Wednesday, February 28, 2018

Friday, February 23, 2018

महाविद्यालयीन जीवनातच भावी आयुष्‍याचा पाया रचला जातो.....डॉ मंजिरी कुलकर्णी

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने जालना टु युएसए व्‍हाया परभणी – जपान व्‍याख्‍यानाचे आयोजन

महाविद्यालयीन वर्ष ही विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनाला दिशा देणारी असतात, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांच्‍या भावी आयुष्‍याचा पाया रचला जातो. स्‍वत:च्‍या कोषातुन बाहेर पडा, नावीण्‍यपुर्ण गोष्‍टी शिकण्‍याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन डॉ मंजिरी कुलकर्णी हिने केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जालना टु युएसए व्‍हाया परभणी – जपान याविषयावर परभणी कृषि महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्‍यींनी डॉ मंजिरी कुलकर्णी यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ हिराकांत काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ मंजिरी कुलकर्णी पुढे म्‍हणाल्‍या की, विद्यार्थ्‍यांनी धरसोडवृत्‍ती ठेऊ नये, मोठी स्‍वप्‍न पाहा, योग्‍य नियोजनासोबत जिद्द व मेहनतीच्‍या बळावर नक्कीच साकार होते. महाविद्यालयीन जीवनातच चांगल्‍या गोष्‍टी संपादन करा, विद्यापीठातील मुलभुत सुविधांचा व ग्रंथालयाचा वापर करा. प्राध्‍यापकांचे व वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचा सल्‍ला घ्‍या. महाविद्यालयीन जीवनातच व्‍यवस्‍थापन कौशल्‍य शिकण्‍याची संधी असते. कृषी अभ्‍यासक्रमात अनेक विषयाचा अभ्‍यास आहे, त्‍यामुळे कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना अनेक विषयात संधी आहेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
डॉ मंजिरी कुलकर्णी हिने 2008 साली परभणी कृषी महाविद्यालयातुन पदवी पुर्ण केल्‍यानंतर तामीळनाडु कृषि विद्यापीठात बॉयोटेक्‍नोलीजी मध्‍ये पपई वरील विषाणुवर संशोधन करून एम एस्‍सी पदवी प्राप्‍त केली. जपान सरकाराची शिष्‍यवृत्‍ती मिळवुन टोकीयो विद्यापीठातुन डेंगु विषाणुवर संशोधन करून पीएच डी प्राप्‍त केली, नंतर अमेरीकेतील इलिनॉय विद्यापीठातुन पोस्‍ट डॉक अभ्‍यासक्रम पुर्ण केला. विविध देश व विदेशातील परिसंवादात सहभाग नोदंवुन संशोधन लेख सादर केली. नुकतेच देशाचे पंतप्रधान जपान दौ-यावर असतांना त्‍यांच्‍याशी संवाद साधला. सध्‍या त्‍यांची टोकीओ विद्यापीठात वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ म्‍हणुन निवड झाली आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाराष्‍ट्र व मराठवाडा विभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये इंग्रजी भाषेबाबत न्‍युनगंड असतो, त्‍यामुळे इंग्रजी भाषावर प्रभुत्‍व मिळविण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत.
प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यापीठाचे अनेक माजी विद्यार्थ्‍यी विदेशात व देशात उच्‍च पदावर कार्यरत असुन या व्‍यक्‍ती विद्यापीठाचे ऑयकॉन आहेत. विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन कक्षाच्‍या माध्‍यमातुन त्‍यांचे व्‍याख्‍यान वेळोवेळी आयोजित करण्‍यात येईल.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्‍याचा अल्‍पपरिचय डॉ हिराकांत काळपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ ए बी बागडे, डॉ एम पी वानखडे, भागवत चव्‍हाण, मनोज करंजे, अमोल सोळंके, विजय रेडडी, कैलास भाकड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, February 21, 2018

वनामकृवित कृषि अवजाराचे प्रदर्शन व प्रात्‍यक्षिकांचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्‍प अंतर्गत पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या वतीने कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे औचित्‍य साधुन दिनांक 23 फेब्रूवारी रोजी सकाळी 11.00 वाजता सुधारीत कृषि अवजारे व अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्‍याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जवळील ऊर्जा उद्यानात करण्‍यात आले असुन कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात होणार आहे. कार्यक्रमास परभणीचे जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवा शंकर यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती लाभणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात ट्रॅक्टर चलित विविध कंपन्‍याचे अवजारे, सौरचलित अवजारे, सुधारित बैल‍चलित अवजारे आदींचे प्रदर्शन व प्रात्‍य‍ाक्षिके दाखविण्‍यात येणार असुन यावर चर्चासत्रही होणार आहे. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता एन सोलंकी यांनी केले आहे. तरी जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी या प्रदर्शनीचा लाभ घेण्‍याचे आवाहन आयोजकांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Monday, February 19, 2018

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी कुल‍सचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे ढोलताशाच्‍या गजरात शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.

