Tuesday, June 30, 2020

वनामकृवित सेंद्रीय शेती आणि सौरउर्जेचा कार्यक्षम वापर यावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शुशक्तीचा योग्य वापर योजने वतीने दिनांक 26 जुन रोजी शास्त्रज्ञ व शेतक­यांकरिता झुम अॅप क्लाउड मिटींग व्दारे एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल प्रशिक्षणात शेतक­यांना सेंद्रीय शेती व्यवस्थापन या विषयावर प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी तर सौरउर्जेचा वापर व गोबरगॅस तंत्रज्ञान यावर डॉ. राहुल रामटेके यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेती सेंद्रीय शेती व्यवस्थापनात शेतक­यांनी टप्याटप्याने मार्गक्रमन करावे, सेंद्रीय शेतीसाठी लागणा­या निविष्ठा स्वत: तयार कराव्यात. सेंद्रीय प्रमाणीकरणासाठी सर्व शेती कामे निविष्ठा यांच्या योग्य नोंदी घ्याव्यात, असे सांगितले तर डॉ. राहुल रामटेके यांनी सौर उर्जेचा वापर आज सर्वच क्षेत्रात मोठया प्रमाणावर वाढला आहे, शेती क्षेत्रात शेतकरी विविधि कामांसाठी सौर उर्जेचा वापर करुन योग्य वेळी शेती कामे करु कतात याचा शेतक­यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  
प्रश्‍नोत्‍तर कार्यक्रमा गोवींद देमुख, श्री. गोवर्धन र्मा इटोलीकर, प्रताप काळे, साहेब पुंडकरे, सुमंत मानकर आदी  शेतकरी बांधवानी विचारलेल्‍या कृषि तंत्रज्ञान विषयक प्रश्‍नांना शास्त्रज्ञांना उत्‍तरे दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशिक्षणचे आयोज शुशक्तीचा योग्य वापर योजनाच्‍या प्रभारी अधिकारी  डॉ. स्मिता सोळंकी यांनी केले. कार्यक्रम यस्वीतेकरिता श्री. अजय वाघमारे, नांदेड केव्‍हीकेचे डॉ. देविकांत देमुख, कर्डा केव्‍हीकेचे रविंद्र काळे, डॉ. सुनिल जावळे, श्री. सति कटारे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात मराठवाडयातील 90 पेक्षा जास्त शेतक­यांनी सहभाग नोंदविला.

वनामकृवित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व प्रकल्प संचालक आत्मा परभणी यांच्यातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत दिनांक 22 जून ते 26 जून दरम्यान शेतीशाळा प्रशिक्षकांकरिता पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या हस्ते झाले, यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री. के. आर. सराफ, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले, शेतीशाळा प्रशिक्षकांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य वाणाची निवड पासून ते काढणीपर्यंत तांत्रिक माहिती देऊन मार्गदर्शन करावे सदरील प्रशिक्षणाद्वारे उपस्थित सर्व प्रशिक्षकांनी त्यांच्या कृषि विषयक तांत्रिक अडचणींची तंज्ज्ञा मार्फत सोडवणूक करून शेतकऱ्यांना विद्यापीठ तंत्रज्ञानाविषयी अवगत करावे, असा सल्‍ला दिला.
श्री. एस. बी. आळसे यांनी प्रशिक्षकांना पूर्ण ज्ञान घेऊन शेतकऱ्यांच्या समस्येचे शेतावर जाऊन समाधान करावे, जेणेकरून या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच विद्यापीठाशी वेळोवेळी संपर्कात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करावे, असे सांगितले तर डॉ. पी. आर. देशमुख यांनी विद्यापीठांची कृषि विषयक प्रकाशने व तांत्रिक साहित्य, कृषी दैनंदिनी, याचा वापर प्रशिक्षकांनी शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना करावा असे सांगितले.
विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ.यु.एन आळसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री.के.आर.सराफ प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा यावेळी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विभुते व कु. मोनिका चौदंते यांनी केले.
सदरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील विविध तज्ञांनी जमीन निवडीपासून ते लागवडी पर्यंत खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन पासून ते पीक काढणीपर्यंत, शेतकरी निवडीपासून ते निरीक्षणे घेण्यापर्यंत, हवामान बदलापासून ते शेतकऱ्यांशी संवाद कौशल्य साधने या विषयावर तज्ञांनी सविस्तर असे विविध सत्रामध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र तर्फे प्रा. डी.डी. पटाईत, डॉ. मधुमती कुलकर्णी यांनी तर आत्मा परभणी यांच्यातर्फे श्री. विभुते, कु. मोनिका चौदंते,श्री अंबुरे, श्री कदम यांनी साहाय्य केले.  सदरील प्रशिक्षणाद्वारे एकूण 40 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.

