Monday, February 19, 2024

वनामकृवित पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन

देशातील महाराष्‍ट्रासह सहा राज्‍यातील शेतकरी बांधव आणि कृषि तज्ञांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचा उदघाटन सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्‍यात आला असुन उदघाटन माननीय कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांच्‍या व्दारे होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन विशेष अतिथी म्‍हणुन राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे संचालक तथा कुलगुरू मा डॉ ए के सिंग, राष्‍ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्‍यक्ष डॉ वल्‍लभभाई कथारिया, सदस्‍य श्री सुनिल मानसिंगका, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री दिनेश कुलकर्णी, प्रसिध्‍द सिने अभिनेता श्री उपेंद्र लिमये, नियोजन आयोगाचे माजी सदस्‍य डॉ व्‍ही व्‍ही सदामते आदीसह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य, मराठवाडा विभागातील संसद सदस्‍य, विधानसभा, विधान परिषद सदस्‍य, देशाच्‍या व राज्‍याच्‍या कृषि मंत्रालयातील वरिष्‍ठ अधिकारी, विविध कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे संचालक उ‍पस्थित राहणार आहे. समारोपीय कार्यक्रम माननीय कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे आणि पुणे येथील कृषी परिषदेचे उपाध्‍यक्ष मा ना श्री प्रकाशजी आबीटकर उपस्थित पाडणार आहे.

कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्र, गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा या राज्‍यासह दीव-दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी होणार आहेत. मेळाव्‍याचा मुख्‍य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतक-यांची समृद्धी’ आहे. यात चर्चासत्रे, शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवाद आदींव्‍दारे विविध विषयावर तज्ञ मं‍डळी मार्गदर्शन करणार आहेत. सदर शेतकरी मेळावा आणि  कृषि प्रदर्शनीच्‍या माध्‍यमातुन राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नाविण्‍यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्‍याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्‍ध होणार आहे. भव्‍य कृषि प्रदर्शनीत अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्‍या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांच्‍या ३०० पेक्षा जास्‍त दालनाचा समावेश राहणार आहे. यात विषशेत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्‍दती, पशुधन इत्‍यादी दालनांचा समावेश राहील. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा वतीने बचत गटांच्‍या दालनांचा समावेश असलेल्‍या खाद्य महोत्‍सवाचेही आयोजन करण्‍यात आले आहे.

सर्व कृषि बांधवकृषि उद्योजककृषि अधिकारी आणि कृषि विस्‍तारक यांनी कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचा आवश्य लाभ घ्‍यावाअसे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेआत्‍मा संचालक श्री दशरथ तांभाळेसमन्‍वयक अधिकारी डॉ राजेश कदमडॉ प्रशांत देशमुखविभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकरश्री तुकाराम मोटेश्री संतोष आळसे, डीआरडीएचे प्रकल्‍प संचालक श्रीमती रश्‍मी खांंडेकर आदीसह आयोजक समितीने केले आहे.

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी

शिवजयंतीमुळे वर्षभर कार्य करण्याची ऊर्जा मिळते ...... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि हे होते, त्‍यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि शुभेच्छा देऊन म्‍हणाले की, शिवजन्मोत्सव साजरा केल्यामुळे आपणास वर्षभर कार्य करण्याची ऊर्जा मिळते. मोठे काम करण्यासाठी वयाची अट नसते, शिवाजी महाराजांनी त्यांच्या तेराव्या वर्षाच्या वयामध्येच स्‍वराज्‍य स्‍थापनेचे कार्य सुरू केले होते. शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि विक्रम सर्व सामायिक सर्व जण हिताय आणि सुखाय होते. ३९४ व्या वर्षातही संपूर्ण जग सुद्धा त्यांचा इतिहास लक्षात ठेवतो यात सर्वकाही आहे. शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न होते.महाराजांच्या कार्यपद्धतीचे आचरण आणि अनुकरण करण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी ज्ञानेश्वर कटिंग यांनी तर आभार डॉ. आशा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ.  सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.  विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यापीठ उपअभियंता डॉ. डी. डी. टेकाळे,  विविध विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.





Thursday, February 15, 2024

वनामकृवित पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन

देशातील महाराष्‍ट्रासह सहा राज्‍यातील शेतकरी बांधव आणि कृषि तज्ञांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आल्‍याची माहिती कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अरूण सुर्यवंशी आदीसह विद्यापीठाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्र, गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा या राज्‍यासह दीव-दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी होणार आहेत. मेळाव्‍यास देशातील आणि राज्‍यातील सन्‍माननीय मंत्री महोदयांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचा मुख्‍य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतक-यांची समृद्धी’ आहे. यात चर्चासत्रे, शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवाद आदींव्‍दारे विविध विषयावर तज्ञ मं‍डळी मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्‍याचा उदघाटन सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्‍यात आला आहे. कार्यक्रमास केंद्रीय व राज्‍य शासनाचे सन्‍माननीय मंत्री महोदयांना निमंत्रित करण्‍यात आले असुन राज्‍याचे माननीय कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंढे हे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी समारोपीय कार्यक्रमास विशेष अतिथी येणार असुन उदघाटन कार्यक्रमास राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा ना श्री  पाशाभाई पटेल साहेब उपस्थित राहणार आहेत.

सदर शेतकरी मेळावा आणि  कृषि प्रदर्शनीच्‍या माध्‍यमातुन राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नाविण्‍यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्‍याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्‍ध होणार आहे. भव्‍य कृषि प्रदर्शनीत अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्‍या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांच्‍या २०० पेक्षा जास्‍त दालनाचा समावेश राहणार आहे. यात विषशेत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्‍दती, पशुधन इत्‍यादी दालनांचा समावेश राहील. याप्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्‍सवाचेही आयोजन करण्‍यात आले आहे. सर्व कृषि बांधव, कृषि उद्योजक, कृषि अधिकारी आणि कृषि विस्‍तारक यांनी कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचा आवश्य लाभ घ्‍यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे.

कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, कृषि अभियंता डॉ स्मिता सोलंकी, अतिक व्‍यवस्‍थापक डॉ गजानन गडदे आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच परभणी शहरातील प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Friday, February 9, 2024

वनामकृवि विकसित सात वाण प्रसाराची राज्य बियाणे समितीची शिफारस

राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक दिनांक ८ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे राज्‍याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) मा. श्री अनुप कूमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण असे एकुण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती (भारत सरकार) यांना अधिसुचित करण्याची शिफारस करण्यात आली. यामध्ये सात वाणात सोयाबीनचे एमएयुएस ७३१, अमेरिकन कापुसाच्‍या एनएच ६७७, हरभरा देशी वाण परभणी चना १६, खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍ती, तीळ पीकाच्‍या टिएलटी १० तसेच  मिरचीचा पीबीएनसी १७ टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० याचा समावेश आहे. 

शि़फारसीत करण्‍यात आलेले वाण आणि मुख्‍य वैशिष्‍टे

सोयाबीनचा एमएयुएस ७३१ हा वाण अधिक उत्पन्न देणारा (हेक्‍टरी २८ -  ३२ क्विंटल) असुन  विविध किड रोगास मध्यम प्रतिकारक, लवकर येणारा, मराठवाडा विभागासाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.

अमेरिकन कापुस प्रसारित वाण एनएच ६७७ यांचे जिराईत मधील उत्पादन क्षमता हेक्‍टरी १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर काढणीचा कालावधी १५० ते १६० दिवस आहे, हा वाण जिवाणुजन्य तसेच बुरशीजन्य रोग व रस शोषणा-या किडीस प्रतिकारक आहे. सदरील वाण महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहु कापुस लागवड असलेल्या भागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.

हरभरा देशी वाण परभणी चना १६ हा अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांञिकीसाठी सुलभ, टपो-या दाण्याचा, मराठवाडा विभागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.

तीळ पीकात टिएलटी १० हा अधिक उत्पन्न देणारा टपोरा पांढरा दाणा, महत्वाच्या किड व रोगास मध्यम प्रतिकारक असुन महाराष्ट्रासाठी खरीप व उन्हाळी हंगामास लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.

ज्वारीचा खरीप हंगामातील परभणी शक्ती हा वाण धान्यामध्ये अधिक लोह (४२ मिली ग्रॅम / किलो) व अधिक जस्त (२५ मिली ग्रॅम / किलो) असणारा व धान्याचे उत्पादन २२ ते २५ Ïक्वटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा व कडब्याचे ५२ ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा वाण महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात लागवडीची शिफारस करण्यात आला आहे.

मिरचीचा पीबीएनसी १७ हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. हा वाण लिफकर्ल व अॅंथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशील आहे.

टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० हा वाण रब्बी हंगामामध्ये मराठवाडा विभागास लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजन ६० ते ६५ ग्रॅम आहे. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहीली काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशील आहे.

हे सात वाण प्रसारण करण्यासाठी मा. संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पिक पैदासकारांचे विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि यांनी अभिनंदन केले असुन सदर वाण बदलत्‍या हवामान परिस्थितीत शेतकरी बांधवा करिता अत्‍यंत उपयुक्‍त असल्‍याचे म्‍हणाले.





Thursday, February 8, 2024

ऊस संशोधनाकरिता वनामकृवि आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट यांच्‍या सामंजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि वसंतदादा साखर शुगर इन्स्टिटयुट, मांजरी पुणे यांच्या मध्‍ये ऊस पिकातील संशोधन, शिक्षण आणि  विस्‍तार याबाबत दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार करण्‍यात आला. या प्रसंगी कुलगुरू मा कुलगुरु डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित बैठकीत संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, व्‍हिसीआयचे शास्‍त्रज्ञ डॉ. ए.डी. कडलग व डॉ. एस. जी. दळवी हे उपस्थित होते. 

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, मराठवाडा विभागातील उस शेती संशोधनास चालना मिळणार असुन भविष्‍यात साखर उद्योग क्षेत्रात विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य विकासाकरिता उस शेती, साखर कारखाना, मुल्यवर्धित पदार्थ निर्मिती, अल्‍कोहोल निर्मिती तंत्रज्ञान, बॉयोफुएल आदीवर आधारीत अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येतील. शेतकरी बांधवांना सुधारीत ऊस लागवडीचे प्रशिक्षणाचे ही आयोजन करण्‍यात येईलया करारामुळे विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी आणि मराठवाडयातील ऊस संशोधनास वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट संस्‍थेमधील विविध सोईसुविधांचा विद्यार्थ्‍यांना संशोधनाकरिता फायदा घेता येणार आहे.

सामंजस्‍य करारावर व्हिएसआर मांजरीचे महासंचालक श्री संभाजी कडुपाटिल, शास्‍त्रज्ञ डॉ. ए.डी. कडलग, डॉ. एस. जी. दळवी तर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ गोदावरी पवार, डॉ मदन पेंडके यांनी स्‍वाक्षरी केल्‍या. बैठकीस नियंत्रक श्री प्रविण निर्मल, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, डॉ राजेश क्षीरसागर, डॉ व्‍ही एस खंदारे, विभाग प्रमुख, संशोधक उपस्थित होते.