Wednesday, October 24, 2018

हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम.....संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
हवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्‍न सुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्‍दतीत मोठा बदल झाला असुन अन्‍न व चारा दोन्‍हीचे उत्‍पादन देणारी खरिप व रबी ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्‍या चा-यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्‍यामुळे पशुंची संख्‍या कमी होत आहे, शेतक-यांना नियमित वर्षभर उत्‍पन्‍न देणारा दुग्ध व्‍यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या (भारत सरकार) कृषि विभागाच्‍या विस्‍तार संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 ते 30 ऑक्‍टोबर दरम्‍यान हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर पुणे येथील भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ ओ पी श्रीजीथ, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्रशिक्षणाचे आयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ ए एस जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा अल्‍पभुधारक व अत्‍यल्‍पभुधारक शेतक-यांच्‍या जीवनावर जास्‍त परिणाम होत आहे. दिवसेंदिवस पाण्‍याची पातळी खालवत असुन पाण्‍याचा प्रत्‍येक थेंबाचा कार्यक्षमरित्‍या शेतीत वापर करण्‍यावर भर द्यावा लागेल. कमीत कमी संरक्षित सिंचनाची सुविधा केल्‍यास पिकांच्‍या उत्‍पादनात मोठी वाढ होते, यासाठी जलसंधारणच्‍या विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ ओ पी श्रीजीथ भाषणात म्‍हणाले की, संपुर्ण देशात तालुका पातळीवर हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचे प्रयत्‍न चालु असुन प्रायोगिक तत्‍वावर काही भागात हा प्रकल्‍प कार्यान्‍वीत करण्‍यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आर एन खंदारे यांनी केले तर आभार डॉ जी आर हनवते यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात महाराष्‍ट्र, आंध्र प्रदेश, तेलगंणा व कर्नाटक राज्‍यातील कृषि विभागासह इतर विभागातील कृषि अधिकारी व शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला आहेउदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मौजे बाभळी येथे रबी पिक शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतील परभणी कृषि महाविद्यालय व कापुस संशोधन केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळी येथे दिनांक 20 ऑक्‍टोबर रोजी रबी पिक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बाभळीचे सरपंच विठ्ठलराव पंढरे हे होते तर उदघाटक म्‍हणुन गंगाप्रसाद आनेराव हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन वनस्‍पतीशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ व्‍ही डी साळुंखे हे उपस्थित होते.
मेळाव्‍यात गंगाप्रसाद आनेराव यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचे आवाहन शेतकरी बांधवाना केले तर डॉ व्‍ही डी साळुंखे यांनी शेतक-यांनी नियमितपणे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या संपर्कात राहण्‍याचा सल्‍ला दिला. यावेळी पशुसंवर्धनावर डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले तर रबी पिक लागवडीवर डॉ यु एन आळसे, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ डी डी पटाईत यांनी तर रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस व्‍ही पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एस एस शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन विशाल राठोड यांनी केले तर डॉ ए एस जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, October 23, 2018

वनामकृवि विकसित कपाशीचे नांदेड-४४ वाण बीटी मध्‍ये परावर्तीत हे कापुस उत्‍पादकांसाठी ऐतिहासिक उपलब्‍धी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण



परभणी कृषि विद्यापीठ विकसित कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण बीटीमध्‍ये परावर्तीत झाला असुन कोरडवाहु कापुस उत्‍पादक शेतक-यांच्‍या दृष्‍टीने एक ऐतिहासिक उपलब्‍धी आहे. हा वाण कापुस उत्‍पादकांच्‍या हदयावर पुन्‍हा अधिराज्‍य गाजवेल, अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केली. महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादीत अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांचे संयुक्‍त विद्यमाने संकरीत कपाशी नांदेड-४४ (एनएचएच-४४) व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम दिनांक २२ ऑक्‍टोबर रोजी परभणी येथील विद्यापीठ मध्‍यवर्ती प्रक्षेत्र - बलसा विभाग येथे पार पडला, या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर महाबीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक मा श्री ओमप्रकाश देशमुख, महा‍बीजचे संचालक मा श्री वल्‍लभरावजी देशमुख, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे महा‍व्‍यवस्‍थापक (उत्‍पादन) श्री सुरेश पुंडकर, महाव्‍यवस्‍थापक (विपणन) श्री रामचंद्र नाके, महाव्‍यवस्‍थापक (गुण नियंत्रण व संशोधन) डॉ प्रफुल्‍ल लहाने, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, कापुस विशेषज्ञ डॉ खिजर बेग, डॉ विलास खर्गखराटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठाने कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण १९८४ मध्‍ये प्रसारीत केला, त्‍यांनतर वीस वर्ष राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील कापुस उत्‍पादकांमध्‍ये लागवडीसाठी प्रचलित होता. हवामान बदलच्‍या पार्श्‍वभुमीवर हा वाण चांगले उत्‍पादन देणारा वाण ठरेल. येणा-या खरिप हंगामात नांदेड-४४ वाणाचे महाबिज मार्फत मर्यादित स्‍वरूपात विक्रीसाठी उपलब्‍ध होणारे बियाणे निवडक प्रयोगशील शेतक-यांच्‍या शेतावर लागवडीसाठी उपलब्‍ध कराव, या वाणाचा तुलनात्‍मक अभ्‍यास इतर वाणाशी करून प्रत्‍येक बाबींची नोंद घ्‍यावी. या वाणाचे बियाणे मुबलक प्रमाणात बाजारात आल्‍यास कपाशीच्‍या बियाणेबाबत शेतक-यांची होणारी फसवणुकीस आळा बसेल. कृषि विभाग, महाबिज व कृषि विद्यापीठ हे शेतक-यांच्‍या हितासाठी कटिबध्‍द आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

महाबीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक मा श्री ओमप्रकाश देशमुख आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, नांदेड-४४ व पीकेव्‍ही हायब्रीड-२ या कपाशीच्‍या वाणांचे बीजी-२ मध्‍ये परावर्तनामुळे या वाणाचे पुर्नजीवन झाले आहे. नांदेड-४४ हा कापसावरील रसशोषण करणा-या कीडींना कमी बळी पडणारा व गुलाबी बोंडअळीस सहनशील हा वाण आहे. यामुळे शेतक-यांचा कीडनाशक फवारणीवर होणारा मोठा खर्च कमी होईल व लागवड खर्च कमी होईल. सन २०२२ पर्यंत कापुस उत्‍पादकांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे असलेले उदिष्‍टे साध्‍य करण्‍यास याची मदत होई, असे मत व्‍यक्‍त करून शेतक-यांनी महाबीजच्‍या बीजोत्‍पादन कार्यक्रमात सहभागी होण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन १९८४ साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असल्‍यामुळे राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील इतर राज्‍यातील शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्‍हणजेचे बीजी-२ मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार करण्‍यात आला. हा करार माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, महा‍बीजचे माजी व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ शालीग्राम वाणखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आला. त्‍यानंतर या बीटी वाणाच्‍या गेल्‍या तीन वर्षापासुन सातत्‍याने प्रक्षेत्र चाचण्‍या यशस्‍वी झाल्‍या. त्‍याचा प्रात्‍यक्षिकाचा भाग म्‍हणुन सदरिल प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजण करण्‍यात आल्‍याचे सांगुन राज्‍यातील दोन सार्वजनिक संस्‍था महा‍बीज व कृषि विद्यापीठ एकत्रित कार्य केल्‍यामुळे आज कपाशी नांदेड-४४ हे वाण बीटीत परावर्तीत करण्‍यात यश आले. नांदेड-४४ मुळेच देशात परभणी कृषि विद्यापीठाची ओळख होती, अनेक दिवसापासुन शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी पुर्ण करू शकलो, असे मत व्‍यक्‍त केले.

यावेळी श्री सुरेश पुंडकर, श्री रामचंद्र नाके, डॉ प्रफुल्‍ल लहाने, श्री बी आर शिंदे, डॉ खिजर बेग आदींनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महा‍बीज विभागीय व्‍यवस्‍थापक श्री सुरेश गायकवाड यांनी केले तर महाबीज जिल्‍हा व्‍यवस्‍थापक श्री गणेश चिरूटकर यांनी सुत्रसंचालन केले. सदरिल पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महाबीज व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृविचे नुतन कुलसचिव श्री रणजित पाटील रूजु

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कुलसचिवपदी गृहनिर्माण विभागाचे अवरसचिव श्री रणजित पाटील यांची दोन वर्षासाठी प्रतिनियुक्‍तीने नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यांनी दिनांक 22 ऑक्‍टोबर रोजी सध्‍याचे कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे यांच्‍या कडुन पदभार स्‍वीकारला. श्री रणजित पाटील हे परभणी कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी असुन त्‍यांना अकरा वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. सन 2014 ते 16 दरम्‍यान ते परभणी महानगरपालिकेत उपायुक्‍त पदावर होते.

Sunday, October 21, 2018

मौजे इटलापूर (ता. जि. परभणी) येथे दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालनालयांतर्गत कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) अंगीकृत राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधक संस्थान, हैद्राबाद यांच्या माध्‍यमातुन राबविण्‍यात येत असलेल्‍या राष्ट्रीय पातळीवरील असंतुलीत व अनियंत्रीत रासायनिक खत व किटकनाकाचा पिकांवर होणारा प्रभावया संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दि. २० ऑक्टोबर रोजी मौजे इटलापूर ता. जि. परभणी येथे रासायनिक खते व किटकनाशाकांच्या असंतुलीत व जास्त वापरामुळे पीक व जमिनीच्या आरोग्यावर होणारे दुष्परीणाम याविषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्‍हणुन मृदाशास्त्रज्ञ डॉ. सय्यद इस्माईल, व किटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे हे उपस्थित होते.
अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, कोरडवाहू शेती पद्धती, सेंद्रीय पदार्थाचा योग्य वापर, अपांरपारीक पिके लागवड, यात निसर्गाला हानी न पोहोचवता जमिनीचे आरोग्य कसे राखावे याबद्दल मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित ज्वारीचे नवीन वाण परभणी क्ती वाणाद्वारे मानवी आहारातील अन्नद्रव्यांची कमतरता पुर्ण केल जाऊ कते असे सांगितले.
डॉ. सय्यद इस्माईल यांनी सद्यस्थितीतील अन्नद्रव्यांचा वापर, अन्नद्रव्यांची कमतरता, मानवाच्या आहारातील व रीरातील अन्नद्रव्यांचे बदलणारे प्रमाण उदभवणारे रोग व समस्या यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बी. व्ही. भेदे यांनी पिके व त्यांवरील विविध किडी, खत व किटकनाकांच्या वापरानुसार किटकांमध्ये होणारे बदल, प्रतिकारक्षमता व यांचे नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री. सुतारे,  उपसरपंच श्री. नांगरे, प्रगतशीशेतकरी श्री. पाटील व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गणेगायकवाड यांनी तर आभार गोविंद देमुख यांनी मानले. देशात केवळ सात विद्यापीठाची या संशोधन प्रकल्‍पाकरीता निवड करण्यात आलेली अुसन  राज्‍यात केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतच हा प्रकल्‍प आहे. यात सोयाबीन व वांगी या पिकामध्ये संशोधन करण्यात येत आहे.