Monday, June 29, 2020

कोरडवाहु शेतीत शाश्‍वत उत्‍पादनाकरिता अजैविक ताण सहनशील पिकांच्‍या वाण निर्मितीची गरज .... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित आयोजित डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन

बदलत्‍या हवामानाचा कोरडवाहु शेतीत पिक उत्‍पादनावर मोठा परिणाम होत आहे, शाश्‍वत उत्‍पादनाकरिता डिजिटल साधने व कृत्रिम बुध्‍दीमत्‍ताच्‍या मदतीने संशोधनाच्‍या आधारे वाढते तापमान, आर्द्रता व जमीनीतील क्षारता आदी अजैविक ताणास सहनशील वाण निर्मिती करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आाणि जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प (नाहेप), भारतीय कृषी अनुसंधान परिषदनवी दिल्ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २९ जुन ते ३ जुलै दरम्‍यान डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन याविषया वरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या उदघाटनाप्रसंगी (२९ जुन रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन धारवाड (कर्नाटकयेथील कृषी विज्ञान विद्यापीठ कुलगुरु मा. डॉ. एम. बी. चेटटी, ऑस्ट्रेलिया येथील युनीव्हर्सीटी ऑफ वेस्टर्नचे संचालक मा. प्रा. कदमबोट सिद्यीकी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरु मा. डॉ. एम. बी. चेटटी यांनी हवामान बदलामुळे शेती उत्‍पादन वाढीवर मर्यादा आल्‍या असुन पिक विविध अजैविक ताणाचा परिणाम होत आहे. हवामान अनुकुल तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता  वनस्‍पती अनुवंशिक शास्‍त्र संशोधनात जैव तंत्रज्ञान व बायोइन्फॉरमॅटिक्स तंत्राचा वापर करावा, असा सल्‍ला दिला.

मा. प्रा. कदमबोट सिद्यीकी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा जागतिक पातळीवर कृषि क्षेत्रावर होत असुन वाढत्‍या जागतिक लोकसंख्‍येस अन्‍न सुरक्षेचे मोठे आव्‍हान आपल्‍या समोर आहे. कृषि बुध्‍दीमत्‍ता व डिजिटल तंत्रज्ञान वापर करून काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, असे ते म्‍हणाले.

यावेळी नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार व शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनीही मार्गदर्शन केले. नाहेप प्रकल्‍पाबाबत डॉ गोपाल शिंदे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गोदावरी पवार यांनी केले तर आभार डॉ राजेश कदम यांनी मानले. प्रशिक्षणात अमेरिकाजपानब्राझीलनेपाळपाकिस्‍तानइस्त्राईल, फिलिपीन्सपोर्तुगाल, अफगाणिस्तान, घाना, केनिया, नायजेरिया आदीसह ४० आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थीचा सहभागी आहे. प्रशिक्षणाचे आयोजन नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदेविभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षणतथा प्रकल्‍प उपअन्वेषक डॉ. राजेश कदमसहयोगी संचालक (बियाणेडॉ. के. एस. बेगआयोजन सचिव डॉ. गोदावरी पवार आदींनी केले आहे.

