Friday, September 26, 2014

देशी कापुस पिक प्रात्‍याक्षिकास कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांची भेट


औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रामार्फत औरंगाबाद जिल्‍हयातील देवगाव ता. पैठण येथील शेतक-यांच्‍या शेतावर घेण्‍यात आलेल्‍या विद्यापीठाच्‍या देशी कपाशीच्‍या वाणाच्‍या पिक प्रात्‍याक्षिकास विद्यापीठाचे कुलगुरू मा. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दि २६ सप्‍टेबर रोजी भेट दिली, यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, औरंगाबाद येथील विभागीय कृषि सहसंचालक डॉ सुर्यकांत पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री पी डी लोणारे, कापुस विशेषज्ञ डॉ के एस बेग, डॉ एस बी पवार विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
देवगांव येथील दिपक जोशी यांच्‍या शेतावरील कृषि विद्यापीठ विकसित पी ए २५५ (परभणी तुराब) व पी ए ५२८ या वाणांची पाहणी करण्‍यात आली. याप्रसंगी कुलगुरू मा. बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी देशी वाण प्रात्‍यक्षिकाबाबत समाधान व्‍यक्‍त केले व मार्गदरर्शन करतांना म्‍हणाले की, देशी कपाशीचे सरळ वाण रसशोषण करणा-या किडींना सहनशिल असल्‍याने त्‍यावर होणारा पिक संरक्षण खर्च कमी होतो तसेच मध्‍यम-हलक्‍या जमिनीत कोरडवाहु लागवडीत कपाशीच्‍या देशी वाणांचे उत्‍पादन बी टी कपाशीपेक्षा कमी उत्‍पादन खर्चात समतुल्‍य येत असल्‍यामुळे या बियाणाची उपलब्‍धता वाढविणे आवश्‍यक आहे. प्रात्‍याक्षिकातील उत्‍पन्‍न खर्चाची नोंद ठेऊन त्‍यांची बी टी कपाशी तुलना करण्‍यात यावी, अशी सुचना त्‍यांनी केली. सदरील प्रात्‍याक्षिकाचे नियोजन कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील शास्‍त्रज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली केले आहे. देवगांव शिवारातील प्रात्‍यक्षिक भेटीचा कार्यक्रम श्री दिपक जोशी व त्‍यांच्‍या जयजवान जयकिसान गटाच्‍या शेतक-यांनी व औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या सहकार्य आयोजित करण्‍यात आला होता. 

नांदगांव येथे रब्‍बी शेतकरी मेळावा संपन्‍न


Wednesday, September 24, 2014

सोयाबीन पीकावर हुमणी अळीचा तर कपाशीवर रसशोषण करणा-या किंडींचा प्रादुर्भावराष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्‍यांना सुजान नागरिक घडवि‍ण्याचे माध्यम .......मा. डॉ. अशोक ढवण

मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक ढवण होते तर ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, विभाग प्रमुख डॉ. बी.एम.ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्‍या अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ.अशोक ढवण म्‍हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्‍यांना सुजान नागरिक घडवण्याचे माध्यम असुन समाजातील विविध प्रश्नाची जाण यामुळे आजच्‍या युवकात निर्माण होते, तरूण वर्गाने समाजातील विविध समस्याचे निराकरणाचे कार्य हाती द्यावे असे आवाहन त्‍यांनी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना केले.
ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ यांनी आईवडीलांचे उपकार आपण कधीही फेडु शकत नाही, त्‍यांची सेवा हीच ईश्‍वर सेवा आहे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. महात्मा गांधीचे कार्या पासुन प्रेरणा घेऊन स्वंयसेवकांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आपला व्यक्तिमत्व विकास साधावा, असा सल्‍ला कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी दिला तर डॉ. बी.एम.ठोंबरे यांनी आपल्‍या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना हि एक चळवळ असून ती आयुष्यभर सर्व स्वंयसेवकानी अंगीकृत करावी असे सांगितले.
प्रा.व्ही.बी.जाधव व स्वंयसेवक विशाल राठोड, मनीषा दहे, तुकाराम मंत्रे, जीवन धोत्रे, वृषाली खाकाळ, जान्हवी जोशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेवर आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. रवींद्र शिंदे यांना राज्यस्तरीय सन २०१३-१४ चा ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार कण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रियांका खर्चे व नितीन डोकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्वंयसेवक संजय चिंचणे, कुमार पानझडे, भारत खेल्भाडे, मारोती चातुरे, विनिता वर्मा, संजीवनी बारंगुले, संध्या थोरात, नेहा भोल, शारदा घोलप, अनुराधा बुचाले,सय्यद रिजवाना,पूजा शेटे, शिताराम बाद्से,मयुरी काळे, विश्वास कदम,अजय मुंढे, आणि राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.

