‍ल्‍यु एच नारखेडे, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम, श्री मोहनकुमार झोरे, गोमटेश बुक एजन्‍सीचे श्री भुषण घोडके आदीसह ग्रंथलयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Friday, October 13, 2023

डॉ रामप्रसाद खंदारे यांची भारतीय मृद विज्ञान संस्‍थेच्‍या परिषदेवर निवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातंर्गत अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प दीर्घकालीन खत प्रयोगाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे यांची नवी दिल्ली स्थित भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परिषदेवर सदस्‍य म्‍हणुन सन २०२४ व २०२५ या कालावधीसाठी निवडून आले आहेत. भारतीय मृद विज्ञान संस्था, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दि. ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या वार्षिक सभेत याची घोषणा करण्यात आली. सदर संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्य करत असून जमिनीची शाश्वतता आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचे महत्व व जागरुकता करण्याचे काम करते. तसेच राष्ट्रीय स्तरावर मृद विज्ञान शिक्षण व संशोधनामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने नेहमी कार्यरत असते. सदर संस्थेच्या परभणी शाखेच्या वतीने अनेक शैक्षणिक व संशोधनात्मक मृदा जागृती विषयक यामध्ये शालेय स्तरावर भित्तीपत्रक, चित्रकला, प्रश्न मंजुषा, निबंध इ. कार्यक्रम राबविल्या जातात. सदरील निवड हि जागतिक व देश पातळीवरील मृद संधारण, मृदा संवर्धन, समस्या यावर नवीनतम संशोधक निर्मिती, शिक्षणातील गुणवत्ता, मृदा आरोग्य जाणिव व वृद्धी यावर विचारमंथनाने नव संशोधकांना प्रोत्साहीत करणे, या उद्देशाने परिसंवादाच्या आयोजनात भाग घेऊन महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठात मृदा संशोधकांना प्रोत्साहीत करण्यासाठी झाली आहे.

डॉ. रामप्रसाद खंदारे यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्य करणा­या संस्थेमध्ये निवड झाल्या बद्दल विद्यापीठाचे कुलगुरु मा प्रा. डॉ. इंद्र मणि, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. विलास टाकणखार, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. प्रभाकर आडसुळ, डॉ. महेश वाघमारे, डॉ. अजित पुरी, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड व डॉ. स्नेहल शिलेवंत यांनी अभिनंदन केले. भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेच्या पदाधिकारी आणि मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

वनामकृवितील ज्वार संशोधन केंद्राच्‍या वतीने ज्वारीच्या सुधारित वाणाचे बियाणे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प - ज्वार संशोधन केंद्र, परभणी मार्फत आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ विकसित रबी ज्‍वारीचे वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती आणि सीएसव्ही-२९ आर बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बीज प्रक्रियेसाठी गाऊचु, ट्रयकोबुस्ट आणि घडीपुस्तीका वाटप करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन गावातील प्रतिष्ठीत शेतकरी श्री बालासाहेबजी रेंगे, ज्‍वार पैदासकार डॉ. एल. एन.जावळे, ज्वार रोगशास्ञज्ञ डॉ.के.डी.नवगीरे, अभासकृषिरत महिला प्रकल्पाच्‍या केंद्र समन्वयक डॉ. सुनिता काळे, सहाय्यक ज्वार कृषिविद्यावेत्ता श्रीमती प्रितम भुतडा आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितीत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करतांना डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ याविषयी माहिती देऊन ज्वारीची योग्य पध्दतीने लागवड आणि प्रक्रिया उद्योग, प्रायमरि प्रोसेसिंग, ग्रेडीग, पॅकेजींग ईत्यादी बाबींचा शेतक-यांनी उपयोग करुन जास्तीत जास्त आर्थिक नफा कसा घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ.एल. एन. जावळे यांनी सुधारित वाणांचे वैशिष्टये यावर मार्गदर्शन करून शेतक-यांना आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक चांगल्या पध्दतीने घेण्याचे आव्हान केले. डॉ. सुनिता काळे हयांनी यांनी भरडधान्याचे आहारामधील महत्व आणि विविध पदार्थ हया विषयी मार्गदर्शन केले. डॉ. के.डी. नवगीरे यांनी ज्वारीवर येणारे विविध रोग, बीजप्रक्रिया आणि जैविक निविष्ठांचा वापर याबाबत माहिती दिली. तर श्रीमती प्रितम भुतडा यांनी ज्वारीची सुधारित लागवड तंञज्ञान लागवड पध्दत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले. कार्यक्रमास जांब गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद देशमुख, श्री बालासाहेब रेंगे, आणि ज्वार संशोधन केंद्राचे इतर कर्मचारी हयांनी प्रयत्न केले.


रायपुर ता. परभणी येथे लम्पी रोग लसीकरण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय ग्रामिण कृषि कार्यानुभव जागरुकता कार्यक्रम (रावे) आणि औद्योगीक संलग्नता उपक्रमातंर्गत मौजे रायपुर येथे लम्पी रोग बाबत जागरुकता निर्माण करुन पशुधन विकास अधिकारी डॉ. एल. टी. कनले व डॉ. माने यांचे मार्गदर्शनाखाली गावातील पशुचे लसीकरण कार्यक्रम राबवण्‍यात आला. सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. राजेद्र सावंत, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संतोष बरकुले, डॉ. दत्तात्रय दळवी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता रायपुर व परळगव्हाण येथील रावेच्‍या कृषि कन्‍यांनी परिश्रम घेतले.