सदरील ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी कृषी वनस्पती शरीरक्रिया शास्त्राशी निगडीत संशोधकप्राध्यापक व आचार्य विद्यार्थी यांना जागतिक हवामान बदलाला अनुसरुन विविध पिकांचे नवीन वाणांची निर्मिती व संशोधन करतांना पिकांची शरीरक्रियाशास्त्र समजुन घेऊन होणा-यां बदलाची आधुनिक डिजीटल साधनांची ओळख, व संशोधनात त्यांचा अंतर्भाव आदींबाबत देश - विदेशातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया येथील वेस्टर्न युनीव्हर्सीटीचे संचालक प्रा. कदमबोट सिद्यीकी, अमेरीका येथील कान्स स्टेट युनीव्हर्सीटीचे डॉ. पी. व्ही. वरप्रसादअमेरिकास्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदे माजी विभाग प्रमुख डॉ पी. एस. देशमुखकेरळ येथील सीपीसीआरआयचे निवृत्त संचालक डॉ. वेलामुर राजगोपालआयसीएआरतील वनस्पती शरीरक्रीया शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. व्ही. चीन्नुस्वामीआनुवंशिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी. भारव्दाजहैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे डॉ. एम. माहेश्वरीयुनिव्हरसीटी ऑफ इलीनीऑस (अमेरीकाचे शास्‍त्रज्ञ डॉ. नितीन कदमडॉ. पुसा (बिहारयेथील राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापिठाचे डॉ राजीव बहुगुनाजपान येथील वरिष्ठ संशोधक डॉ. व्ही. देशमुख आदींचा समावेश आहे.

वनामकृवित एकात्मिक तण व्यवस्थापन यावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रक्लप (नाहेप) व कृषि विद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 24 जुन रोजी तणनाशकांचा कार्यक्षम वापर व एकात्मिक तण व्यवस्थापन या विषयांवर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्‍या  उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, लातूर विभागीय कृषि सहसंचालक डॉ. टी. एन. जगताप, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी.एल. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणा डॉ. धर्मराज गोखले यांनी पिक लागवडीत तण व्यवस्थापणास मोठे महत्‍व असुन तणामुळे विविध पिकामध्ये 30 ते 70 टक्क्यापर्यंत पिक उत्पादनात घट येत असल्‍याचे सांगितले तर   डॉ. देवराव देवसरकर यांनी रासायणिक तणनाशकाचा वापर आवश्यक ठिकाणी करुन एकात्मीक तण व्यवस्थापावर जास्त भर देण्‍याचा सल्‍ला दिला. भाषणात डॉ. टी. एन. जगताप यांनी सद्याच्या परिस्थीतीसोयाबीनची उगवणुक कमी झाल्यामुळे ज्या शेत-यांनी तणनाशकाचा वापर केला असेल त्याच ठिकाणी इतर कोणती पिके घेता येतील यावर शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन करावे असे सांगितले तर डॉ. डी. एल. जाधव यांनी तण खाई धन या म्हणी प्रमाणे तणाचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे असल्‍याचे सांगितले.

तांत्रीक सत्रा तणनाशकांचा अचुक व कार्यक्षम वापर यावर डॉ. सुनीता पवार यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. अशोक जाधव यांनी नगदी पीके ऊस, हळद, भाजीपाला, फळपिकातील तण व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्रशिक्षणात 450 प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कृषि विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमाचे विद्यार्था, प्राध्यापक,   शेतकरी, विविध कृषि संस्थेतील शास्त्रज्ञ आदींनी सहभाग नोदंवीला. प्रशिक्षणाचे आयोजन कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. व्ही. आसेवार होते. प्रशिक्षणात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या  तण व्यवस्थापनावरील प्रश्नांची उत्तर दिले. प्रशिक्षणाचे प्रास्तविक डॉ. बि. व्ही. आसेवार यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तांत्रीक नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांच्‍यासह डॉ. स्वाती मुंढे, डॉ. रश्मी बंगाळे, डॉ. अविनाश काकडे आदींनी पुढाकार घेतला.

