Sunday, April 30, 2017

वनामकृवितील शास्‍त्रज्ञ डॉ एस जी बोरकर यांचा संशोधनाची आंतरराष्‍ट्रीय पातळीवर दखल

एनसीबीआयकडुन क्‍लेबसिएल्‍ला न्‍युमोनी जीवाणुच्‍या प्रजातीस डॉ बोरकर यांचे नाव
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एस जी बोरकर यांचे नाव क्‍लेबसीएल्‍ला न्‍युमोनि जीवाणुच्‍या प्रजातीस देण्‍यात आले असुन या जीवाणुमुळे मानवामध्‍ये न्‍युमोनिया म्‍हणजेच फुफूसदाह हा जीवघेणा आजार होतो. हा जीवाणु वनस्‍पतीमध्‍येही रोगास कारणीभुत असल्‍याचे डॉ. एस. जी. बोरकर व त्‍यांचा संशोधक विद्यार्थी अजयश्री टी एस यांना संशोधनात आढळुन आले आहे. अमेरिकेतील राष्‍ट्रीय जैवतंत्रज्ञान माहिती केंद्रात (एनसीबीआय) या जीवाणुच्‍या प्रजातीचे जनुक १६ एसआरआरएनए अनुक्रमीत करून जतन करण्‍यात आले आहे. अमेरिकातील राष्‍ट्रीय जैवतंत्रज्ञान विषयक केंद्रानी सदरिल क्‍लेबसीएल्‍ला न्‍युमोनी प्रजातीस बोरकर असे नाव दिले आहे. क्‍लेबसीएल्‍ला प्रजातीस सहसा अंक दिले जातात परंतु शासत्रज्ञाचे नाव देण्‍याचे हे एकमेव उदाहरण आहे. डॉ बोरकर हे प्रख्‍यात आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे वनस्‍पती जीवाणुशास्‍त्रज्ञ असुन ते भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीधारक आहेत. भारत सरकारने डॉ बोरकर यांना वनस्‍पती जीवाणुशास्‍त्रात विशेष प्राविण्‍य मिळविण्‍यासाठी पोस्‍ट डॉक्‍टरेट करण्‍यासाठी १९८४ साली फ्रान्‍समध्‍ये पाठवले होते. डॉ बोरकर यांनी वनस्‍पती जीवाणुशास्‍त्रात केलेल्‍या संशोधनासाठी वॉशिग्‍टन येथील आंतरराष्‍ट्रीय विद्यापीठाने १९९९ साली डी. एस्‍सी. पदवी बहाल केली. त्यांची प्‍लॅन्‍ट बॅक्‍टेरिओलाजी विषयातील दोन पुस्‍तके अमेरिकेत प्रकाशित झाली असुन जगभर प्रसारित झाली आहेत. त्‍यांनी संशोधीत केलेल्‍या डाळींबावरील जीवणुजन्‍य करपा व्‍यवस्‍थापनासाठी महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचा प्रोटोकॉल नाशिक जिल्‍हातील शेतकरी यशस्‍वीरित्‍या वापरत आहेत. याबाबत डॉ बोरकर यांचे विविध स्‍तरातुन अभिनंदन करण्‍यात येत आहे.

Saturday, April 29, 2017

गृहविज्ञान महाविद्यालयात बालविकासावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयात बालकांच्‍या विकासात शाळांची भुमिका यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 28 एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. यात सेवांतर्गत 41 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य तथा बालविकास तज्ञा प्रा विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते. यावेळी त्‍यांनी बालकांच्‍या सर्वांगिण विकासाचे विविध घटक, बालविकासासा‍ठी पोषक वातावरण निर्मितीमध्‍ये शिक्षकांची भुमिका, शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या वर्तन समस्‍यांचे निराकरण व काळजी या विषयावर प्रात्‍यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्राप्‍त शास्‍त्रोक्‍त बालविकासा संबंधीच्‍या माहिती आधारे शिक्षकांनी विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिण विकास घडविण्‍याकरिता वातावरण निर्मिती करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन प्रा़. विशाला पटणम यांनी केले. कार्यशाळेवर आधारीत प्रश्‍न मंजुषा घेण्‍यात येऊन विजेत्‍यांना स्‍टार अॅवार्डस प्रदान करण्‍यात आले.

