Wednesday, December 27, 2023

हवामान अनूकुल स्मार्ट शेती तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

नाहेप अंतर्गत स्मार्ट शेती याविषयावर दोन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन, अमेरिकेतील  शास्त्रज्ञ करणार मार्गदर्शन  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्‍पाच्‍या वतीने अन्न सुरक्षा आणि शाश्‍वतता करिता हवामान अनूकुल स्मार्ट शेतीयाविषयावर दोन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६ आणि २७ डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक २६ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे अमेरिकेतील नेब्रासका विद्यापीठातील जैवप्रणाली व कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष पिटला, विशेष अतिथी म्हणून मिसिसिपी राज्य विद्यापीठ (अमेरिका) कृषी हवामानशास्त्र, वनस्पती आणि माती विज्ञान विभागाचे तज्ञ डॉ. प्रकाश कुमार झा हे होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, कार्यशाळा आयो‍जक सहयोगी अधिष्‍ठाता डॉ भगवान आसेवार, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले, विकसित राष्‍ट्रात डि‍जिटल शेती तंत्रज्ञानाचा वापर मोठा प्रमाणात आहे, या डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाडा व राज्‍यातील शेतकरी बांधवा व्‍हावा, याकरिता परभणी कृषी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. विद्यापीठाने अनेक आतंरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संस्‍थेशी सामंजस्‍य करार केले असुन जास्‍तीत जास्‍त विद्यापीठ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व आचार्य संशोधक विद्यार्थ्‍यांना देश – विदेशात प्रशिक्षणास पाठविले आहे. आजपर्यंत ५५ पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व २५ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञांना दहा पेक्षा जास्‍त देशात पाठविण्‍यात आले असुन देशातील अग्रगण्‍य संस्‍था आयआयटि मुंबई, आयआयटी खरगपुर यासारख्‍या संस्‍थेत तीनशे पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षीत करण्‍यात आले. विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी बदलत्या हवामान अनुकुल स्मार्ट शेती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी आदींचे ज्ञान अवगत करून शेतकरी बांधवाच्‍या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन कार्य करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

अमेरिकेतील शास्‍त्रज्ञ डॉ संतोष पिटला म्‍हणाले की, अमेरिकेत हवामान स्मार्ट शेतीसाठी तंत्रज्ञानाची साधने म्हणून रोबोटिक्सचा वापर शेतीत विविध कार्यासाठी केला जातो. भारतात ही शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर भविष्‍यात होणार असुन देशातील शेतकरी बांधवांना उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व आचार्य पदवीचे संशोधकांनी पुढाकार घ्‍यावा. तर तज्ञ डॉ. प्रकाश कुमार झा यांनी पदवीसाठी आणि पदव्‍युत्‍तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात विविध पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमात प्रवेशाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यांनी हवामान आधारित नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्या संशोधन  कार्य मध्ये करावे असे सुचवले.

प्रास्‍ताविकात कार्यशाळेचे आयोजक सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. भगवान असेवार कार्यशाळेबा‍बत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनीता पवार यांनी केले आभार इंजी.एस एन पवार यांनी मानले. सदरील प्रशिक्षणासाठी ८० प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना तसेच कृषी अधिका-यांना बदलत्या हवामान आणि अन्न सुरक्षेसाठी संबंधीत नवीन तंत्र विकसित करणे आणि आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाबाबत अवगत करणे हा आहे. दोन दिवसीय कार्यशाळेसाठी अमेरिकेतील नेब्रासका विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष पिटला, मिसिसिपी राज्‍य विद्यापीठातील डॉ. प्रकाश कुमार झा, कान्‍सास राज्‍य विद्यापीठातील डॉ अजय शारदा, मुबई येथील सिफाचे संचालक डॉ सय्यद इस्माईल आदींचे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यशाळेचे आयोजन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. भगवान असेवार, नाहेप मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. विशाल इंगळे, डॉ.सुनीता पवार, इंजी.एस एन पवार, डॉ.दयानंद टेकाळे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पातील कर्मचारी इंजी. शिवानंद शिवपुजे, इंजी. अपुर्वा देशमुख , डॉ प्रतीक पोदार,इंजी. पौर्णिमा राठोड, इंजी तेजस्विनी कुमावत, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. तनजीम खान, इंजी विशाल गायकवाड ,इंजि अक्षय गायकवाड, श्री. रामदास शिंपले, श्री. नितीन शहाणे, सौ नमिता वाडीकर, मुक्ता शिंदे, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने आदींनी परिश्रम घेतले.

Sunday, December 24, 2023

अखिल भारतीय कुलगुरु टी २० चषक स्पर्धेकरिता वनामकृविचा संघ रवाना

राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ कर्मचाऱ्यांची १९ वी अखिल भारतीय कुलगुरु टी २० चषक स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर २०२३ ते ०६ जानेवारी २०२४ रोजी दरम्यान नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आयोजीत करण्यात आली असून या क्रिडास्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी वनामकृविचा संघ रवाना झाला.मा. कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचारी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संघाचे कर्णधार डॉ धीरज पार्थीकर आहेत.