Sunday, June 28, 2020

वनामकृवित डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन यावरील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन

प्रशिक्षणात आंतरराष्‍ट्रीय र्कीतीचे संशोधक करणार मार्गदर्शन तर ४० आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थीसह देशातील ४५० प्रशिक्षणार्थीचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आाणि जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प (नाहेप), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २९ जुन ते ३ जुलै दरम्‍यान डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन या विषया वरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन २९ जुन रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन धारवाड (कर्नाटक) येथील कृषी विज्ञान विद्यापीठ कुलगुरु मा. डॉ. एम. बी. चेटटी, ऑस्ट्रेलिया येथील युनीव्हर्सीटी ऑफ वेस्टर्नचे संचालक मा. प्रा. कदमबोट सिद्यीकी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची उपस्थिती लाभणार आहेत. 

सदरील ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी कृषी वनस्पती शरीरक्रिया शास्त्राशी निगडीत संशोधक, प्राध्यापक व आचार्य विद्यार्थी यांना जागतिक हवामान बदलाला अनुसरुन विविध पिकांचे नवीन वाणांची निर्मिती व संशोधन करतांना पिकांची शरीरक्रियाशास्त्र समजुन घेऊन होणा-यां बदलाची आधुनिक डिजीटल साधनांची ओळख, व संशोधनात त्यांचा अंतर्भाव आदींबाबत देश - विदेशातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया येथील वेस्टर्न युनीव्हर्सीटीचे संचालक प्रा. कदमबोट सिद्यीकी, अमेरीका येथील कान्स स्टेट युनीव्हर्सीटीचे डॉ. पी. व्ही. वरप्रसाद, अमेरिकास्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदे माजी विभाग प्रमुख डॉ पी. एस. देशमुख, केरळ येथील सीपीसीआरआयचे निवृत्त संचालक डॉ. वेलामुर राजगोपाल, आयसीएआरतील वनस्पती शरीरक्रीया शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. व्ही. चीन्नुस्वामी, आनुवंशिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी. भारव्दाज, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे डॉ. एम. माहेश्वरी, युनिव्हरसीटी ऑफ इलीनीऑस (अमेरीका) चे शास्‍त्रज्ञ डॉ. नितीन कदम, डॉ. पुसा (बिहार) येथील राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापिठाचे डॉ राजीव बहुगुना, जपान येथील वरिष्ठ संशोधक डॉ. व्ही. देशमुख आदींचा समावेश आहे.

प्रशिक्षणाकरिता देश विदेशातुन दिड हजार पेक्षा जास्‍त अर्ज प्राप्त झाले असुन यातुन ४९० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे, यात अमेरिका, जपान, ब्राझील, नेपाळ, पाकिस्‍तान, इस्त्राईल, फिलिपीन्स, पोर्तुगाल, अफगाणिस्तान, घाना, केनिया, नायजेरिया आदीसह ४० आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थीचा सहभागी आहे. प्रशिक्षणाचे आयोजन नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) तथा प्रकल्‍प उपअन्वेषक डॉ. राजेश कदम, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, आयोजन सचिव डॉ. गोदावरी पवार आदींनी केले आहे.


Friday, June 26, 2020

ऊस पीक व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वनामकृवी आणि रिलायन्स फाऊंडेशन चा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दिनांक 25 जुलै रोजी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमा प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर, विस्तार कृषी विध्यावेत्ता डॉ यु एन आळसे, डॉ मिर्झा बेग, डॉ दिगांबर पटाईत आदींनी मार्गदर्शन केले .

शेतकरी बांधवाना उस बेने निवड, उस आंतर पिक, ऊस बेने प्रक्रिया ,एकात्मिक खत व्यवस्थापन , सेंद्रीय खते, रासायनिक खते, ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, आंतर मश्यागत, पाणी व्यवस्थापन आदीवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवानी आपले विविध विषयांवर प्रश्न विचारले, त्‍यास विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली.

