Saturday, November 30, 2019

मराठवाडयात बहुतांश ठिकाणी रब्बी ज्वारीवर मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव

एकात्मीक कीड व्यवस्थापन करण्‍याचे वनामकृवि शास्‍त्रज्ञांचे आवाहन 

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी व मका पिकाची पेरणी झाली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु मराठवाडयात बहुतांश ठिकाणी रब्बी ज्वारीवर मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसुन येत असुन त्यासाठी पुढील प्रमाणे एकात्मीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
लष्करी अळीचे व्यवस्थापन
§    मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ते ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५% निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी रावी.
§       वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
§  अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राॅकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
§  मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण करावे.
§  सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत.
§  किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इत्यादी) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
§  ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५०,००० अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये पतंग / सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.
§  रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी १०% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.

अ.क्र.
जैविक कीटकनाशक
मात्रा / १० लि. पाणी
मेटाहायजियम अॅनिसोप्ली 
(१x१०सीएफ़यु/ग्रॅम)
५० ग्रॅम
नोमुरिया रिलाई 
(१ x १० सीएफ़यु/ग्रॅम)
५० ग्रॅम
बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती
२० ग्रॅम

§  वरील जैविक कीटकनाशके पीक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फ़वारणी करावी. त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने ते फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरणात जैविक कीटकनाशकांच्या वापरासाठी पोषक आहे.

वारणीसाठी कीटकनाशके 
कालावधी
प्रादुर्भाची पातळी
कीटकनाशक
मात्रा / १० लि पाणी
रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था
(अंडी अवस्था)
५% प्रादुर्भावग्रस्त झाडे
निंबोळी अर्क किंवा
५%
अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम
५० मिली
मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था
(दुस–या व तिस–या अवस्थेतील अळ्या)
१०-२०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
इमामेक्टीन बेंझोएट ५ % डब्ल्युअजी किंवा
४ ग्रॅम
स्पिनोसॅड ४५ % एससी किंवा
३ मिली
थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी किंवा
५ मिली
क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ % एससी
४ मिली
शेवटच्या अवस्थेतील अळ्या

विषारी आमिषाचा वापर करावा. यासाठी १० किलो साळीचा भुसा व २ किलो गुळ २-३ लिटर पाण्यात मिसळून २४ तास सडण्यासाठी ठेवावे. वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये १०० ग्रॅम थायोडीकार्ब ७५ डब्ल्युजी मिसळावे. हे विषारी आमिष पोंग्यामध्ये टाकावे.

विशेष सूचना
§  रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी चारा पिकावर करु नये.
§ एकाच रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
§  तु–याची अवस्था व त्यानंतर फ़वारणी टाळावी.
§  फ़वारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
§  एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.

लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे वाहान किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजिव बंटेवाड, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.


