Sunday, June 24, 2018

विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍सचा शेतक-यांमध्‍ये प्रसार करावा...... प्राचार्य डॉ डि एन गोखले

परभणी कृषि महाविद्यालयात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्बोधन कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम रावे असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ सी बी लटपटे, डॉ जे व्‍ही एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, कमी कालावधीत येणारे विविध पिकांचे वाण, जीवाणु संवर्धनाची बीजप्रक्रिया, आंतरपिक पध्‍दती आदीसह अनेक उपयुक्‍त व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेले आहे, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी सदरिल तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचवावे. आज अनेक शेतकरी स्‍मार्टफोनचा उपयोग करित आहेत, त्‍यांना विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍स वापराबाबतचे प्रात्‍य़क्षिके करून दाखवावित, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
कार्यशाळेत डॉ पी आर देशमुख, डॉ सी बी लटपटे आदीसह विषयतज्ञ व कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ जे व्‍ही ऐकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. यावेळी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते. कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावेअसुन या सत्रात विद्यार्थी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात. यावर्षी महाविद्यालयाचे 228 विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.

Thursday, June 21, 2018

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय योग दिन उत्‍साहात साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव  योगशिक्षक प्रा­­.दिवाकरजोशी यांच्‍यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसनप्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आलीशिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषिडॉ. विलास पाटीलविद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाडविद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉधर्मराज गोखले, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मागदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले कीयोगा ही जगाला दिलेली भारतीय संस्‍कृतीची मोठी देण असुन समाजाचे तन व मन निरोगी राहण्‍यासाठी योग व प्राणायाम प्रत्‍येकांनी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले. यावेळी उत्‍कृष्‍ट योग व आसन केल्‍याबाबत निवड अधिकारी व विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी - विद्यार्थ्‍यींनीअधिकारीकर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
Wednesday, June 20, 2018

वनामकृवित क्रॉपसॅप अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

बोंडअळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण व्‍हावा....विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा किटकशास्‍त्र विभाग व कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने "कापूस, सोयाबीन, तूर हरभरा पिकावरील कीड-रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण सल्ला प्रकल्प" (क्रॉपसॅप) अंतर्गत मराठवाडयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषि अधिकारी, विद्यापीठातील जिल्हा समन्वयक मास्टर ट्रेनर्स यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम दि. 18 19 जुन रोजी संपन्‍न झाला.
प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताने, किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले म्‍हणाले की, खरिप पिकांतील किड व रोगाचा प्रार्दुभाव अचुक सर्वेक्षणाने ओळखुन वेळीच उपाय योजनेबाबत शेतक-यांना कृषि विभाग व कृषि विद्यापीठ मार्गदर्शन करावे. कपाशीतील बोंडअळी व्यवस्थापनासाठी किडींचे अचूक सर्वेक्षण विशेष महत्‍व असुन यात कामगंध सापळयांचा प्रभावी वापर करावा. किड व्‍यवस्‍थापनात क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन सर्वांच्‍या सहकार्यातुन महाराष्ट्राचा स्वत:चा पॅटर्न तयार व्‍हावा, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या हंगामात किड - रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा विद्यापीठाचा सल्‍ला शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्‍याचा सल्‍ला दिला.
लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताणे यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाचे बदलेल्‍या स्वरुपाबाबत मार्गदर्शन करून सांगितले की, कृषि विभागातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांची कीड रोग सर्वेक्षणात असलेली भुमिका निश्चित केलेली असुन हे काम जबाबदारीने करावे. कीड रोगाचा उद्रेकच होऊ नये म्‍हणुन आपली भुमिका महत्‍वाची आहे.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद केले. प्रशिक्षणात गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत डॉ. पी. आर. झंवर यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. बस्वराज भेदे यांनी सोयाबीन वरील किड व्यवस्थापन, डॉ. अनंत बडगुजर यांनी किडींचे सर्वेक्षण पध्दती, डॉ एस डी बंटेवाड यांनी तुर कीडीचे व्‍यवस्‍थापन तसेच रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ घंटे यांनी मागर्दशन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. सदरील प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील जवळपास 200 पेक्षा जास्त कृषि अधिकारी उपस्थित होते.

Friday, June 15, 2018

विद्यापीठाच्‍या ब्‍लॉगला उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार

ब्‍लॉगचे तीन लाख वेळेस वाचन केवळ एकोणसत्‍तर (69) महिण्‍यात 

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍यानी सप्‍टेबर २०१२ मध्‍ये promkvparbhani.blogspot.com हा ब्‍लॉग सुरू करून एकोणसत्‍तर (69) महिने पुर्ण झाले असुन हा ब्‍लॉग तीन लाख वेळेस वाचण्‍यात आला आहे, ही एक मोठी उपलब्‍धी आहे, या वाचकात इतर देशातील वाचकांचाही समावेश आहे. पहिल्‍या चाळीस महिण्‍यात एक लाख वेळेस वाचन झाले, परंतु पुढील केवळ 29 महिण्‍यात दोन लाख वेळेस वाचन झाले. म्‍हणजेचे दर महिण्‍यास साधारणत: सात ते आठ हजार वेळेस वाचन होते.

या एकोणसत्‍तर (69महिन्‍यात वि‍द्यापीठाच्‍या साधारणत: एक हजार बातम्‍या, पोस्‍ट व घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्‍लॉगवर प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या यास वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषत: या विविध बातम्‍यास प्रसारमाध्‍यमाच्‍या प्रतिनिधींनी आपआपल्‍या दैनिकात, साप्‍ताहिकात तसेच मासिकात मोठी प्रसिध्‍दी दिली. सदरिल प्रसिध्‍द केलेल्‍या पोस्‍ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्‍ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठाच्‍या उपलब्‍धी आदींशी संबंधीत आहेत. शेतकरी बांधव, विद्यार्थ्‍यी व सामान्‍य नागरीक ही ब्‍लॉगचा वाचक असुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान त्‍वरित शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यास ही मदत होत आहे. ब्‍लॉग अविरत कार्यरत राहण्‍यास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, विस्‍तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक व संशोधन संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्‍साहन लाभले. तसेच विद्यापीठातील विविध महाविद्यालये, संशोधन केंद्रे व विविध कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांचेही मोठे योगदान आहे.

गेल्‍या एकोणसत्‍तर (69) महिन्‍यातील विद्यापीठाच्‍या विविध घडामोडीचे ब्‍लॉग हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी व बातम्‍या छायाचित्रासह आपण पाहु शकतो, हे सर्व आपल्‍या सर्वांच्‍या सहकार्यामुळेच शक्‍य होऊ शकले. विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद व सहकार्य लाभो, हीच अपेक्षा.

धन्‍यवाद

आपला स्‍नेहांकित,
जनसंपर्क अधिकारी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापी
परभणी