वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्या कापुस संशोधन योजना येथील
कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत टाकळी कुंभकर्ण वृक्षारोपणाचा
कार्यक्रम दि. 21 जुलै 2014 रोजी आयोजित करण्यात आला होता. तसेच याप्रसंगी
सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक सादरकरण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच श्री विनायकराव सामाले,
उपसरपंच सौ. शामाबाई काचगुंडे, तुळशीराम सामाले, सुंदरराव देशमुख यांच्या सह
गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश
कंटूले, उमाकांत लहाडे, गोविंद कंटाले, बळीराम कोटूळे, विजय लामदाडे, प्रशांत
गीते, किशोर जोजारे, खंडु साबळे, महेश बोदलोड, बबन गायके, राहूल मोरे, आकश
सुर्यवंशी, प्रदीप राठोड, प्रदिप हजारे, रायकर लक्ष्मण, कृष्णा पौळ या
कृषिदुतांनी प्रयत्न केले. हा उपक्रम कापुस संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. ए.
एस. जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एच. कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात
आला.