Sunday, April 23, 2017

गृहविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थींनीनी केले प्रशिक्षणाचे यशस्‍वी आयोजन

अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागातील अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेल्‍या अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रम अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थीनींनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 15 ते 20 एप्रिल दरम्‍यान आयोजन केले होते. सदरिल विद्या‍र्थीनींनी पाच दिवसीय बेसीक स्टिचिंग विथ हाय स्‍पीड मशीन्‍स व तीन दिवसीय वारली चित्रकला व हस्‍तकला यावर प्रात्‍यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्‍वीरित्‍या आयोजन केले. यात शहरातील वीस गृहिनी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थींनी सहभाग नोंदविला. पदवीच्‍या आठव्‍या सत्रात म्‍हणजेचे अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमात घेतलेल्‍या ज्ञान व कौशल्‍याच्‍या आधारे विद्यार्थींनीनी सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन करून सहभागी महिलांना प्रशिक्षित केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपात प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्‍या हस्‍ते विद्यार्थीनीनीचे अभिनंदन करून प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षण विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर व प्रा. इरफाना सिद्दीकी यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींनी आरती भारस्‍वाडकर, गितांजली फोफसे व ऐश्‍वर्या शिंदे यांनी आयोजित केले होते.

Friday, April 14, 2017

वनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्‍साहात साजरी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी सर्वाना डॉ. आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या. विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात डॉ आंबेडकरांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्या प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ ए एस कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी केले आभार डॉ अनिस कांबळे यांनी मानले. 

वनामकृविच्या वर्षा विद्यार्थीनीच्या वसतीगृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

 

Wednesday, April 12, 2017

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्या‍समालिका


वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिकेचे आयोजन दिनांक १२ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. या अभ्‍यासमालिकेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ राकेश आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. जी. पी. जगताप, डॉ. व्‍ही. एस. खंदारेडॉ. जे. व्‍ही. एकाळेडॉ. मिलिंद सोनकांबळे, प्रा. आर व्‍ही चव्‍हाण, डॉ. पी. के. वाघमारे, प्रा अनिस कांबळे, ममता पतंगे आदिसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. 

Tuesday, April 11, 2017

विद्यार्थ्‍यांनी स्‍वत: तील बलस्‍थाने व मर्यादा ओळखल्‍या पाहिजेत....प्रसिध्‍द व्‍यक्‍ते डॉ. सचिन देशमुख

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांना निरोप


जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी स्‍वत: तील बलस्‍थाने व मर्यादा ओळखल्‍या पाहिजेत. जीवनात समस्‍या येतात, त्‍यासोबत त्‍यांची उत्‍तरेही असतात. समस्‍यांना तोंड दिल्‍यास माणुस खंबीर बनतो, असे प्रतिपादन पुणे येथील स्‍त्री रोग तज्ञ तथा प्रसिध्‍द व्‍यक्‍ते डॉ सचिन देशमुख यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयातील कृषि पदवीच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ ए एस कदम, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ सचिन देशमुख पुढे म्‍हणाले की, मनुष्‍य अनेक काल्‍पनिक भीतीमुळे जीवनात तणावग्रस्‍त असतो. युवकांनी अर्थहिन वादविवादात वेळ व ऊर्जा वाया घालु नये. भुतकाळाचा विचार न करता, मी काय करू शकतो यांचा विचार करा. समाजासाठी कार्य करा, अपयश ही यशाची पहिली पायरी असुन आपले ज्ञान व कौशल्‍य वृध्‍दींगत करण्‍यासाठी सतत प्रयत्‍नशील रहावे.  
कार्यक्रमात अंतिम सत्रातील विद्यार्थ्‍यी संदिप खरबळ व मीरा आवरगंड यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात नुकतेच बॅकिंग व इतर स्‍पर्धा परिक्षेत यश प्राप्‍त केलेल्‍या महाविद्यालयाच्‍या एकतीस विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. निरोप समारंभाचे आयोजन सहाव्‍या सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्‍त‍ाविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन

Monday, April 3, 2017

कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील रासेयोच्‍या सत्‍तर स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे जांब (ता.जि. परभणी) येथे आयोजित करण्यात आले होते. सदरिल शिबिराच्‍या समारोपाप्रसंगी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कनकदंडे, सरपंच श्री. संजय स्वामी, उपसरपंच श्री. अजय जामकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा वाव्हळे, प्रगतशील शेतकरी सुभाषराव लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरचे उद्घाटन विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक ढवन म्‍हणाले राष्‍ट्रीय सेवा हि एक निरंतर चालणारी संस्कारप्रक्रिया असल्याचे मत त्‍यांनी व्यक्त केले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कनकदंडे यांनी रक्तदानाचे महत्व विषद केले व रक्तदान शिबिरांची संख्या शहरात कमी झाली असल्‍यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करताना रक्तपेढ्यांना कसरत करावी लागत आहे, अशी खंत व्यक्त केली. थॅलसेमिया ग्रस्त रुग्णांना तर सतत रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी रक्तदानात सहभाग नोंद्वावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिबिरात ७० स्वयंसेवकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी विजयकुमार जाधव पवार यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. पपीता गोरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेकरिता कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय पवार, प्रा. विजयकुमार जाधव, प्रा. रवींद्र शिंदे, डॉ. अनंत बडगुजर आदींसह स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 

रासेयो अंतर्गत मौजे जांब येथे विविध वनौषधी रोपांचे वाटप व परीसर स्‍वच्‍छता मोहिम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय व कृषी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे जांब (ता.जि. परभणी) येथे आयोजित करण्यात आले होते. सदरिल शिबिरात ा ेवा योजनेच्‍या राविविध वनौषधी रोपांचे वाटप गावातील जिल्‍हा परिषदेच्‍या परिसरात लागवडी करीता वाटप करण्‍यात आले. तसेच परिसर स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. रामप्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले,  प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, प्रभारी कार्यक्रम समन्वयक प्रा. गणेशराव गुळभिले, सरपंच श्री. संजयराव स्वामी, उपसरपंच श्री. अजयराव जामकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा वाव्हळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आपल्‍या मार्गदर्शनात डॉ. रामप्रसाद देशमुख यांनी आदर्श मानवी जीवनमुल्यांची मांडणी केली. प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले व डॉ. अशोक कडाळे यांनी वैयक्‍तीक स्‍वच्‍छतेचे महत्‍व सांगुन वैयक्‍तीक स्‍वच्‍छता व परीसर स्‍वच्‍छता ही मानवाच्‍या आरोग्‍याच्‍या द़ष्टिीने महत्‍वाची बाब असुन सामाजिक बांधिलकी म्‍हणुन स्‍वयंसेवकांनी याचा प्रचार करावा, असा सल्‍ला दिला.

विविध वनौषधी रोपांचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गावातील जिल्‍हा परिषदेच्‍या परिसरात लागवडी करीता वाटप करण्‍यात आले. स्‍वच्‍छता मोहीमे अतंर्गत स्‍वंयसेविकांनी जिल्हा परिषद शाळा व गावपरिसर स्वच्‍छ केला. प्रास्तविक कार्यक्रमाधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमधिकारी प्रा. संजय पवार यांनी केले.  कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. रवींद्र शिंदे, कार्यक्रमाधिकारी डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. अनंत बडगुजर, ज्ञानेश्वर शिंदे, केदार बारोळे, प्रियंका वालकर, नेहा कच्छवे, गोविंद टोम्पे, मयूर असेवार आदीसह रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वंयसेविकांनी परिश्रम घेतले.