Friday, November 29, 2019

महाऍग्रो कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यापीठ तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यास मदत होत आहे.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि अंतर्गत औरंगाबाद येथील कृषीतंत्र विद्यालयाच्‍या प्रक्षेत्रावर आयोजित सहाव्या राज्यस्तरीय महाअग्रॉ कृषी प्रदर्शनाचे उत्साहात उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषीतंत्र विद्यालय प्रक्षेत्रावर सहावे राज्यस्तरीय महाऍग्रो कृषी प्रदर्शन २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्‍यान आयोजित केले असुन दि २९ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन उत्साहात पार पडले. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष श्री भागवत कराड, औरंगाबाद शहराचे महापौर मा श्री नंदकुमार घोडले, अपेडाचे संचालक श्री रामचंद्र भोगले, सिआम औरंगाबादचे अध्‍यक्ष श्री अजित मुळे, माफदाचे अध्‍यक्ष श्री जगन्नाथ काळे, कृषी प्रदर्शनाचे आयोजक अॅड वसंतराव देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, श्री जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ तुकाराम मोटे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, प्राचार्य डॉ किरण जाधव, डॉ एस बी पवार, डॉ एम बी पाटील, डॉ किशोर झाडे आदी प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान कृषि प्रदर्शनाच्‍या माध्यमातून थेट शेतकरी बांधवाना माहीत होते, या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढण्यास मदत होते. शेतीतील समस्या कधीच संपत नाहीत केवळ त्‍याचे स्वरूप बदलत राहते. मराठवाडयातील शेतीपुढे अनेक समस्‍या आहेत, विद्यापीठ त्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ पुरवित आहे. आजपर्यंत विद्यापीठाने विविध पिकाचे १४५ पेक्षा जास्‍त वाणांनी निर्मिती केली असुन शेतकरी बांधव मोठया प्रमाणात त्‍याची लागवड करित आहेत. यामध्ये मूग, उडीद, ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, बाजरा, हरभरा आदींची वाण शेतकरी बांधवांसाठी लाभदायी ठरले आहेत. सातत्‍यांने विविध पिकांवरील किडी व रोग याचे निदान करणे व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्‍यावरही विद्यापीठाचा भर आहे. आज विद्यापीठ निर्मित बायोमिक्स हा घटक विविध पिकाच्या रोग निवारण होण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असुन यावर्षी दीड कोटी पेक्षा जास्‍त महसुल यापासुन विद्यापीठास प्राप्‍त झाला आहे. याची निर्मितीचे प्रयोग औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात होत आहे. विद्यापीठ विकसित बियाणे पूर्वी केवळ परभणी येथेच विक्री होत होती, त्यामुळे सर्व गरजू शेतकरी परभणी येथे येणे होत नव्हते, यावर्षी प्रत्‍येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठ बियाणे उपलब्‍ध केल्याने ज्या त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना बियाणे खरेदी करता आले, त्यामुळे विद्यापीठ आणि शेतकरी थेट नाते निर्माण होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन करून कृषि प्रदर्शनाचे नेटकेपणाने आयोजन करण्यासाठी अॅड वसंत देशमुख, विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ किरण जाधव, डॉ किशोर झाडे आणि त्यांच्या अधिनस्त असणारे सर्वाबाबत त्‍यांनी गौरवपूर्ण उल्लेख केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्‍य आयोजक अॅड वसंत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा अद्यापक यांनी केले आभार डॉ किरण जाधव यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
सदरिल कृषि प्रदर्शन पुढील चार दिवस चालणार असुन कृषि चर्चासत्राचेही आयोजन करण्‍यात आले आहे. कृषी प्रदर्शनात असणाऱ्या पीक प्रदर्शनातील मुख्य आकर्षण म्हणजे विद्यापीठ विकसित बीटी तंत्रज्ञानासह कपाशीचा वाण नांदेड-४४ तसेच प्रक्षेत्रावर केलेले कापसाचे एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रात्‍यक्षिक, विद्यापीठ विकसित केलेल्या वाणासोबतच विविध खाजगी कंपनी व्‍दारे प्रसारित वाणांची लागवड करण्यात आलेली आहे व सुधारित तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतावर राबविण्यात आले आहे.सौजन्‍य
रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद औरंगाबाद

सकारात्‍मक दृष्‍टीकोनच जीवनात यश मिळवुन देतो......मा सौ स्‍वाती शिंगाडे

फौजदारकी सोडली शेती केली.....प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी सौ स्‍वाती शिंगाडे यांचा प्रेरणादायी प्रवास
जीवन खडतर प्रवास आहे, याच खडतर प्रवासात व्‍यक्‍ती घडत असतो. जीवनाकडे पाहाण्‍याचा दृष्‍टीकोन सकारात्‍मक असला पाहिजे, सकारात्‍मक दृष्‍टीकोनच जीवनात यश मिळवुन देतो. कौशल्‍य अनुभवातुन शिकता येते, प्रत्‍येक वेळी अनुभवातुन आपण विकसित होत असतो. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना कॅरियरच्‍या अनेक वाटा आहेत. केवळ शासकीय नौकरी हेच कॅरियरचे ध्‍येय नको. कृषि उद्योजकता क्षेत्रात अमर्याद संधी आपणास खुणवत आहेत. महिलांनाही यात मोठया संधी आहेत. कृषि क्षेत्रातील नैराश्‍याचे वातावरण कमी करण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी पुढे यावे. शेतीकडे वळा, शेतीतही मोठे करिअर करता येते, असे प्रतिपादन प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी व कृषी उद्योजिका सौ स्‍वाती शिंगाडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राजमाता जिजाऊ मुलींचे वसतीगृहात दिनांक 28 नोव्‍हेबर रोजी आयोजित व्‍याख्‍यानात त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रभारी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सौ उषाताई अशोक ढवण, डॉ जयश्री एकाळे, डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने नवीन कृषि शिक्षण अभ्‍यासक्रमात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषि उद्योजकता विकास व्‍हावा यावर विशेष भर आहे. अनेक मुली कृषि शिक्षणाकडे वळत असुन शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कॅरियर घडवीत आहेत. परंतु मुलींना कॅरियर व कौंटुबिक जबाबदारी यात समतोल राखतांना मोठा संघर्ष करावा लागतो. कृषि पदवीधर असलेल्‍या सौ स्‍वाती शिंगाडे हिने यांनी पोलिस उपनिरिक्षक पदाचा राजनामा देऊन यशस्‍वी महिला शेतकरी व कृषि उद्योजकता म्‍हणुन एक आदर्श निर्माण केला. 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन सुवर्णा चौधरी हिने केले तर आभार शितल हुलगुंडे मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ फरिया खान, डॉ मिनाक्षी पाटिल, डॉ पपिता गौरखेडे, डॉ गोदावरी पवार आदीसह वसतीगृहातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

