Friday, February 27, 2015

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विसावा दीक्षान्‍त समारंभाचे आयोजन

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षान्‍त समारंभ दि ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात संपन्‍न होणार असुन कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान महाराष्‍ट्र राज्‍याचे राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महामहिम श्री. चेन्‍नमनेनी विद्यासागर राव भूषविणार असुन दीक्षान्‍त भाषण अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्‍यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर करणार आहेत. महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि व फलोत्‍पादन, पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्‍न होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍यासमवेत कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍यांसह अनेक मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी कळविले आहे.


इंदेगाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे आद्यरेषीय गहू प्रात्याक्षिकांतर्गत शेतकरी मेळावा संपन्न

सुधारित बियाण्‍यामुळे गहू उत्‍पादनात वाढ शक्‍य.......संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या गहू व मका संशोधन केंद्र व कर्नाल (हरीयाणा) येथील गहू संशोधन संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आद्यरेषीय गहू प्रात्‍यक्षिकांतर्गत इंदे्गाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे २५ फेब्रवारी रोजी शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेट आयोजित करण्‍यात आले होते. मेळाव्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर सरपंच अशोकरावजी बाबर, राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ. बी. जी. हिरवाळे, गहू व मका पैदासकार डॉ. व्हि. डी. साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदेगाव येथील शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिकांतर्गत कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या एमएसीएच-६४७२ या गव्‍हाच्‍या सुधारित वाणांची लागवड करण्‍यात असुन सध्‍या पीकांची वाढ समाधानकारक आहे.
यावेळी अध्‍यक्षीय भाषणात डॉ. डी. पी. वासकर यांनी गव्‍हाच्‍या प्रतवारी, प्रक्रीया, पॅकेजिंग, इत्‍यादीचे महत्‍व विषद करून सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे गव्‍हाच्‍या उत्‍पादनात हमखास वाढ होणार असल्‍याचे सांगितले. तसेच शेतक-यांनी आर्थिकर्स्‍थयेतेसाठी फळबाग लागवडीकडे वळावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. शास्त्रज्ञ डॉ. बी. जी. हिरवाळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गव्‍हाच्‍या सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे होणा-या उत्‍पादन वाढीचा आढावा घेण्‍यात आला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. व्‍ही. डी. साळुंके यांनी गहू पिकाच्‍या सुधारीत लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल मुंढे यांनी केले तर रामेश्‍वर ठोंबरे यांनी आभार मानले. मेळाव्‍यास शेतकरी बंधु भगिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. रोहित सोनवणे, राहूल झोटे, सचिन रणेर आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, February 26, 2015

फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे सेलु तालुक्यातील दिडशे शेतक-यांचे माती परीक्षण

वनामकृविच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाचे जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियान
जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियानांतर्गत सहभागी मृदाशास्‍त्रज्ञ डॉ ह‍रिहर कौसडीकर, डॉ अनिल धमक, शेतकरी व अनुभवाधारित शिक्षणाचे विद्यार्थी 

परभणी: संयुक्‍त राष्‍ट्र संघाने २०१५ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय मृदा वर्ष म्‍हणुन घोषीत केले असुन यानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विघ्‍यापीठाच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानांतर्गत सेलु तालुक्‍यामध्‍ये धनेगाव व कुंडी येथे दि २४ फेब्रुवारी रोजी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेचे एक दिवशीय माती परीक्षण शिबीर व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या उपक्रमात परीसरातील १५० शेतक-यांनी सहभाग नोंदविला.  यावेळी मृदाशास्‍त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर व डॉ अनिल धमक यांच्यासह पदवीपुर्व अनुभवाधारित शिक्षण अभ्‍यासक्रमाच्‍या दहा विध्‍यार्थनी शिवारातील शेतक-यांच्‍या शेतावर जाउन मातीचे नमुने गोळा केले. शेतकरी मेळाव्‍यात मृदाशास्‍त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर यांनी संतुलीत पिक पोषणासाठी माती परिक्षणाचे महत्‍व व त्यानुसार द्यावयाच्‍या खताच्या शिफारसाठी याबाबत तर डॉ अनिल धमक मृदशास्‍त्रज्ञ यांनी माती परीक्षण व पीक व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. मृदाशास्‍त्र विभागातील अनुभवाधारित शिक्षण प्रकल्‍पाचे विद्यार्थी सतीश कटारे, शिवप्रसाद संगेकर, आकाश देशमुख, गणेश कटुले, पुरूषौत्‍तम गाडेकर, वसंत जाधव, विलास झाटे, आकाश सुर्यवंशी, प्रदिप राठोड, राहुल पाथरकर, मयुर हालनौर यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जगन्‍नाथराव कटारे, किशोर जोशी, किरण कुंडीकर, जावळेकर, उध्‍दवराव कटारे, सुभाष कटारे, अंकुश मोगल, शरद मोगल, अजय मोगल आदीसह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Saturday, February 21, 2015