Monday, September 22, 2014

फळपीकावरील कीड-रोगांच्‍या प्रादुर्भावाचा पुर्वानुमान बांधता आला पाहीजे.........कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन
हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या दाेन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर डॉ बी बी भोसले, डॉ अशोक ढवण, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, श्री विजयकुमार राऊत, डॉ डी एल जाधव आदी
हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या दाेन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी घडीपत्रीकेचे विमोचन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ अशोक ढवण, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, श्री विजयकुमार राऊत, डॉ डी एल जाधव आदी
फळपीकांतील कीड व रोगामुळे होणारे शेतक-यांचे नुकसान भरून न येणारे असते, त्‍यामुळे फळपीकासाठी हॉर्टसॅप प्रकल्‍प अत्‍यंत महत्‍वाचा आहे. या प्रकल्‍पांर्गत संकलीत करण्‍यात येणा-या आकडेवारीचा उपयोग करून कृषि हवामान अंदाजाप्रमाणे दिर्घकालीन फळपीकांतील कीड व रोगांच्‍या प्रादुर्भावाचा पुर्वानुमान बांधता आला पाहिजे, असे मत कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कीटकशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने फलोत्‍पादन पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्‍ला व व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प (हॉर्टसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि २२ व २३ सप्‍टेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कीड सर्वेक्षक, कीड नियंत्रक, संगणक प्रचालक यांच्‍या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असुन या कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल जाधव व उपसंचालक (फलोत्‍पादनश्री विजयकुमार राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, या प्रकल्‍पात कृषि हवामानशास्‍त्राची भुमिका महत्‍वाची असुन कोणत्‍या हवामान परिस्थिती, कोणत्‍या कीड-रोगांचा प्रार्दभाव होण्‍याची शक्‍यता आहे याचा अंदाज बांधता आल्‍यास फलोत्‍पादक शेतक-यांना याचा मोठा फायदा होईल. कृषि विभागाच्‍या सहकार्याने क्रॉपसॅप प्रकल्‍पाप्रमाणेच फलोत्‍पादक शेतक-यांपर्यंत कृषि सल्‍ला त्‍वरीत पोहोचविण्‍यात यावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिकु या सहा फळपीकांचा प्रकल्‍पात समावेश असुन मराठवाडयाकरिता मोंसबी हे महत्‍वाचे फळपीक आहे. याप्रकल्‍पांतर्गत फळपीकावरील कीड-रोगाबाबतचे निरीक्षण योग्‍यरित्‍या झाल्‍यास योग्‍य व अचुक सल्‍ला शेतक-यांना देणे शक्‍य होईल. यामुळे शेतक-यांना प्रतिबंधात्‍मक उपाय करता येऊन फळपीकांचे मोठे नुकसान टाळता येईल.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्‍पात फळपीकांच्‍या लागवडीपासुन रोग-कीडींच्‍या बदोबस्‍ताबाबत मार्गदर्शन व्‍हावे तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, राज्‍यातील क्रॉपसॅप प्रकल्‍प जगाला प्रेरणा देणारा ठरला असुन त्‍याच धर्तीवर हा हॉर्टसॅप प्रकल्‍पामुळे फलोत्‍पादक शेतक-यांचा कीड-रोग व्‍यवस्‍थापनावरील होणारा मोठा खर्च आटोक्‍या आणण्‍यासाठी उपयोग होईल. लोकप्रतिनिधीच्‍या मागणीनुसार शासनाने हॉर्टसॅप प्रकल्‍पास सुरूवात केल्‍याची माहिती कुलसचिव डॉ डी एल जाधव यांनी दिली. यावेळी श्री विजयकुमार राऊत यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात किटकशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्‍पाची माहिती दिली. याप्रसंगी मोसंबीवरील किंडीची ओळख व व्‍यवस्‍थापन याविषयावरील घडीपत्रीकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ डी जी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्‍ही भेदे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ बी बी भोसले, डॉ एम बी पाटील, डॉ एच के कौसडीकर, डॉ ए जी सुर्यवंशी, डॉ जी पी जगताप, डॉ उदय खोडके, डॉ ए जी बडगुजर, प्रा एस टी शिंदे व निलेश पटेल आदी शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशाेक ढवण 
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डी एल जाधव 