फौजदारकी सोडली शेती केली.....प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी व कृषी उद्योजिका सौ स्‍वाती शिंगाडे यांचा प्रेरणादायी प्रवास
सौ स्‍वाती शिंगाडे या राहुरी येथील कृषि विद्यापीठाच्‍या कृषी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी असुन त्‍यांची 2006 साली पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली होती. त्‍यानंतर त्‍यांनी या पदाचा राजीनामा देऊन शेतीक्षेत्राकडे वळाल्‍या. बारामती परिसरात माळरानावरील पडीत केवळ साडेतीन एकर शेती पासुन सुरूवात करून आज तब्‍बल 55 एकर शेती त्‍या कसतात. हायटेक शेती, पॉलिहाऊस मधील फुलशेती व भाजीपाल त्‍या पिकवतात. तसेच सेंद्रिय शेती करून प्‍युअर ऑरगॅनिक नावाच्‍या ब्रँडने विक्री करतात. तसेच विदेशातही त्‍याचा माल विक्री होतो. आज त्‍यांनी अनेक शेतकरी गट स्‍थापन करून एकत्र जोडले आहेत. शासकीय नौकरी सोडुन शेतीत स्‍वताचे स्‍वतंत्र अस्ति‍त्‍व त्‍यांनी निर्माण केले असुन त्‍यांना राष्‍ट्रीय पातळीवरील सर्वोत्‍कृष्‍ट भारतीय महिला किसान पुरस्‍कारांनी सन्‍माननित करण्‍यात आले आहे.   

Thursday, November 28, 2019

शेतकरी व्‍यावसायिक झाला पाहिजे........प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा व यशस्‍वी महिला शेतकरी सौ स्‍वाती शिंगाडे यांचे प्रतिपादन

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेतीवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

आज शेतमाल केवळ पिकविणे महत्‍वाचे नसुन तो विकता आला पाहिजे तरच शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढेल. शेतकरी हा व्‍यावसायिक झाला पाहिजे. शेतीतील निविष्‍ठांची खरे‍दी, पिकांची लागवड, शेतमालाची प्रतवारी आणि शेतमालाची विक्री आदी सर्व कामे एकटा शेतकरी करून शकत नाही, यासाठी शेतकरी गट स्‍थापन करा, आज शासनाच्‍या अनेक योजना यासाठी उपलब्‍ध आहेत, त्‍याचा लाभ घ्‍या, असे प्रतिपादन प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी सौ स्‍वाती शिंगाडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडा विभागातील आठही जिल्‍हयातील शेतक-यांकरिता सेंद्रीय शेतीवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २८ ते ३० नोव्‍हेबर दरम्‍यान परभणी जिल्‍हयातील शेतक-यांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक २८ नोंव्‍हेबर रोजी आयोजित करण्‍यात आले होते त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर रायपुर (छत्‍तीसगड) येथील राष्‍ट्रीय जैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ अनिल दिक्षीत, प्रगतशील शेतकरी अॅड गंगाधरराव पवार, श्री सोपानराव अवचार, प्रभारी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, केंद्राचे प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा सौ स्‍वाती शिंगाडे पुढे म्‍हणाल्‍या की, सेंद्रिय शेती करतांना अनुभवातुन आपण शिकले पाहिजे. सेंद्रिय शेतीमालाबाबत ग्राहकांचा विश्‍वास संपादन करणे गरजेचे असुन त्‍याकरिता सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणिकरण महत्‍वाचे आहे. सेंद्रिय शेती करतांना हळुहळु शेतीतील रासायनिक खत व किडकनाशकांचा वापर कमी करा. सेंद्रिय शेती कडे हळुहळु पर्यायी शेती म्‍हणुन वळा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सेंद्रिय शेती की रासायनिक शेती यावर अनेक वादविवाद झाले. आज रासायनिक खत, किटकनाशकांचे दुष्‍परिणाम मानवाच्‍या आरोग्‍यावर व पर्यावरणावर दिसत आहेत, त्‍यामुळे सेंद्रिय शेतीही संकल्‍पना लोकांमध्‍ये रूढ होत आहे, त्‍यास आता शासनही प्रोत्‍साहन देत असुन कृषि विद्यापीठही संशोधनाची जोड देत आहे म्‍हणजेचे सेंद्रिय शेतीला लोकांचा लोकाश्रय, शासनाकडुन राजाश्रय तर विद्यापीठाकडुन ज्ञानाश्रय मिळत आहे. त्‍यामुळे सेंद्रिय शेती एक पर्याय म्‍हणुन पुढे येत आहे. पर्यायी उत्‍पादन व्‍यवस्‍था म्‍हणुन सेंद्रिय शेती विकसित होत आहे. सेद्रिय शेती करतांना आपणास शिकत शिकत पुढे जावे लागेल. आपणास अनुभवातुन शहाणे व्‍हावे लागेल. सेंद्रिय शेतीतील निविष्‍ठा या शेतक-यांनी स्‍वत: निर्माण केल्‍या पाहिजे व शेतमालाचे विपणन तंत्र शिकले पाहिजे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
मार्गदर्शनात डॉ अनिल दिक्षित म्‍हणाले की, सेंद्रिय शेतीचे अनेक पध्‍दतीत आहेत. शास्‍त्रीय आधारावर सेंद्रिय शेती तंत्रज्ञान सिध्‍द झाले पाहिजे. सेंद्रिय शेतीतील प्रमाणिकरण केलेल्‍या दर्जेदार शेतमालास मोठी किंमत भेटली पाहिजे, असे मत त्‍यांनी  व्‍यक्‍त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी अॅड गंगाधरराव पवार व सोपानराव अवचार यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.   
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ आर एन खंदारे यांनी मानले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री ओंमकार शिंदे, श्री नरेश शिंदे, श्री रमेश चाकणकार आदींचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शास्‍त्रज्ञ, प्रशिक्षणार्थी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