वनामकृविच्‍या सेवानिवृत्‍त अधिकारी व कर्मचारी यांना अंशदान व उपदान वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सेवेतुन सन २०१३-१४२०१४-१५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांना अनुदान अभावी सेवानिवृत्‍तीनंतरचे लाभ अदा करण्‍यात आले नव्‍हते. प्रलंबित राहीलेली रक्‍कम प्राप्‍त करण्‍याबाबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व नियंत्रक श्री आप्‍पासाहेब चाटे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्‍यामुळे शासनाकडुन रू २२.५९ कोटी मंजुर करून विद्यापीठास प्राप्‍त झाले. त्‍याअनुषंगाने सन २०१३-१४२०१४-१५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्‍त झालेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांना त्‍यांच्‍या निवृत्‍ती अंशदान व उपदानाची रक्‍कम दि २० फेब्रुवारी रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते अदा करण्‍यात आली. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, नियंत्रक श्री आप्‍पासाहेब चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री जी बी ऊबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री ना ज सोनकांबळे, श्री चिंतारे, श्री सुर्यवंशी, श्री किशोर शिंदे, श्रीमती हवलदार, श्री कदम यांनी परिश्रम घेतले. 

Thursday, February 19, 2015

छत्रपतीचे विचार आजही उपयुक्‍त .........जेष्‍ट पत्रकार मा श्री अमर हबीब

वनामकृवित शिवजयंती उत्‍साहात साजरीछत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्‍या युगातही उपयुक्‍त असुन त्‍यांच्‍या विचारापासुन युवकांनी प्रेरणा घ्‍यावी, असे प्रतिपादन अंबेजोगाई येथील जेष्ट पत्रकार तथा विचारवंत मा श्री अमर हबीब यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंतीनिमित्‍त शिवशाहीचे आजचे संदर्भ या विषयावर आयोजीत व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, डॉ पी एन सत्‍वधर, माजी कुलसचिव डॉ डि ए चव्‍हाण, डॉ दिलीप मोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जेष्‍ट पत्रकार मा श्री अमर हबीब पुढे म्‍हणाले की, छत्रपती उच्‍चतम प्रशासक व सयंमी व्‍यक्‍तीमत्‍व होते. समाजातील प्रत्‍येक घटकांचा विचार ते करीत, अत्‍यंत महत्‍वाचा घटक म्‍हणुन शेतक-यांचा आदर करीत. छत्रपतींनी शेतक-यांची जमीन मोजण्‍याची पध्‍दत विकसीत केली होती व उत्‍पादनावर आधारीत शेतसारा देण्‍याची पध्‍दतीचा प्रारंभ त्‍यांनी केला. कोणावरही अन्‍याय व अत्‍याचार होणार नाही यासाठी महाराज विशेष लक्ष देत असत, सध्‍या राष्‍ट्रीय अखंडतेसाठी देशात सामाजिक एकोप्‍याचे प्रयत्‍न मोठया प्रमाणात होत असुन छत्रपतीचे स्‍वराज्‍य हे आपल्‍या समोरील एक आदर्श आहे. त्‍यांचे विचार सद्य: स्थितीतही उपयुक्‍त असुन ते आचरणात आणणे आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेची ढोलताशाच्‍या गजरात विद्यापीठाच्‍या वतीने शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