Wednesday, September 17, 2014

विद्यापीठाने पीकांची बाजारपेठ व अर्थकारण यावर मार्गदर्शन करावे...मा. डॉ. चारूदत्त मायी

रबी पीक शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष मा. डॉ. चारूदत्‍त मायी, कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा, कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख, कुलसचिव डॉ डि एल जाधव, डॉ. साहेबराव दिवेकर आदी
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष मा. डॉ. चारूदत्‍त मायी व्‍यासपीठावर कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा, कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदी
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा
मराठवाडातील शेतक-यांच्‍या ८० टक्के क्षेत्रावर विद्यापीठाने निर्माण केलेल्‍या विविध पीकांच्‍या जाती असुन हीच विद्यापीठाची मोठी उपलब्‍धी आहे. विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचले आहे, यापुढे विद्यापीठाने पीकांची बाजारपेठ व अर्थकारण यावर मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष व माजी कुलगुरू मा. डॉ. चारूदत्‍त मायी यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनानिमित्‍त आयोजित रबी पीक शेतकरी मेळावाच्‍या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
मेळाव्‍यास विशेष अतिथी म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट व प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, शिक्षण संचालक व अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख, कुलसचिव डॉ डि एल जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. साहेबराव दिवेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. चारूदत्‍त मायी पुढे म्‍हणाले की, मराठवाडयातील कोरडवाहु शेतीत आज उदासीनता आली आहे. ही कोरडवाहु शेती किफायतीशीर करावयाची असेल तर एकतर शेतक-यांना पाणी दया किंवा त्‍यांना प्रती माह एक हजार रूपये सबसिडी घ्‍या तसेच कोरडवाहु शेतक-यांच्‍या पीकांची आधारभुत किंमत ही ओलीताच्‍या शेतीपेक्षा जास्‍त दयावी लागेल तरच कोरडवाहु शेती टिकेल. शेती पुढील दुसरा मोठा प्रश्‍न हा मजुरांचा आहे, यासाठी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, गटशेतीला प्रोत्‍साहन दयावे लागेल. भाडेतत्‍वावर शेती अवचारे व यंत्राचे केंद्र स्‍थापन करण्‍यात यावीत, त्‍यामार्फत गरजेनुसार शेतकरी तेथुन यंत्र भाडेतत्‍वावर घेतील. निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्‍त झाला, आता मराठवाडयातील शेती समस्‍या मुक्‍त होण्‍यासाठी काम करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांट दांगट आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषिक्षेत्र हे चिंतेचे क्षेत्र नाही, ते चिंतनाचे क्षेत्र आहे. शेतक-यांच्‍या प्रश्‍नावर चिंता नको, त्‍यावर चिंतन करूनच तोडगा काढता येईल. शेतक-यांच्‍या प्रत्‍येक प्रश्‍नाकडे डोळसपणे बघावे लागेल. देशातील पहिल्‍या हरितक्रांतीने आपण अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झालो आहोत, शेतीची उत्‍पादकाता वाढली, परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढले नाही, यासाठी दुस-या हरितक्रांतीची गरज आहे. बाजारात विकणारे शेतक-यांना पिकवावे लागेल. आजच्‍या जा‍गतिकीकरणात शेती प्रश्‍नाना तोंड देण्‍यासाठी मंत्र, तंत्र, यंत्र, कौशल्‍य व व्‍यवस्‍थापन या पंचसुत्रीचा अवलंब शेतक-यांना करावा लागेल. यातील मंत्र म्‍हणजे शास्‍त्रीय ज्ञान याची कास शेतक-यांना धरावी लागेल. मराठवाडाला निसर्गाने भरपुर दिले आहे, त्‍याचे आर्थिक समृध्‍दीत रूपांतर आपण करू शकलो नाही. यावर्षी महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभागाने कोरडवाहु शेतीमध्‍ये रूंद वरंबा व सरी तंत्रज्ञानाचा विस्‍तार केला, यासाठी राज्‍यात सहा हजार बीबीएफ यंत्राचे वाटप शेतक-यांना केले गेले. शेतक-यांनीही गटशेतीच्‍या माध्‍यमातुन त्‍याचा मोठा वापर केले. शाश्‍वत उत्‍पादनासाठी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल. शेतीमध्‍ये आज प्रचंड संधी असुन शेती प्रक्रिया उद्योगावर भर दयावा लागेल. सकारत्‍मकपणे व कष्‍टाने शेती करावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अर्थतज्ञ डॉ एच एम देसरडा यांनी आपल्‍या भाषणात स्‍वावलंबी शेती, स्‍वाभीमानी शेती, सेंद्रीय शेती, आनंदाची शेती करण्‍यासाठी शेतकरी, सरकार, बाचार व निसर्ग यांना एकत्र यावे लागेल असे सांगितले.
समारोपीय भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातील शेतकरी डाळींब, द्राक्ष आदी पिके घेऊन फलोत्‍पादनात पुढे येत आहेत, मराठवाडयातही शेतकरी सकारत्‍मक दृष्‍टीकोन ठेऊन शेती करतांना दिसत आहे. शेतक-यांच्‍या असलेल्‍या विद्यापीठाकडीलच्‍या अपेक्षा पुर्ण करण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍न करिल असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले यांनी विद्यापीठाच्‍या  विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश आहीरे यांनी केले. मेळाव्‍यास प्रगतशील शेतकरी सुर्यकांतराव देशमुख, सोपानराव अवचार, नाथराव कराड, उदयवराव खेडेकर, बजाज यांच्‍यासह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्‍या शेतीभाती मासिकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच कृषि प्रदर्शनीचे तसेच विद्यापीठाच्‍या रबी पीकांच्‍या बियाणे विक्रीचे ही उदघाटन उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
तांत्रिक सत्रात सद्यपरिस्थितीमध्‍ये कपाशी व सोयाबीन पीकांतील किड व रोग व्‍यवस्‍थापनाबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी तर दर्जेदार डाळिंब व्‍यवस्‍थापन बाबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी मार्गदर्शन केले. विविध पीक लागवडी बाबत डॉ यु. एन आळसे, डॉ व्हि डी सोळंके, डॉ एस बी घुगे, डॉ डी के पाटील, डॉ के एस बेग, डॉ जी पी जगताप, डॉ उदय खोडके, डॉ आनंद गोरे, प्रा अरूण गुट्टे आदीनी मार्गदर्शन केले तसेच विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या विविध शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे समाधान केले. 