मराठवाडा विभागात उस पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते, त्यामुळेच पाण्याची उपलब्धता असलेल्या तालुक्यामध्ये उस पिक लागवड केली जाते त्या करिता उस उत्पादक शेतकरी बांधवाना मार्गदर्शन मिळावे याच उद्देश्याने

कॉन्फरन्स मध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोउन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणेकार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.


Thursday, June 25, 2020

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात कौशल्य विकासावर ऑनलाईन प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत गोळेगांव (हिंगोली) कृषि महाविद्यालय व सिंजेंटा फाउंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि क्षेत्रातील ग्रामीण युवकांचा कौशल्य विकासया प्रकल्पांतर्गत कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम सत्रातील विद्यार्थ्‍यांकरिता एक महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन 23 जुन ते 22 जुलै दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक 23 जुन रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्राध्‍यापक डॉ गिरीष जेऊघाले, प्रकल्पाचे अखिल भारतीय प्रमुख श्री. रविंद्र कटरे, सिंजेंटा फाउंडेशन, इंडियाचे प्लेसमेंट अधिकारी श्री. वैभव जगताप आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, सद्यस्थितीत कृषि उद्योगास मोठा वाव आहे, प्रत्‍येक कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना नौकरी मिळेलच असे नाही, त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी कृषि उद्योजक होण्‍याचा पर्याय निवडावा, असा सल्‍ला देऊन लॉकडाउनच्या काळात ऑनलॉईन विद्यार्थ्‍यांना ही चांगली संधी असल्‍याचे सांगितले तसेच सदरिल प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषि उद्योजकतेची बीजे रोवण्‍यास मदत होईल अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. प्रमुख अतिथी डॉ. जेऊघाले यांनी हा स्तुत्य उपक्रम असल्‍याचे सांगितले तर श्री. रविंद्र कटरे यांनी आपल्या मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रकल्पाचे केंद्र प्रमुख श्री. भुषण साठे यांनी केले. प्रशिक्षण यशस्‍वीतेकरिता डॉ. सुनिल उमाटे, प्रा. महेश तनपुरे आदीसह सिंजेंटा फाउंडेशन, इंडिया व महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरील प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या विद्यार्थ्‍यांना स्वयंरोजगारासोबतच विविध राष्ट्रीय, बहूराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणाकरिता कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील अंतीम सत्राच्‍या 27 विद्यार्थ्‍यांची निवड करण्‍यात आली आहे.

Tuesday, June 23, 2020

वनामकृवित भविष्यातील कृषि यांत्रिकीकरण विषयावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), परभणी च्या वतीने वर्तमान व भविष्यातील कृषि यांत्रिकीकरण या विषया वरील 18 ते 23 जुन या कालावधीत एक आठवडयाचे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक 18 जुन रोजी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु  मा. डॉ. व्यंकट मायंदे होते. सदरील कार्यक्रमात भारतीय कृषि अभियांत्रिकी संघटनेचे अध्यक्ष डॉ. इंद्रामनी मिश्रा, नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, डॉ. मनजित सिंग, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे आदी प्रमुख सहभाग होता.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ अशोक ढवण यांनी डिजीटल यांत्रिकीरणावर तरुण शास्त्रज्ञांनी पारंगत होऊन त्यांचा जास्तीत जास्त  शेतक-यां पर्यंत प्रसार करावा असा सल्‍ला दिला तर शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकरीता कृषि यांत्रिकीकरणाचे  महत्व या विषयावर मा. डॉ.व्यंकट मायंदे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. इंद्रामनी मिश्रा यांनी कृषि यांत्रिकी गरज यावर मार्गदर्शन केले तर नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार यांनी वाढत्या लोकसंख्येचा अन्न सुरक्षिततेसाठी कृषि यांत्रिकी करणाची गरज असल्याचे सांगितले.