राजा शिवछत्रपती हे लोककल्याणकारी राजे होते ........ डॉ.अशोक ढवन

‘गड आला पण सिंह गेला’ ही एकांकिका सादर करतांना कृषी आभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यी
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले होते, सर्वसामान्याच्या कल्याणासाठी रयतेचे राज्य निर्माण करणारे ते लोककल्याणकारी राजे होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी कृषी आभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके हे होते.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके अध्यक्षीय भाषणात म्‍हणाले की, शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचे कार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष्य प्रा.विवेकानंद भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना पवार व राजेंद्र पवार यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ घोडके यांनी केले.
प्रारंभीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अक्षय ढाकणे आणि उमेश पवार यांनी स्वागतगीत तर प्रशांत अटकळ याने शिवगीत गायिले. ‘गड आला पण सिंह गेला’ ही एकांकिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थी प्रतिनिधी गोविंद फुलारी, स्नेहा कांबळे, अजय सातपुते, जान्हवी जोशी, देविका वल्खंडे, अश्विनी पवार, महेश लोंढे आणि विश्वास कदम यांनीही आपले विचार मांडले.  याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी, प्रा. मधुकर मोरे, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री.फाजगे आदींसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, February 17, 2015

रेशीम उद्योग देऊ शकतो शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य ........ माजी कुलगुरू मा डॉ एस एन पुरी

वनामकृवित शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादनयावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
मार्गदर्शन करतांना डॉ एस एन पुरी
मार्गदर्शन करतांन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
परभणी: देशात विविध पीकांची उत्‍पादकता वाढली, परंतु त्‍यातुलनेत शेतक-यांची उत्‍पन्‍नात वाढ झाली नाही. शेतक-यांचे निव्‍वळ नफा वाढीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, यासाठी शेती क्षेत्रात विविधता आणावी लागेल. रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील बेरोजगारांना गाव स्‍तरावर रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यावी प्रचंड क्षमता या उद्योगात असुन शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्यता देण्‍याची क्षमता यात आहे, असे प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रिय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्र व किडकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ते २४ फेब्रवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन त्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि १७ फेब्रवारी रोजी माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेरेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरेम्‍हैसुर येथील केद्रिंय रेशीम संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ एस एम एच कादरीकुलसचिव डॉ डि एल जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले, परळी येथील रेशीम उद्योजक श्री डि पी मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी पुढे म्‍हणाले की, शेतमालाला भाव मिळण्‍यासाठी शेतक-यांनीही शेतमालाच्‍या विक्रीचे तंत्र अवगत करावे. तसेच कृ‍षी पदवीधरांनी शेतमालाच्‍या बाजारपेठेत उतरावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले की, बदलते हवामान, पारंपारिक पीक उत्‍पादनात अनिश्चितता, वाढता उत्‍पादन खर्च आदी राज्‍यातील शेतीपुढे अनेक समस्‍या असुन राज्‍यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक आहे. राज्‍यात रेशीम उद्योगाचे क्षेत्र विस्‍तारत असुन रेशीम उत्‍पादनात श्रम सुलभतेसाठी शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे.  
रेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, रेशीम उद्योग हा कमी कालावधीचा उद्योग असल्याने एका वर्षात शेतकरी सहा ते आठ वेळेस उत्‍पादन घेता येते, जे पारंपारिक पिक पध्‍दतीत शक्‍य होत नाही. हा उद्योग ग्रामीण भागातील लोकांचा शहराकडे जाणारा लोंढा कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे.
बायहोल्‍टाईन संकरीत कोष उत्‍पादनाबाबत प्रशिक्षण देणारे राज्‍यातील हे पहिलेच प्रशिक्षण असल्‍याचे प्रशिक्षण समन्‍वयक डॉ सी बी लटपटे यांनी प्रास्‍ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्‍वयक डॉ पी आर झंवर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ धीरज कदम, डॉ डि डि पटाईत, डॉ ए जी बडगुजर, डॉ के टी जाधव, आर बी तुरे, जे एन जवडेकर, बालासाहेब गोंधळकर तसेच आठव्‍या सत्रातील वि‍द्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सदरिल आठ दिवस चालणा-या प्रशिक्षणात राज्‍याचा कृषि विभागातील व कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांना शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करण्‍यात येणार असुन प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षिकामार्फत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
मान्‍यवरांसोबत प्रशिक्षणार्थी