शेतीभाती मासिकाचे विमोचन करतांना
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना
विद्यापीठाने विकसित केलेल्‍या रबी पीकांच्‍या विविध वाणाच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन करतांना

Monday, September 15, 2014

कृषिदुतांनी केले मौजे नांदगांव येथे वृक्षारोपन

     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्रातंर्गत कार्यरत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांनी मौजे नांदगांव (खु) येथे सोमवार दि. 15 सप्‍टेंबर 2014 रोजी वृक्षारोपनाचा कार्यक्रम साजरा केला. कृषिदुतांनी जिल्‍हा परिषद शाळेच्‍या परिसरात विविध वृक्षांची मोठ्या प्रमाणात रोपे लावली. यावेळी नांदगांव जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळाच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती यु. एस. चांदवाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एल. एन. जावळे व डॉ. प्रशांत माळी आदिची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिदुत शिवप्रसाद संगेकर, प्रविण तिडके, व्‍यंकटेश शिराळे, अजय साळवे, रामकृष्‍ण माने, नवनाथ मोरे, सतिष कटारे, राम कोलगणे, अमोल वैद्य, सचिन सुंदाळकर, बद्री ढाकणे, प्रविण वाकळे, सचिन वाघमारे, मनोहर शेळके, महेश झिंजुरडे, हर्षल वाघमारे, राजेश सैनी, मसुद शेख, दिपेश बोरवाल, प्रविंद्र कुमार, धिरेंद्र कुमार, रोहित कुमार, स्‍वप्न्लि बाहेकर, निखील कुमार, विवेककुमार कटिहार, थिप्‍पी रेड्डी, आरिसुदन आदिंनी परिश्रम घेतले. सदरिल उपक्रमास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ राकेश आहीरे व कार्यक्रम प्रभारी डॉ राजेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

Friday, September 12, 2014

रबी पीक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनानिमित्‍त दि १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात रबी पीक शेतकरी मेळावाचे आयोजन करण्‍यात आले असुन या मेळाव्‍याचे उद्घाटन भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्‍लीचे माजी अध्‍यक्ष तथा माजी कुलगुरू मा. डॉ. चारूदत्‍त मायी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. मेळाव्‍यास विशेष अतिथी म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट उपस्थित राहणार असनु अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात रबी ज्‍वार, गहु, करडई, हरभरा लागवड तंत्रज्ञान, सद्यपरिस्थितीमध्‍ये कपाशी व सोयाबीन पीकांतील किड व रोग व्‍यवस्‍थापन, दर्जेदार डाळिंब व्‍यवस्‍थापन, ठिबक सिंचन, तण व्‍यवस्‍थापन आदी विषयावर विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बंधु-भगिनींनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. साहेबराव दिवेकर व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ राकेश आहिरे यांनी केले आहे. 