Sunday, April 2, 2017

पाण्याचा कार्यक्षम वापर हाच समृद्धीचा मार्ग ........ कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू

रासेयोच्‍या विशेष शि‍बिरात मौजे जांब येथे जल जागृती व उमेद जागृती कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे जांब (ता. जि. परभणी) येथे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विशेष शि‍बिरात मौजे जांब येथे जलजागृती व उमेद जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, शिबिराचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, सरपंच श्री. संजयराव स्वामी, उपसरपंच श्री. अजयराव जामकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा वाव्हळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू म्‍हणाले की, राज्यातील ८० टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून असुन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल तर सूक्ष्मसिंचनाचा अवलंब करणे गरजेचे आहे. मानव पाण्याची उत्पत्ती करू शकत नाही, म्हणून पाण्याचा अपव्यय करण्याचा अधिकार मानवाला नाही. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे. पाणी हेच जीवन असून पाणी वाचविणे म्हणजेच पाणी कमविणे होय, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांनी दिवसेंदिवस पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य पाहता सांडपाण्याच्या पुनर्वापरा संदर्भातील संशोधनाला चालना देणे गरजेचे असल्‍याचे सांगितले तर प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी विविध पिकांत सूक्ष्मसिंचनाचा व आच्छादनाचा वापर केला तर ७० टक्के पाण्याची व ५० टक्के खतांची बचत होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ संशोधानात दिसून आल्‍याचे सांगितले. 
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू यांच्या हस्ते जलदिंडी व उमेद जागृती फेरीस हिरवी झेंडी दाखवून गावात फेरी काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमधिकारी प्रा. विजयकुमार जाधव यांनी केले. कार्यक्रमात कार्यक्रमाधिकारी संजय पवार यांनी स्वयंसेवकांना जलप्रतिज्ञा दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. अनंत बडगुजर आदींसह स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

मराठवाडयातील शेतक-यांत उस्‍मानाबादी शेळीपालनातुन आर्थिक स्‍थैर्य शक्‍य ....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित उस्‍मानाबादी शेळीपालनाविषयी पशुपालक व कृषी विस्‍तारकांचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि महाविद्यालयाचा पशुसंवर्धन व दुग्धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत दिनांक 31 मार्च रोजी उस्‍मानाबादी शेळीपालन : भविष्‍यकालीन संधी व आव्‍हाने या विषयावर शेतकरी–पशुपालक व कृषी विस्‍तारकांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसले, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, उस्‍मानाबादी शेळीचे चविष्‍ट मांस व जुळे - तीळे करडे देण्‍याची जास्‍त क्षमतेमुळे ही शेळी काळे सोने म्‍हणुन महाराष्‍ट्रातच नव्‍हे तर इतर राज्‍यातही प्रसिध्‍द आहे. मराठवाडया सारख्‍या कोरडवाहु क्षेत्रात उस्‍मानाबादी शेळीपालनातुन शेतकरी व पशुपालक सामाजिक व आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त करू शकतात. उस्‍मानाबादी शेळीचा अनुवंश शुध्‍द असणे गरजेचे आहे.
प्रशिक्षणाचा समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. समारोपीय भाषणात डॉ अशोक ढवण यांनी शेळीपालनातुन शेतक-यांना निश्चितच आर्थिक पाठबळ प्राप्‍त होऊ शकते, असे प्रतिपादन केले.
सदरिल प्रशिक्षणात उस्‍मानाबादी शेळीचे जातीवंत पैदास तंत्रज्ञान, अर्थशास्‍त्र, यशस्‍वी चतु : सुत्री, करडांचे संवर्धन, उत्‍कृष्‍ट व्‍यवस्‍थापन, आरोग्‍य, आदर्श गोठा, वर्षभराचे चारापिकांचे नियोजन या विषयावर डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ माणिकराव धुमाळ, डॉ अनंत शिंदे, डॉ धनंजय देशमुख, डॉ गजानन ढगे, डॉ. शंकर नरवाडे, प्रा. दत्‍ता बैनवाड आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी पशुपालक श्री बच्‍चेसाहेब देशमुख, रामेश्‍वर मांडगे, शेषराव सुर्यवंशी, एकनाथराव साळवे आदींची सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक तथा विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ अनंत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दत्‍ता बैनवाड यांनी केले. प्रशिक्षणात मराठवाडयातील 81 शेतकरी व 15 कृषी विस्‍तारकांनी सहभाग नों‍दविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. नरेंद्र कांबळे, प्रकाश भोसले, नामदेव डाळ, माधव मस्‍के आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, April 1, 2017