Sunday, February 15, 2015

मौजे. बाभळगाव येथील वनामकृविच्‍या कीड व्‍यवस्‍थापनावरील शेतीदिनास उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे राष्‍ट्रीय कृषि विकास योजनांर्तगत मौजे बाभळगाव (ता.जि.परभणी) येथे  दि. ७ फेब्रुवारी रेाजी कीड व्‍यवस्‍थापनावर शेतीदिनाचे आयोजित करण्‍यात आले होते. या शेतीदिनामध्‍ये विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आनंद गोरे, कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. धिरज कदम, कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी डी.टी. सामाले यांची उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनांर्तगत मौजे बाभळगाव येथे हरभरा व रब्‍बी ज्‍वारीचे प्रात्‍यक्षीके घेण्‍यात आलेले असुन सदरिल प्रात्‍यक्षीकच्‍या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. हरभरा पीक हे घाटे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत असुन या अवस्‍थेत शेतक-यांनी कीड व्‍यवस्‍थापनाबाबत डॉ. धिरज कदम मार्गदर्शन केले तर डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी पीकातील पाणी व्‍यवस्‍थापन यावर माहिती सांगितली. तसेच डी.टी. सामाले यांनीही शेतक-यांना सध्‍याच्‍या दुष्‍काळ परिस्थिीतीत निराश न होता काम करावे व कृषि विभागाच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर जाधव यांनी केले व कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मांडवगडे, इंद्रजीत खटींग, दगडोबा पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सरपंच विठठल पारधे तसेच शेतकरी माऊली पारधे, उत्‍तम दळवे, कैलास उमाळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

वनामकृवित ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्र व किडकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ते २४ फेब्रवारी दरम्‍यान करण्‍यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि १७ फेब्रवारी रोजी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात होणार असुन इम्‍फाळ येथील केंद्रिय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, रेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे, म्‍हैसुर येथील केद्रिंय रेशीम संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ एस एम एच कादरी, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्‍याचा कृषि विभागातील व कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांना शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे, असे प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ सी बी लटपटे व सहसमन्‍वयक डॉ पी आर झंवर यांनी कळविले आहे. 