डॉ. मनजित सिंग यांनी कोरोना महामारीच्या काळात कृषि यांत्रिकी करणाच्या वापरावर भर देण्याचे विशद केले. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य, डॉ. उदय खोडके, प्रकल्पाचे प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे, उपप्रकल्प संचालक प्रा. संजय पवार आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सदरील प्रशिक्षणात देश व विदेशातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असुन यात अमेरीकेतील वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठ शास्त्रज्ञ, पंजाब कृषि विद्यापीठ, भा.कृ.अ.प.अंतर्गत केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान भोपाळ, केंद्रीय कोरडवाहु शेती अनुसंधान संस्था हैद्राबाद, जी.बी.पंत कृषी विद्यापीठ, पंतनगरआय.आय.एस.आर.लखनऊआय.आय.टी. खरगपुर येथील प्रमुख शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रशिक्षाणात देशातील 22 राज्या मधुन 423 तर इतर 10 देशातील 17 प्रशिणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे. यात भारतातील ‍विविध कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक व विविध कृषि संस्थेतील शास्त्रज्ञ यांचा सहभाग आहे. सदरील परिसंवाद नाहेप प्रकल्पांतर्गत घेण्यात येत असुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प अन्वेषक डॉ.गोपाळ शिंदे  प्रा.संजय पवार, आयोजक प्रा. दयानंद टेकाळे, प्रा.दत्तात्रय पाटील आदी परिश्रम घेत आहेत.  सुत्रसंचालन डॉ. विना भालेराव यांनी केले तर आभार प्रा. दत्तात्रय पाटील यांनी मानले. तांत्रिक सहाय्य डॉ. रश्मी बंगाळे, डॉ. अविनाश काकडे,  इंजि. शिवानंद शिवपुजे, इंजि. शैलेश शिंदे, इंजि. गोपाळ रणेर आदींनी केले.  

Sunday, June 21, 2020

कापुस व सोयाबीन पीक व्यवस्थापनावर ऑनलाईन मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाकरिता दिनांक 19 जुन रोजी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यंदा वेळेवर पाऊस पडलेला असुन सध्या खरीप हंगाम पेरणीला सुरुवात झालेली आहे. सद्या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितित शेतकऱ्यांना अधिकाधिक तांत्रिक माहिती मिळावी या उद्देशाने विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर व विस्तार कृषी विध्यावेत्ता डॉ यु एन आळसे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यात सोयबीन, कपाशी, तूर इत्यादी पिकांचे नियोजन कसे असावे याबद्दल माहिती देण्यात आली. बीज प्रक्रिया, बीज निवड, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण या विषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करतांना यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, शेतक-यांनी उत्‍पादन वाढीच्‍या द्ष्‍टीने विविध पिकांच्‍या चांगल्‍या वाणांची निवड करावी, पेरणी पुर्वीच उगवणशक्ती तपासुन घ्‍यावी, तसेच बीज प्रक्रिया, खताचे नियोजन शिफारशीत मात्रेत करायला पाहिजे, असे सांगुन करोंना विषाणू परिस्थितीत  शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असतांना सामाजिक अंतर जोपासण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. विस्तार कृषी विध्यावेत्ता डॉ यु एन आळसे यांनी  बीज प्रक्रिया, बीज निवड, घरघुती बियाण्याचा वापर, नवीन संशोधित वाण, खत व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आदीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे खरीप पूर्व नियोजन ,जमीन मशागत,  हुमणी नियंत्रणाचे उपाय, बीज प्रक्रिया याबाबत प्रश्न विचारले. या कॉन्फरन्स मध्ये जिल्ह्यातील मोठया संख्‍येने शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे यांनी केले तर कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.

