वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव
कार्यक्रमांतर्गत तण नियंत्रण योजनेच्या कृषिकन्यांनी दि. ८ जूलै रोजी मौजे जांब
येथे बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक उपक्रम राबविला. याप्रसंगी कृषिकन्यांनी सोयाबीन
पिकासाठी रायझोबियम, पिएसबी आणि ट्रायकोडर्मा यांची बिज प्रक्रिया कशी करावी याबद्दलचे
प्रात्यक्षिक शेतक-यांना करुन दाखविले. यास गावातील शेतकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
या उपक्रमास महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, तणनियंत्रण
योजनेचे विभाग प्रमुख डॉ. ए. एस. जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एल. बडगुजर
यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वतीतेसाठी कृषिकन्या प्रियंका रेंगे,
सुरेखा गरुड, चैताली चव्हाण, शारदा वाघ, कोमल शिंदे, अश्विनी ऐकाळ, अश्विनी
गोटमवाड, अश्विनी खिलारे, सविता ढगे, अनुजा मुलगीर, सत्वशिला लोणकर, शिल्पा
चवणे, सोनाली रोडे, रोहिणी शिंदे, कोमल खिल्लारे, ज्योती जळकोट, प्रिती थोरात
यांनी परिश्रम घेतले.