Saturday, February 14, 2015

मौजे उजळअंबा (ता.जि.परभणी) येथे ‘उमेद’ उपक्रमांतर्गत कार्यक्रम संपन्‍न

प्रभारीफेरी प्रसंगी
मराठवाडयातील शेतक-यांना सद्य दुष्‍काळस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेतून व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली ‘उमेद’ उपक्रम राबविण्‍यात येत असुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दि. ७ फेब्रुवारी रोजी मौजे उजळअंबा (ता.जि.परभणी) येथे ‘उमेद’ उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान प्रसार व उमेद निर्मीती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. धीरज कदम, मंडळ कृषि अधिकारी डी.टी.सामाले, मुख्‍याध्‍यापक जे.बी. देवकते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. आनंद गोरे म्‍हणाले की, सद्यस्थितीत रब्‍बी हंगामात हलक्‍या कोळपण्‍या करुन भेगा बुजवणे, संरक्षित सिंचन देणे, एक आड एक सरी पध्‍दतीने पाणी देणे, आच्‍छादनाचा वापर, खते जमिनीतुन न देता पोटॅशियम नायट्रेट 0.5 टक्‍के किंवा म्‍युरेट ऑफ पोटॅश  या खतांची फवारणी करावी. सदयस्थित रब्‍बी पिकांमध्‍ये कीड व्‍यवस्‍थापनाबाबत शास्‍त्रज्ञ डॉ. धिरज कदम यांनी मागर्शन केले. रब्‍बी ज्‍वार पिकामध्‍ये मावा किडींच्‍या नियंत्रणासाठी डायमिथेाएट 10 मि.ली. किंवा इमीडाक्‍लोप्रिड 7.5 मिली प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच हरभरा पिकात घाटेअळीसाठी प्राथमिक अवस्‍थेत निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्‍यानंतर क्विनॉलफॉस किंवा क्‍लोरोपायरीफॉस 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. अधिक प्रादुर्भाव आढळुन आल्‍यास इमामेक्‍टीन बेंनझाएट 4 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. मंडळ कृषी अधिकारी डी.टी.सामाले यांनी शेतक-यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले.
याप्रसंगी गटचर्चेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांशी संवाद साधुन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. समाधानकारक पाऊस न झाल्‍यामुळे रब्‍बी हंगामातील पेरा कमी असुन रब्‍बी पिकांचे व्‍यवस्‍थापन, फळबागेचे व्‍यवस्‍थापन, चारापिकांचे नियोजन यावर तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यात आले. दिर्घकालीन उपायांमध्‍ये मृद व जलसंधारण, विहिर पुर्नभरण, कुपनलीका पुर्नभरण, शेततळे, योग्‍य पीक पध्‍दती, कृषि जोडधंदे व एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब गटशेतीच्‍या माध्‍यमातुन करावा असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्‍यात आले.
प्रारंभी जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थीच्‍या सहकार्याने गावात प्रभातफेरी काढुन शेतक-यामध्‍ये उमेद निर्मीतीसाठी जागर करण्‍यात आला. कार्यक्रमास सरपंच राम मोगले, मोगले विष्‍णु, रामराव गोरे, तानाजी कांबळे, साहेबराव गिरी आदीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मांडवगडे, इंद्रजीत खटींग, दगडोबा पाटील, एम. डी. गायकवाड, जी. आर. खान, विलास गिरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थिती होते.

Thursday, February 12, 2015

शेती समस्यांच्‍या निराकरणासाठी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु

हिंगोली जिल्हयातील सापटगाव (ता. सेनगावयेथे उमेद कार्यक्रम
प्रभातफेरीच्‍या प्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदीं 
शालेय विद्यार्थ्‍यानी शेतकरी नृत्‍य सादर केले त्‍यावेळी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदी
अनिश्चित हवामान व कमी पर्जन्यमानामुळे बदललेल्या परिस्थितीला शेतक-यांनी धैर्याने तोंड दयावे. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या विविध शेती समस्यांच्या निराकरणासाठी सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी.व्यंकटेश्‍वरलु यांनी केले.
   पर‍भणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हिंगोली जिल्हातील सापटगाव (ता. सेनगावयेथे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी उमेद कार्यक्रमाचे दि ११ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेसहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडकेसरपंच नामदेवराव अवचारतालुका कृषी अधिकारी रवी हरणे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके, प्रा. राजेश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेतीतील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतीपूरक व्यवसाय करावेत म्‍हणजे आर्थिक स्‍थैर्य येईल. विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, पीक उत्‍पादन वाढीसाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा वापर करावा, यामुळे पीक उत्‍पादन खर्च कमी होऊन अपेक्षित उत्‍पादन प्राप्‍त होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, ज्यांनी पावलोपावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना आनंदी ठेवू शकतो. शेतकरी बांधवाना प्रोत्साहन देण्याचे कार्य उमेद कार्यक्रमाच्‍या माध्यमातून विद्यापीठ करीत असल्‍याचे सांगितले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी दुःखद विवंचनेतून मुक्त व्हावे याकरिता प्रा. जयप्रकाश पाटील गोरेगावकर यांनी ह्रदयस्पर्शी ग्रामगीत सादर केले. 
तांत्रिक चर्चासत्रात कोरडवाहू शेतीकरिता उपयुक्त अशा जलसंधारण सरीआंतरपिक पध्‍दतीबीबीएफ लागवड, विहीर पुर्नभरणशेततळे व संरक्षित सिंचन, हळद व डाळींब लागवड, अपारंपरिक उर्जा व सौर फवारणी यंत्रे आदींवर डॉ. आनंद गोरे, प्रा. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, श्री. संजय पवार, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. संदीप पायाळ यांनी मार्गदर्शन केले व शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या तंत्रज्ञानाबाबत प्रश्‍नांना व समस्‍यांना कृषि शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली.
कार्यक्रमाची प्रारंभी जिल्हा परिषदेच्‍या शाळेतील विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवकांची गावातून प्रभातफेरी काढून जागर करण्यात आला. विशेष म्‍हणजे शाळेचे मुख्याधापक व सर्व शिक्षक मार्गदर्शनाखाली प्रभातफेरीत सर्व शालेय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या पोशाखात सहभागी नोंदविला होता. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मनमोहक असे शेतकरी नृत्यही  सादर केले. महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी प्रा. मधुकर मोरे लिखित मृद व जलसंधारणावरीलपथनाट्य सादर करून शेतकरी बांधवाना पाण्याच्या सुयोग्य वापराने पाणलोट क्षेत्रविकासाचे तंत्र शिकविले. प्रक्षेत्र पाहणीच्या अंतर्गत प्रगतशील शेतकरी गजानन अवचार यांच्या शेतावर खडकाळ जमिनीत वाढविलेल्या डाळिंब बागेची पाहणी मान्‍यवरांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गोपाल शिंदे यांनी केले. कार्यक्रमास सापटगावं व परिसरातील गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यार्थी कल्पना भोसले, पूजा सस्ते, देविका बलखंडे, कोमल गाडेकर, ऐश्वर्या देवकाते, गोविंद फुलारी, सुयोग खोसे, महेश देशमुख, प्रसाद वारे, सुशांत वान्नाले, राहुल तांबे, संतोष कुरे, शंकर जवळकर, प्रीतीश पवार, अमृत मुडके आदींनी परिश्रम घेतले.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
प्रभातफेरी प्रसंगी 

गृहविज्ञान महाविद्यालयच्‍या एलपीपी स्‍कुलचा टॅलेन्‍ट शो संपन्‍न


उत्‍कृष्‍ट सेवेबाबत शिक्षिका संध्‍या चौधरी हीचा पारितोषिक देऊन सन्‍मान करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम, प्रा विना भालेराव


सौजन्‍य - गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी

Wednesday, February 11, 2015

गृहविज्ञान महाविद्यालयाचा नृसिंह पोखर्णी येथे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रजान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. ४ ते  ७ फेब्रुवारी दरम्‍यान नृसिंह पोखर्णी येथे शेतकरी महिलांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी आर्थिक सक्षमीकरण याविषयावर चार दिवसीय विनामूल्‍य प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्‍हाधिकाकरी मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला तर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी या प्रशिक्षणास शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या. महिलांनी पैशांची बचत करणे व स्‍वत: अर्थाजन करुण कुटूंबाचे जीवनमान उंचावणे हा मुख्‍य उद्देश प्रशिक्षणाचा होता. प्रशिक्षणात मातांनी बालकांची काळजी घेणे, बांधणी तंत्र वापरुन कपडा रंगविण्‍याची कला, शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, पुष्‍पगुच्‍छ, पुष्‍पगालीचा तयार करणे, रिबनपासून बॅजेस तयार करणे इ. विषयी प्रात्‍यक्षीकासह मार्गदर्शन करण्‍यात आले. प्रशिक्षणात पन्‍नासचं शेतकरी महिलांनी नोंदणी करून त्‍यापेक्षा जास्‍त महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रात्‍यक्षिके देऊन माहिती दिल्‍यामुळे ज्ञान व कौशल्‍य वृध्दिंगत झाल्‍याचे मनोगत प्रशिक्षणार्थींनी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रशिक्षणाचे प्रशस्‍तीपत्र प्राचार्या प्रा. विशाला पटनम, सरपंच मदनराव वाघ, उपसरपंच शेषेराव वाघ यांच्‍या हस्‍ते वितरीत करण्‍यात आली. कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्या विशाला पटनम व श्री मारेाती चपळे प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) हे होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा.निता गायकवाड, डॉ.जयश्री झेंड, संगीता नाईक, रेश्‍मा शेख, मंजुषा रेवणवार आदींनी परिश्रम घेतले.

