वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत एकात्मिक शेती पध्दती संशोधन
केंद्रातंर्गत कार्यरत असलेल्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिकन्यांनी
मौजे एरंडेश्वर ता. पुर्णा जि. परभणी येथे दिनांक ७ जुलै रोजी सोयाबीन जैविक खत
रायझोबियमची बीजप्रक्रिये प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आत्मा
योजनांतर्गत कृषिगटाचे अध्यक्ष श्री पांडुरंग काळे, उपसरपंच कल्याणराव काळे व
ज्ञानोबा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषिकन्यांनी जैविक खताचे महत्व
व उपयोग याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या
सुषमा नानजकर, जयश्री कदम, मुक्ता तांबे, वैशाली खिलारे, प्रिया शेळके, पुजा पौळ,
वनिता सस्ते, अश्विनी सिरसठ, प्रियंका कदम, प्रियंका भारती, केतकी नवगीरे, सुजाता
काळदाते, सोनि वाघ, योगिता सोळंके, रोहिणी कदम, दिपाली कांदे, दिपाली लंगोटै,
मनिषा, सोनी खताळ, राधिका तिपटे व सुवर्णा पाणझडे परीश्रम घेतला. त्यांना डॉ डब्लु. एन. नारखेडे
व डॉ. जयश्री एकाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.