Saturday, February 17, 2018

जैवतंत्रज्ञान व आण्विक कृषि क्षेत्रात कृषि पदवीधरांना अनेक संधी..... भाभा अणुसंशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अशोक बडिगंनवार

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने व्‍याख्‍यानाचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आण्विक कृषि व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संधी याविषयावर मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ अशोक बडिगंनवार यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ अशोक बडिगंनवार म्‍हणाले की, कृषि संशोधनामुळेच देश आज 250 दशलक्ष मे. टन पेक्षा जास्‍त अन्‍नधान्‍य उत्‍पादनाचे लक्ष गाठु शकला. भाभा अणुसंशोधन केंद्राने आण्विक तंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेले विविध पिकातील अनेक उपयुक्‍त वाण देशातील शेतक-यांमध्‍ये प्रचलित झाले आहेत. आण्विक कृषि व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नौकरीच्‍या अनेक संधी कृषी पदवीधरांना आहेत, परंतु या क्षेत्राबाबत विद्यार्थ्‍यी अनभिज्ञ आहेत. यावेळी त्‍यांनी देशातील व विदेशातील विविध संस्‍थेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या शिष्‍यवृत्‍त्‍याबाबत मार्गदर्शन केले.
अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यापीठस्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेला मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष अधिक बळकट करून कृषि पदवीधरांना रोजगाराच्‍या विविध संधीचे दालन उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. कार्यक्रमात प्रमुख पाहुणाचा अल्‍प परिचय डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार भागवत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, February 12, 2018

समाज घडविण्‍यासाठी संस्‍कारांचे विचारपीठ उभे करावी लागतील.......श्री यशवंत गोसावी

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयात शिवजयंती महोत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन
कमी वयातच शिवछत्रपती, शाहु महाराज, ज्‍योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आदीं थोर पुरूषांनी इतिहास रचला. या थोर व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या विचारांचा महाविद्यालयीन युवकांनी अभ्‍यास केला पाहिजे, शिवचरित्राचे चिंतन केले पाहिजे. चांगला समाज घडविण्‍यासाठी महाविद्यालयांनी व पालकांनी संस्‍काराचे विचारपीठ उभे केली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवव्‍याख्‍याते श्री यशवंत गोसावी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने शिवजयंती निमित्‍त शिवव्‍याख्‍यान मालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शिवश्री यशवंत गोसावी यांनी पहिले पुष्‍प गुंफले. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषि परिषदेचे शिक्षण संचालक डॉ एच के कौसडीकर, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद र्इस्‍माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री यशवंत गोसावी पुढे म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात व्‍यसनापासुन व समाज माध्‍यमाच्‍या आभासी जगापासुन दुर रहावे. गरिबी हे जीवनात अपयशाचे कारण होऊ शकत नाही कारण अनेक गरिब कुटूंबातील विद्यार्थ्‍यींनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. युवकांनी आपले ध्‍येय निश्चित करून निरंतर परिश्रम घेतले पाहिजे. आई - वडीलांचे स्‍वप्‍न पुर्ण करणे हेच युवकांचे ध्‍येय असले पाहिजे.
कार्यक्रमात डॉ एच के कौसडीकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन अक्षय नाटकर यांनी केले तर आभार अदिती वाघ हिने मानले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी शिवजयंती महोत्‍सव 2018 समितीचे अध्‍यक्ष महेश भोसले, उपाध्‍यक्ष तुकाराम कु-हे व इतर सदस्‍यांनी परिश्रम घेतले. 

तुळजापुर (जि. उस्मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्रात कृषि तंत्रज्ञान महोत्सवानिमित्त महिला मेळावा संपन्नSunday, February 11, 2018

वनामकृवितील एलपीपी स्‍कुलमध्‍ये कॉन्‍व्‍होकेशन व टॅलेंट शो साजरा

वनामकृविच्‍या सामाजिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व अभ्यास विभागातर्फे एलपीपी स्कूल मध्‍ये नववे कॉन्व्होकेशन व टॅलेंट शो जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, माजी प्राचार्य प्रा. विशाला पटनम, एलपीपी स्कूलचे माजी विद्यार्थीं व सध्‍या टोरन्टो (कॅनडा) येथे कार्यरत असणारे इंजिनीअर श्री अनिकेत पाटील, डॉ. जया बंगाळे, डॉ. वीणा भालेराव, डॉ. रमन्ना देसेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. टॅलेंश शो मध्‍ये एलपीपी स्कुलच्‍या विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या विविध कलागुणांचे सादरिकरण केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मान्‍यवरांनी एलपीपी स्कूलमधील उच्च दर्जाच्या बालशिक्षणामुळे अनेक विद्या‍र्थ्‍यीं पुढे प्रौढावस्थेत उत्तूंग भरारी घेत असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यांचे पालक, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, February 8, 2018