मा. कुलगुरू महोदय यांनी १९ वी अखिल भारतीय कुलगुरु टी २० चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा असे सांगून शुभेच्छा देवून मैदानी खेळामुळे शरीर स्वस्थ चांगले राहते, कार्यक्षमता वाढिस लागते, असे म्हणाले.

यापूर्वी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित  अखिल महाराष्ट्र टी २० क्रिकेट स्पर्धेत वनामकृवि परभणी चा संघ प्रथमच सहभागी झाला होता. त्यावेळी संघाने ५ पैकी तीन सामने जिंकून चांगली कामगिरी केली. वनामकृवि परभणी च्या संघातील मारोती शेल्लाळे यांना स्पेर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पुरस्कार मिळाला.

Saturday, December 23, 2023

नैसर्गिक संसाधनांचा वापर काळजीपुर्वक करणे काळाची गरज ...... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

वनामकृवित मृदाशास्‍त्रज्ञाच्‍या राज्‍यस्‍तरीय परिसंवाद संपन्‍न 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी च्या वतीने दिनांक २१ आणि २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील मृदशास्त्रज्ञांचा परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते, परिसंवादाच्‍या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, माजी संचालक शिक्षण डॉ विलास पाटील, बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ. स्वामी रेड्डी, दापोली कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ एस बी दोडके, राहुरी कृषी विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. बी एस कांबळे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद इस्माईल, आयो‍जक विभाग प्रमुख डॉ प्रवीण वैद्य, आयोजन सचिव डॉ अनिल धमक आदींची उपस्थिती होती.

समारोपीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, देश अन्‍नधान्य उत्‍पन्‍नात स्‍वयंपूर्ण झाला असला तरी मागील काही वर्षापासुन धान्‍य उत्‍पादनात स्थिरता आली आहे. भविष्यकाळात जमिनीचे आरोग्य, सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावले वेळीच उचलणे गरजेचे आहे. शेतीच्‍या दृष्‍टीने पाणी आणि जमिन हे महत्‍वाचे नैसर्गिक साधनसंपत्‍ती असुन या वापर काळजीपुर्वक करणे प्रत्‍येकाची जबाबदारी आहे. मातीचे आरोग्‍य आबाधीत राखण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन मृदाशास्‍त्रज्ञांनी संशोधनात भर दयावा. शेतीत अधिकाधिक उत्‍पादनापेक्षा शाश्‍वत उत्‍पादन आपले लक्ष असले पाहिजे.

प्रास्ताविक डॉ प्रवीण वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ए एन पुरी यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. दोन दिवशीय परिसंवादात १४७ पेक्षा जास्‍त शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला, अन्‍न सुरक्षा आणि कृषी शाश्‍वततेसाठी मातीचे आरोग्‍य पुर्नेजीवन  यावर चर्चा करण्‍यात आली, या आधारे करण्‍यात आलेल्‍या शिफारसींचे समारोपीय कार्यक्रमात वाचन करण्‍यात आले. मृदा आरोग्‍य करिता दिर्घकालीन धोरण निश्‍चित करून धोरणकर्ते, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विस्तार कार्यकर्ते यांनी एकत्रित कार्य करण्‍याची गरज असल्‍याचा मृदाशास्त्रज्ञांचा कल या परिसंवादात दिसला. परिसंवादात भित्‍तीपत्रकाव्‍दारे शास्‍त्रज्ञांनी संशोधनात्‍मक लेखांचे सादरीकरण केले, यातील उत्‍कृष्‍ट सादरीकरणास तीन विजेत्यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  गौरोविण्यात आले. परिसंवाद यशस्‍वीतेकरिता मदा विज्ञान व रसायन शास्‍त्र विभागातील प्राध्‍यापक, अधिकारी व विद्यार्थ्‍यी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, December 21, 2023

मातीचे आरोग्‍य अबाधित राखण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज ....... डॉ एस के चौधरी

दोन दिवसीय मृदाशास्‍त्रज्ञाच्‍या राज्‍यस्‍तरीय परिसंवादाचे उदघाटन प्रसंगी प्रतिपादन 

महाराष्‍ट्र ठिंबक सिंचन, तुषार सिंचन व सुक्ष्‍म सिंचन पध्‍दतीचा शेतकरी बांधव मोठा प्रमाणात वापर करित आहेत. रासा‍यनिक खतांचा वापर मर्यादित करण्‍याकरिता पर्याय दयावा लागेल. दरवर्षी विविध कारणांमुळे जमिनीची धूप होत असल्‍याने मातीचा -हास होत आहे. मातीचे आरोग्‍य अबाधित राखण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज आहे. बदलत्‍या हवामान परिस्थितीत माती व पाणी यांच्‍या स्‍वरूपात होणारे बदल लक्षात घेऊन संशोधनाला प्राधान्‍य द्यावे लागेल. कृ‍षीच्‍या विद्यार्थ्‍यांतुन चांगले शास्‍त्रज्ञ घडले पाहिजेत, त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याची गरज , असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील नैसर्गिक स्‍त्रोत व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे उपमहानिर्देशक डॉ एस के चौधरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने २१ व २२ डिसेंबर रोजी अन्‍न सुरक्षा आणि कृषी शाश्‍वततेसाठी मातीचे आरोग्‍य पुर्नेजीवन यावरील मृदाशास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि होते, प्रमुख पाहूणे कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्‍य डॉ. बी. एस. व्दिवेदी, हैद्राबाद येथील इक्रीसॅटच्‍या जागतिक संशोधन कार्यक्रमाचे संचालक डॉ. एम. एल. जाट हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद ईस्‍माईल, आयोजक विभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य, सचिव डॉ अनिल धमक आदींची उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्‍ती पाणी, माती, ऊर्जा यांचे संवर्धन करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. बदलत्‍या हवामानामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. शेतकरी बांधवाना शेतीत जोखिम व्‍यवस्‍थापन शिकण्‍याची आवश्‍यकता आहे. 