स्वच्छ भारत अभियानातंर्गत कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसर केला स्वच्छ

वनामकृविच्‍या मोठा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनातर्गत काढण्‍यात आलेल्‍या जनजागृती रॅलीस हिरवा झेंडा दाखवीतांना जिल्‍हाधिकारी मा श्री संभाजी झावरे, महापौर सौ सं‍गिताताई वडकर, आयुक्‍त मा श्री अभय महाजन, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनातर्गत आयोजीत कार्यक्रमात स्‍वच्‍छतेचा संदेश देतांना जिल्‍हाधिकारी मा श्री संभाजी झावरे, महापौर सौ सं‍गिताताई वडकर, आयुक्‍त मा श्री अभय महाजन, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, श्री दिपक पुजारी, रणजित पाटील आदी
बस स्‍थानकावर स्‍वच्‍छता मोहिम राबवितांना 
परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन कुरूगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेने दि ११ फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्‍य गर्दीचे सार्वजनिक ठिकाणे जसे रेल्‍वे स्‍टेशन व बस स्‍थानक परिसरात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. या स्‍वच्‍छता मोहिमेचे उद्घाटन परभणीचे जिल्‍हाधिकारी मा. श्री संभाजीराव झावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रमुख पाहुण्‍या म्‍हणुन परभणीच्‍या महापौर मा सौ संगिताताई वडकर तर अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक मा डॉ अशोक ढवण हे होते. मनपाचे आयुक्‍त मा श्री अभय महाजन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव, उपजिल्‍हाधिकारी सुभाष शिंदे, उपायुक्‍त दिपक पुजारी, उपायुक्‍त रणजीत पाटील, कृषि म‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ उदय खोडके, डॉ ए एस कदम, डॉ सत्‍वधर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी स्‍वच्‍छतेचा संदेश देतांना जिल्‍हाधिकारी मा श्री संभाजी झावरे म्‍हणाले की, जिल्‍हा प्रशासन, नागरिक, विद्यार्थ्‍यी या सर्वांच्‍या मदतीने परिसर स्‍वच्‍छतेचे स्‍वप्‍न पुर्ण करू शकतो, स्‍वच्छतेची ही मोहिम चळवळ बनली पाहिजे. महापौर मा सौ संगिताताई वडकर म्‍हणाल्‍या की, विद्यापीठाने राबविलेल्‍या स्‍वच्‍छता मोहिम ही एक प्रतीकात्‍मक असुन यापासुन शहरातील नागरिक प्रेरणा घेऊन शहर स्‍वच्‍छतेत सहभाग घेतील.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना म्‍हणाले कीविद्यार्थी–विद्यार्थीनीनी विद्यापीठ परिसरासोबतच शहरातील मुख्‍य ठिकाणाची परिसर स्‍वच्‍छता मोहिम हाती घेऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे तर स्‍वच्‍छतेसाठी सातत्‍याने जनजागृती होणे गरजेचे असुन प्रत्‍येक नागरिकांनी स्‍वच्‍छतेच्‍या मोहिमेत छोटा का असेना सहभाग दयावा, असे आवाहन मनपाचे आयुक्‍त मा श्री अभय महाजन यांनी केले. परिसर स्‍वच्‍छता हे सर्वांचे कर्तव्‍य असल्‍याचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी स्‍वच्‍छतेची मोहिम तळागाळात पोहचण्‍यासाठी विद्यापीठाने हा कार्यक्रम घेतल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रेल्‍वेचे देविदास भिसे, बसचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, विभाग प्रमुख डॉ बी आर पवार, डॉ जी एम वाघमारेडॉ बी व्‍ही आसेवार, डॉ के टी आपेट, डॉ पी आर झंवर, डॉ राकेश आहिरेराष्‍ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ आशिष बागडे व रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा व्‍ही बी जाधव, डॉ के डि नवगिरे, डॉ विशाल अवसरमल, प्रा गुळभीले, प्रा राठोड, प्रा चव्‍हाण, डॉ आशा शेळके आदींच्‍या यांच्‍या मार्गदर्शनाखाली साधारणत: ६०० विदयार्थ्‍यां-विद्यार्थ्‍यीनींनी परिश्रम घेतले.
मार्गदर्शन करतांना महापौर मा सौ संगिताताई वडकर
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण
रेल्‍वे स्‍थानकावर स्‍वच्‍छता मोहिम राबवितांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, महापौर सौ संगिताताई वडकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदीTuesday, February 10, 2015

गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देणा-या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा......कुलसचिव डॉ डि एल जाधव

वनामकृविचा उमेद कार्यक्रमास माळसोन्‍ना येथे मोठा प्रतिसाद
मौजे माळसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डि एल जाधव, व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच मधुकरराव लाड, प्रल्‍हाद लाड, डॉ राकेश आहीरे, आर एन शिंदे आदी
मौजे मालसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले
परभणी : नैसर्गिक कारणासह शेतीतील वाढता खर्च व शेतमालाला कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देण्‍यारे तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी केले.
मराठवाडयात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला असुन शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्‍यासाठी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने ‘उमेद’ उपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन या उपक्रमातंर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १० फेब्रुवारी रोजी माळसोन्‍ना येथे कार्यक्रम घेण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले तर जल व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ ए एस कडाळे, गांवचे सरपंच मधुकरराव लाड, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, मुख्‍याध्‍यापक आर एन शिंदे, प्रल्‍हाद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ डि एल जाधव पुढे म्‍हणाले, की मानवाचे आयुष्‍य हे अमुल्‍य असुन शेतक-यांनी मित्राशी व कुटुबातील सदस्‍याशी संवाद साधल्‍यास मनातील दु:खाचे मळभ दुर होतील. अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले, की शेतक-यांनी एकाच पीकाच्‍या मागे न लागता, या भागातील हवामान व जमिनीचा अभ्‍यास करून पीकांची निवड करावी. बाजारात भाव असेल तेव्‍हा बाजारात शेतमाला विक्रीसाठी आणण्‍याची एैपत जेव्‍हा शेतक-यांत येईल, तेव्‍हाच शेतक-यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. जल व्‍यवस्‍थापन शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांनी आपल्‍या भाषणात मुलस्‍थानी जलसंधारण, शेततळे, शेतीची बांधबंदिस्‍ती आदी विषयावर मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे व आभार प्रदर्शन गोविंद लाड यांनी केले. मुख्‍याध्‍यापक श्री आर एन शिंदे यांच्‍या सहकार्याने शाळेच्‍या विद्यार्थ्‍याची गावात प्रभातफेरी काढुण जागर करण्‍यात आला. कार्यक्रमास गांवातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी तुकाराम दहे, चद्रशेखर नखाते, कृषि अधिकारी बी पी घोगाळे, ग्रामसेवक श्री चिलगर, कृषि सहायक श्री मानोलीकर, तलाठी श्री झिंगे, उपसरपंच बालासाहेब पुर्णे, केशवराव चव्‍हाण, माणिक चव्‍हाण, मुजांजी लाड, आनंद लाड, कृषि विस्‍तार विभागाचे विद्यार्थी यांनी सहाकार्य केले. 
गावातुन प्रभारफेरी काढण्‍यात आली त्‍याप्रसंगी