फौजदारी ते यशस्‍वी महिला शेतकरी मा सौ स्‍वाती शिंगाडे यांचा अल्‍प परिचर
सौ स्‍वाती शिंगाडे या राहुरी येथील कृषि विद्यापीठाच्‍या कृषी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी असुन त्‍यांची 2006 साली पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली होती. त्‍यानंतर त्‍यांनी या पदाचा राजीनामा देऊन शेतीक्षेत्राकडे वळाल्‍या. बारामती परिसरात माळरानावरील पडीत केवळ साडेतीन एकर शेती पासुन सुरूवात करून आज तब्‍बल 55 एकर शेती त्‍या कसतात. हायटेक शेती, पॉलिहाऊस मधील फुलशेती व भाजीपाल त्‍या पिकवतात. तसेच सेंद्रिय शेती करून प्‍युअर ऑरगॅनिक नावाच्‍या ब्राडने विक्री करतात. तसेच विदेशातही त्‍याचा माल विक्री होतो. आज त्‍यांनी अनेक शेतकरी गट स्‍थापन करून एकत्र जोडले आहेत. शासकीय नौकरी सोडुन शेतीत स्‍वताचे स्‍वतंत्र अस्ति‍त्‍व त्‍यांनी निर्माण केले असुन त्‍यांना राष्‍ट्रीय पातळीवरील सर्वोत्‍कृष्‍ट भारतीय महिला किसान पुरस्‍कारांनी सन्‍माननित करण्‍यात आले आहे.   

परभणी जिल्‍हयातील शेतक-यांकरिता सदरिल प्रशिक्षण दिनांक दिनांक २८ ते ३० नोव्‍हेबर दरम्‍यान होणार असुन हिंगोली जिल्‍हयासाठी २ ते ४ डिसेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले आहे. प्रत्‍येक जिल्‍हयातुन शंभर शेतक-यांना यात प्रशिक्षीत करण्‍यात येणार असुन संबंधित जिल्‍हयाचे आत्‍मा (कृषि विभाग) प्रकल्‍प संचालक व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्‍या कडुन संयुक्‍तपणे ८० व संबंधित जिल्‍हयातील कृषि विज्ञान केंद्र व थेट विद्यापीठ यांच्‍या माध्‍यमातुन प्रत्‍येकी दहा शेतक-यांनी निवड करण्‍यात आली आहे. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, देशातील व राज्‍यातील सेंद्रीय शेतीतील शास्‍त्रज्ञ व तज्ञ शेतकरी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, जैविक कीड वयवस्‍थापन, जैविक रोग व्‍यवस्‍थापन, सेंद्रीय पध्‍दतीने अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय बाजारपेठ, व सेंद्रीय शेतकरी यशोगाथा अशा विषयावर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
मार्गदर्शन करताना मा कुलगुरू डॉ अशोक ढवण 
मार्गदर्शन करताना मा सौ स्वाती शिंगाडे 
मार्गदर्शन करताना मा डॉ अनिल दीक्षित