डॉ एम एल जाट यांनी जगात शांतता व अखंडता राखण्‍याकरिता मातीचे आरोग्‍य टिकविणे आवश्‍यक असल्‍याचे म्‍हणाले. तर डॉ बी एस व्दिवेदी यांनी धोरणकर्ते, उद्योजक, शासन, विद्यापीठ आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे मृदा आरोग्‍य जपण्‍याकरिता काम करण्‍याची गरज असल्‍याचे म्‍हणाले.

कार्यक्रमात अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे मृदा शास्‍त्रज्ञ डॉ एन एम कोंडे यांना भारतीय मृदा विज्ञान संस्‍थेतर्फे मृदगंध पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी सिताराम देशमुख, प्रताप काळे, प्रकाश स्‍वामी, मिलिंद दामले आणि सेवानिवृत्‍त मृदाशास्‍त्रज्ञ यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रविण वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ अनिल धमक यांनी मानले.

परिसंवादात महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील १४७ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला असुन अन्न सुरक्षा आणि कृषि शाश्वतेसाठी मातीचे आरोग्य पुनरर्ज्जीवित करणे या विषयावर परिसंवादात सहभागी मृदाशास्‍त्रज्ञ विविध सत्रात विचारमंथन करण्‍यात आले. 



Wednesday, December 20, 2023

वनामकृवित मृदशास्त्रज्ञाचे राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्थाशाखा परभणीच्या वतीने २१ व २२ डिसेंबर रोजी मृद शास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात असुन परिसंवादाचे उद्घाटनास  दिनांक २१ डिसेंबर रोजी  सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि राहणार असुन प्रमुख पाहूणे नवी दिल्‍ली येथील नैसर्गिक स्त्रौत व्यवस्थापन संस्‍थेचे उपमहानिर्देशक मा. डॉ. सुरेश कुमार चौधरी, कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्‍य डॉ. बि.एस. व्दिवेदी, जागतिक संशोधन कार्यक्रमइक्रीसॅटहैद्राबाद चे  संचालक डॉ. एम.एल. जाट आदींची उपस्थिती लाभणार आहे. 

परिसंवादास महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील सुमारे २०० शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहेत. अन्न सुरक्षा आणि कृषि शाश्वतेसाठी मातीचे आरोग्य पुनरर्ज्जीवित करणे याविषयावर परिसंवादात सहभागी मृदाशास्‍त्रज्ञ विविध सत्रात विचारमंथन करणार आहेत. भविष्य काळात उद्योग आणि कृषि विकास यांना सुसंग तसेच  जमिन व्यवस्थापन संबधीचे धोरण निश्चित करण्यात मदत होईल. माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवणएनबिएसएस नागपुर चे संचालक डॉ. एन.जी. पाटीलराष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्‍थेचे संचालक डॉ. स्वामी रेड्डीएकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संस्‍थेचे माजी अतिरीक्त आयुक्त डॉ. वंदना व्दिवेदीशिक्षण संचालक डॉ. उदय खोडकेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकरसंचालक बियाणे डॉ. देवराव देवसरकरमाजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटीलसहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद ईस्माइल आदीचा सहभाग राहणार आहे.

या परिसंवादाचे नियोजन कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद ईस्माइल यांच्या देखरेखी खाली करण्‍यात आले आहे. परिसंवाद नियोजनाकरिता भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी चे अध्यक्ष डॉ. प्रविण वैद्यसचिव डॉ.अनिल धमकडॉ. जि.आर. हानवतेडॉ. आर.एन. खंदारे डॉ. महेश देशमुखडॉ. सुरेश वाईकरडॉ. गणेश गायकवाडडॉ.सुदाम शिराळेडॉ. स्वाती झाडेडॉबि.आर. गजभियेडॉ. पप्पीता गोरखेडेडॉ. संतोष चिक्षेडॉ. संतोष पिल्लेवाडडॉ. स्नेहल शिलेवंतश्री.भानुदार इंगोलेश्री.आनंद नंदनवरेश्री.शिरीष गोरेश्री.रणेरश्री.अजय चरकपल्ली आदीसह विभागातील कर्मचारी आणि पदव्‍युत्‍तर विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.