नांदगाव येथे कृषिदुतांच्‍या लसीकरण कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत मौजे नांदगाव (खुर्दयेथील जनावरांच्‍या लसीकरणाचा कार्यक्रमाप्रसंगी पशुवैद्यक डॉ प्रशांत माळी, डॉ एल एन जावळे, माणिकराव भालेराव, ज्ञानेश्‍वर भालेराव व कृषिदुत
************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाणी संशोधन केंद्रातंर्गत कार्यरत असलेले ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांनी मौजे नांदगाव (खुर्द) येथे दि १२ सप्‍टेबर रोजी जनावरांना होणारे आजार घटसर्प व फ-या यांवर प्रतिबंधात्‍मक लसीकरणाचा कार्यक्रम घेतला. यावेळी पावसाळयात जनावरांची काळजी व आरोग्‍याची निगा कशी राखावी याबाबत पशुवैद्यक डॉ प्रशांत माळी यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावच्‍या सरपंचा श्रीमती कांताबाई पांचाळ, उपसरपंच माणिकराव भालेराव, कार्यक्रम अधिकारी डॉ एल एन जावळे, ज्ञानेश्‍वर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गावातील साधारणत: ७० जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी कृषिदुत शिवप्रसाद संगेकर, प्रविण तिडके, व्‍यंकटेश शिराळे, राम कोलगणे, अजय साळवे, नवनाथ मोरे, रामकृष्‍ण माने, बद्रीनाथ ढाकणे, प्रविण वाकळे, अमोल वैद्य, सचिन सुंदाळकर, सचिन वाघमारे, हर्षल वाघमारे, सतिश कटारे, मनोहर शेळके, मसुद शेख, महेश झिंजुरडे, धिरेंद्रकुमार, दिपेश बोरवाल, राजेश सैनी, प्रविंद्रकुमार, रोहितकुमार, निखीलकुमार, विवेककुमार कटिहार, स्‍वप्निल बाहेकर, आरिसुदन, थिप्‍पी रेड्डी आदींनी परिक्षम घेतले. सदरिल उपक्रमास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ राकेश आहीरे व कार्यक्रम प्रभारी डॉ राजेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. 

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रामध्‍ये शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण संपन्‍न (दि ६ सप्‍टेंबर)

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करतांना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री पंडितराव लोणारे, व्‍यासपीठावर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार, उपविभागीय कृषि अधिकारी श्री उदय देवळाणकर आदी.
प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करतांना औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार, व्‍यासपीठावर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री पंडितराव लोणारे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री उदय देवळाणकर आदी.


कृषि विज्ञान केंद्राच्‍या प्रक्षेत्र भेटी प्रसंगी 

Wednesday, September 10, 2014

नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात कापुस उत्‍पादक शेतक-यांचे चर्चासत्र संपन्‍न (दि 6 सप्‍टेबर)

चर्चासत्राचे उदघाटन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ दत्‍तप्रसाद वासकर व डॅा के एस बेग 
चर्चासत्रात शेतक-यांना मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ दत्‍तप्रसाद वासकर व डॅा बी बी भोसले 
चर्चासत्रात शेतक-यांशी संवाद साधतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले आदी
सौजन्‍य
कापुस संशोधन केंद्र , नांदेड

Tuesday, September 2, 2014

विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहोचवा....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटन
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत ‘विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ कार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव, डॉ बी एस गोखले, डॉ. डि एन गोखले, डॉ विलास पाटील, प्रा विशाला पटणम आदी
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत ‘विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ कार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटनाप्रसंगी शास्‍त्रज्ञाच्‍या वाहनास हिरवा झेंडा दाखवतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरकुलसचिव डॉ डि एल जाधव, डॉ बी एस गोखले, डॉ. डि एन गोखले, डॉ विलास पाटील, प्रा विशाला पटणम, डॉ आनंद गोरे आदी 

