Sunday, January 10, 2016

वनामकृविच्या फिरती माती परिक्षण प्रयोगशाळेव्दारे नागर जवळा (ता. मानवत) येथे माती परीक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने जमीनीचे आरोग्य जागृती अभियान राबविण्यात येत असुन दिनांक जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे फिरती माती परिक्षण प्रयोगशाळेचे एक दिवसीय माती परिक्षण शिबीर आयोजीत केले होते. या शिबीरात गावातील साधारणत: दिडशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला मातीचे नमुणे गोळा करुन माती परिक्षणासाठी सादर केले. सदरिल अभियान विभाग प्रमुख डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ ए एल धमक व सय्यद जावेद जानी राबविते आहे. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी कृष्णा होगे व इतर विद्यार्थीनीं, विभागातील कर्मचारी व समस्त गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.

टिप - सदरिल बातमी विभाग प्रमुख, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त.