Tuesday, July 15, 2014

नांदगाव येथे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम


    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्रातंर्गत कार्यरत असलेल्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांनी मौजे नांदगांव (खु.) येथे सोमवार दिनांक 10 जुलै 2014 रोजी सोयाबीन पिकाच्‍या बियाण्‍यास द्रवरुप रायझोबियम व पी.एस.बी. या जैविक खताच्‍या बिज प्रक्रियेचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविले. तसेच कृषिदुतांनी जैविक खतांचे महत्‍व व उपयोग याबद्दल शेतक-यांना सविस्‍तर माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी श्री विठ्ठल भालेराव, ज्ञानेश्‍वर भालेराव, अंगद भालेराव, संजय भालेराव यांच्‍यासह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी कृषिदुत शिवप्रसाद संगेकर, प्रविण तिडके, सचिन वाघमारे, हर्षल वाघमारे, अजय साळवे, बद्रिनाथ ढाकणे, नवनाथ मोरे, दिपेश बोरवाल, राजेश सोनी, विवेककुमार कटीहार, प्रविंद्रकुमार, निखीलकुमार, रोहित कुमार, धिरेंद्र कुमार, सचिन सुंदाळकर, रामकृष्‍ण माने, सतिष कटारे, अमोल वैद्य, राम कोलगणे, व्‍यंकटेश शिराळे, मनोहर शेळके, वाकळे, स्‍वप्निल बाहेकर, महेश झिंझुरडे, अरीसुदन, थिप्‍पी रेड्डी, मसुद शेख यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमास कृषिदुतांनी डॉ. एल.एन. जावळे व डॉ. कराड यांचे मार्गदर्शन लाभले.