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विशेष पिक संरक्षण मोहिमेमुळे त्‍यांना योग्‍य वेळी योग्‍य तंत्रज्ञान मिळणार आहे. या मोहिमेतंर्गत विद्यापीठाचे तंत्रज्ञान शास्‍त्रज्ञांनी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय व विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र यांच्‍या वतीने दि. २ सप्‍टेबर रोजी आयोजित राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरीकार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटना प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि विकास अधिकारी श्री बी एस कच्‍छवे, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा विशाला पटणम, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रोहिदास, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ पी एन सत्‍वधर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, शेतक-यांची तंत्रज्ञानाची गरज परिस्थितीनुसार वेळो‍वेळी बदलत असते, मराठवाडयातील शेतकरी काही दिवसांपुर्वी कमी पाऊसामुळे चिंतेत होता, आता पिकांवरील किड व रोगांचा प्रार्दभाव होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांना किड व रोग व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यापीठाच्‍या या मोहिमेतंर्गत महिला शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍याची आवश्‍यकता असुन शेती कसण्‍यात त्‍याचा मोठा वाटा आहे. तसेच या कार्यक्रमातुन शेतक-यांच्‍या प्रतिक्रियामुळे विद्यापीठाच्‍या संशोधनास दिशा प्राप्‍त होर्इल.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले कि, विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना केंद्रबिंदु मानुन विस्तार कार्य करावे. शेतक-यांनी गटश्‍ोती मार्फत यांत्रिकीकरणावर भर दयावा. शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या समस्‍या आधी पुर्णपणे समजुन घेऊन आपला सल्‍ला दयावा. सध्‍याच्‍या हवामान परिस्थितीत पिकांवर किड व रोगांचा मोठा उद्रेक होऊ शकतो, त्‍यामुळे पिकांचा योग्‍य काळजी कशी घ्‍यावी याबाबतचे मार्गदर्शन या मोहिमेतंर्गत शेतक-यांपर्यंत जाईल, ही अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. तसेच कुलसचिव डॉ डी एल जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमामुळे शेतक-यांमध्‍ये विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या मोहिमेतंर्गत पिकांवरील अतिरिक्‍त किडनाशकांचा वापर टाळण्‍यासाठी मार्गदर्शन करावे.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी श्री नरेश देशमुख, श्री गिरीश पारधे, तालुका कृषि अधिकारी श्री डि बी काळे, आत्‍माचे उपसंचालक श्री अशोक काळे, डॉ एस डि जेठुरे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ ए के गोरे यांनी विशेष पिक संरक्षण मोहि‍मेबाबत सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. या मोहिमेतंर्गत शास्‍त्रज्ञांच्‍या वाहनास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन शास्‍त्रज्ञाची टीम रवाना करण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.   
विशेष पिक संरक्षण मोहिमेचे वैशिष्‍टे
     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचलनालयांतंर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र, कृषि विज्ञान केंद्रे यांच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा अभिनव विस्‍तार उपक्रम संपूर्ण मराठवाड्यात गेली तीन वर्षे यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. कार्यक्रमाचे यश लक्षात घेऊन यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक मा. डॉ. बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र व कृषि विज्ञान केंद्राच्‍या माध्‍यमातुन तसेच सर्व महाविद्यालये व संशोधन योजनांच्‍या सहकार्याने विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीम हा उपक्रम पहिल्‍यांदाच दि. २० ऑगस्‍ट ते १५ सप्‍टेंबर दरम्‍यान राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अंदाजे १० ते १२ हजार किमीच्‍या प्रवासात मराठवाड्याच्‍या साधारणपणे ३०० गांवात विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ व कृषि विभागाचे प्रतिनिधी शेतक-यांच्‍या शेतावर भेटी देऊन शेतक-यांना सद्य परिस्थितीत पीक संरक्षण व आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन करणार आहेत. सदरील कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍ह्यात दि. २ ते १२ सप्‍टेबर दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रश्‍न–उत्‍तरे अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन पीक संरक्षण, आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, एकात्मिक शेती पध्‍दती, मृद व जलसंधारण इ. विषयांवर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांना शास्‍त्रज्ञांकडुन मार्गदर्शन केले जाणार आहे. मागणी आधारीत काटेकोर विस्‍तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे.  हा कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍ह्यांत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तथा परभणी येथील विभागीय कृषि विस्‍तार केंद्राच्‍या मार्फत राबविला जाणार असुन शास्‍त्रज्ञांचे एकूण चार चमू तयार करण्‍यात आले आहेत. यात कृषि विद्यावेत्‍ता, किटकशास्‍त्रज्ञ, वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ व उद्यानविद्या तज्ञ अशा चार ते पाच विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे.


मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डि एल जाधव