आदीवासी शेतक-यांनी विविध पीकांचे बिजोत्पादन घेऊन उत्पन्न वाढवावे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात आदिवासी शेतकरी प्रशिक्षण व उपकरणे वाटप कार्यक्रम संपन्‍न

आदिवासी शेतक-यांनी आर्थिक फायदा व उत्पन्नातील स्‍थैर्यासाठी विविध पीकांचे बिजोत्पादन करावे, असा सल्‍ला कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या वतीने  आदिवासी शेतकरी प्रशिक्षण व उपकरणे वाटप कार्यक्रम दि. ३१ मार्च रोजी आयोजीत करण्यात आला होता, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. सदरिल केंद्रामार्फत आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून मौजे जावरला (ता. किनवट जि. नांदेड) येथील आदिवासी शेतक-यांना पीक संरक्षण उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी मा. श्री सुरेश काकाणी, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री केदार साळुंके, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आदी प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्हणाले की, सध्या कांदा सारख्या पीकाच्या बिजोत्पादनातुन शेतक-यांना चांगला फायदा मिळत आहे. आदिवासी शेतक-यांनी नैसर्गिक संसाधन आधारीत कृषि व्यवसाय सुरू करावे, यात रेशीमपालन, शेळीपालन, कुक्कुट्पालन आदी कृषिपूरक जोडधंदे करण्यास आदिवासी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. आदिवासी गावातील परिस्थिती जाणुन घेऊन त्यानुसार पीकरचनेबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ गावांत येऊन मार्गदर्शन करतील, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.  
जिल्हाधिकारी मा. श्री सुरेश काकाणी आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, कृषि विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक-यांनी स्वत:चा विकास साधावा व आपले गाव कृषि विकासाच्या दृष्टीकोनातून आदर्श गाव बनवावे. शासनाच्या विविध योजना एकात्मिकपणे राबवून गावाचा विकास साधावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. गावातील संसाधनांचा वापर करून उत्पादीत मधासारख्या पदार्थांचे विपणन अधिक नियोजनपूर्वक करावे. कृषि विद्यापीठाद्वारे आदिवासी गावात राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमांबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केला.
कृषि विद्यापीठाच्‍या आदिवासी गावात राबविण्‍यात येत असलेले प्रात्यक्षिके, मार्गदर्शन, विविध्‍ निविष्‍ठा वाटप आदी बाबत विद्यापीठ कार्यकारी समिती सदस्य श्री केदार साळुंके यांनी अभिनंदन केले. माननीय राज्यपाल यांनी दत्तक घेतलेले नांदेड जिल्ह्यातील जावरला गावातील कृषि उत्पादन वाढीसाठी विद्यापीठ राबवित असलेल्‍या कार्यक्रमांची संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी माहिती देऊन गावातील विंधन विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी विद्यापीठ विकसीत विहीर पून:र्भरण पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमात कापूस लागवडीबाबत विविध विषयांवर शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. पवन ढोके, प्रा. अरुण गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी श्री कायंदे, श्रीमती ऐलवाड, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री पटवे यांनी सहकार्य केले.