वनामकृविच्‍या प्रक्षेत्रावरील कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठीच्‍या पी बी रोप संरक्षक धाग्‍याच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठीच्‍या पी आय इंडस्‍ट्रीजच्‍या पी बी रोप या संरक्षक धाग्‍याच्‍या प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आले असुन प्रात्‍यक्षिक भेटीचे आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ जी के लोढे, कापुस विशेषतज्ञ डॉ के एस बेग, प्रभारी अधिकारी डॉ व्‍ही के खर्गखराटे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ एस एम तेलंग, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ आसेवार, डॉ यु एन आळसे, पी आय इंडस्‍ट्रीजचे संजय खर्चे, प्रविण जाधव व संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सन 2017 मधील खरिप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे राज्‍यातील कापसाचे अतोनात नुकसान झाले. पी बी रोप हे जपानी तंत्रज्ञान असुन भारतात पी आय इंडस्‍ट्रीजन आणले आहे. सद‍र पी बी रोप संरक्षक धाग्‍याची प्रक्षेत्र चाचणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कपाशीवर मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर घेण्‍यात आले आहे. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठातील प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेल्‍या प्रात्‍यक्षिकात आशादायक निर्ष्‍कष हाती आले असुन हे तंत्रज्ञान एकात्मिक किड वयवस्‍थापनामध्‍ये एक महत्‍वाची भुमिका बजावु शकतो व गुलाबी बोंडअळीचा कपाशीवरील प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.
सदरिल तंत्रज्ञान विषयी थोडक्‍यात माहिती
निसर्गात किटक हे विविध पध्‍दतींचा वापर करत रासायनिक संदेशवहनाने एकमेकांशी संवाद साधतात. पतंगवर्गीय किटकांमध्‍ये प्रौढ मादी ही एक अशाच प्रकारे संदेशवाहक सोडते, ज्‍याला कामगंध किंवा फेरोमन असेही म्‍हणतात. प्रौढ नर या कामगंधाकडे आकर्षित होऊन त्‍यांचे प्रजनन होते व पुढील पिढी जन्‍मास येते. किडनियंत्रणाच परंपरागत पध्‍दतीमध्‍ये कामगंधाचा वापर ही एक प्रभावी पण दुर्लक्षीत पध्‍दत आहे. कामगंध हा एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनामध्‍ये एक महत्‍वाची भुमिका बजावतो. गुलाबी बोंडअळीची मादी ही गॉसिप्‍लुर नावाचा कामगंध सोडते, ज्‍याकडे गुलाबी बोंडअळीचा नर आकर्षित होऊन त्‍यांचे प्रजनन होते. पी बी रोप हा 20 सेमी धागा असुन ज्‍यामध्‍ये गॉसिप्‍लुर कामगंध भरलेला असतो. कपाशीचे पिक 35 ते 40 दिवसांचे असते, तेव्‍हा हा धागा शेतात एक वेळेसच बांधायचा असतो. हा धागा शेताच्‍या कडेने व आत समान अंतरावर बांधावयाचा असुन एकदा पी बी रोप बांधल्‍यावर 90 ते 100 दिवसांपर्यंत गॉसिप्‍लुर सोडत राहतो. या धाग्‍यातुन निघालेल्‍या गॉसिप्‍लुर मुळे गुलाबी बोंडअळीचा नर मादीला शोधु शकत नाही, ज्‍यामुळे गुलाबी बोंडअळीच्‍या प्रजननास आळा बसतो. हया कमी झालेल्‍या प्रजननामुळे गुलाबी बोंडअळीची संख्‍या पिढयानपिढया कमी होते व अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच प्रादुर्भावास अटकाव होतो. पी बी रोपचा वापर जास्‍त क्षेत्रावर केल्‍यावर त्‍याचा अधिक प्रभाव होतो. यामुळे गुलाबी बोंडअळीच्‍या नियंत्रणासाठीच्‍या किटकनाशकांचा वापर कमी होतो. त्‍यामुळे मित्र किटींची संख्‍येत वाढ होते.
सदरिल प्रात्‍यक्षिक कार्यक्रमास मराठवाडयातील अनेक शेतक-यांनी सहभाग नोंदवला व तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात वक्तृत्‍व स्‍पर्धा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने कृषी शिक्षण दिनाचे औचित्‍य साधुन माध्‍यामिक शालेय विद्यार्थ्‍यांकरिता जिल्‍हास्‍तरीय वक्‍तृत्‍व स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत जिल्‍हातील पाच शाळेतील विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. यात कु. वसुंधरा जाधव हीने प्रथम, कु. साक्षी आसेवार हीने व्दितीय तर कु. सुरेखा माने हीने तृतीय क्रमांक पटकविला. कु. गायत्री कुलकर्णी हीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्‍यात आले. स्‍पर्धेचे पारितोषिक वितरण कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले, यावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले, अप्‍पर जिल्‍हाधिकारी डॉ अण्‍णासाहेब शिंदे, डॉ पी आर झंवर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी शालेय मुलांमध्‍ये कृषि व कृषि शिक्षणाबाबत जनजागृती करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले. सदरिल स्‍पर्धेचे आयोजन भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या सुचनेवर करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.