Saturday, June 20, 2020

वनामकृवि विकसित पाच फणी रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) यंत्र सोयाबीन उत्पादकांना ठरणार वरदान ......... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मौजे साळापुरी ये‍थे बीबीएफ यंत्राचे प्रात्‍यक्षिक व मार्गदर्शन

मराठवाडयातील बहुतांश शेती पाऊसावर अवलंबुन आहे, हवामान बदलामुळे पावसाचे आगमनवितरण तसेच निर्गमन यामध्ये बराचसा बदल आढळुन येत असुन याचा परिणाम सोयाबीन उत्‍पादनावर दिसुन येत आहे. पडणा-या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करून त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणेही आवश्यक आहे. याकरिता परभणी कृषी विद्यापीठ विकसित पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र सोयाबीन उत्‍पादकांना निश्चितच वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व पोकरा प्रकल्‍पकृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने परभणी तालुक्‍यातील मौजे साळापुरी येथे शेतक-यांच्‍या शेतात दिनांक 20 जुन रोजी आयोजित रूंद वरंबा व सरी (बीबीएफपध्‍दतीने सोयाबीनची पेरणीचे प्रात्‍यक्षिक कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचे सदस्‍य श्री गणेश घाटगे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी, सरपंच श्री सतिश घाटगे, पंचायत समिती सदस्‍य श्री अमोल चव्‍हाण, उपविभागीय कृषी अधिकारी श्री सागर खटकाळेडॉ राहुल रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सदरिल बीबीएफ यंत्र शेतक-यांना व्‍यवसायिकदृष्‍टया उपलब्‍ध करण्‍याकरिता विद्यापीठाने पुणे येथील रोहीत कृषि इंडस्ट्रिज सोबत सांमजस्‍य करार केला असुन पुढील काही वर्षात बीबीएफ पध्‍दतीने सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढविण्‍याचे कृषि विभाग व विद्यापीठाचे  उद्दीष्‍ट आहे. शेतकामाच्‍या वेळी मजुरांची कमतरता व वाढती मजुरी यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाची गरज असुन प्रत्‍येक गावात शेती अवजारे भाडेतत्‍वावर देणारे केंद्राची स्‍थापना करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

बीबीएफ यंत्राबाबत प्रात्‍यक्षिकासह माहिती देतांना कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंळी म्‍हणाल्‍या की, सोयाबीन मध्‍ये तण व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्टीने उगवणपुर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीअसुन या बीबीएफ यंत्राव्‍दारे पेरणी सोबतच तणनाशक फवारता येते. या पध्‍दती मुळे पावसाचे पाणी स-यांमध्ये मुरते, मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकासतसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहुन पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते व पिकाची वाढ जोमदारपणे होते. या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने टॅक्टरच्या सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारा माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होईल.

जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकरी डॉ संतोष आळसे म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन उपलब्‍ध झालेल्‍या बीबीएफ यंत्राने यावर्षी प्रायोगिकतत्‍वावर जिल्‍हयातील पोकरा प्रकल्‍पांतर्गत निवडक गावात शेतक-यांच्‍या शेतावर पेरणी करण्‍यात येणार आहे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन हे बीबीएफ यंत्र खरेदी केल्‍यास निश्चितच मोठा प्रमाणात शेतक-यांचा फायदा होईल, याकरिता कृषि विभागातील योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले.  यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत तर प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी भविष्‍यातील यांत्रिकीकरणाबाबत माहिती दिली.

यावेळी डॉ स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित पाच फणी रूंद सरी वरंबा बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी कशी करावी, यंत्राने तणनाशक फवारणी, पेरणी, व रासणी करण्‍याचे प्रात्‍यक्षिक शेतकरी भागवत घाटगे यांच्‍या पाच एकर शेतावर दाखविले. मौजे साळापुरी येथील काही निवडक शेतक-यांच्‍या साधरणत: 30 एकर जमिनीवर कृषि विभागाच्‍या मदतीने पेरणी करण्‍यात येणार आहे. प्रात्‍यक्षिक पाहणी करिता गावातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री दिपक नागुरे यांनी केले तर आभार तालुका कृषि अधिकारी श्री पी बी बनसावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गजानन घाटगे, बाबासाहेब घाटगे, अतुल चव्‍हाण आदीसह कृषि विभाग व कृषि विद्यापीठातील अधिकारी यांनी परिश्रम घेतले.