वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील संकरित गो
पैदास प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर 15 एकर चारापीक प्रक्षेत्र विकसित करण्यात
आलेले आहे. या प्रक्षेत्रावर बहुवार्षीक संकरित नेपीअर गवत, जयवंत, गुणवंत, डीएचएन-6,
बीएनएच-10, सीओबीएन-5 व आयजीएफआरआय-7 तसेच पॅराग्रॉस, दशरथ, बहुवार्षी ज्वारी,
सीओएफएस-327, ल्युसर्न आदी चारापिके मोठया प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत बहुवार्षीक संकरित नेपीअर, पॅराग्रॉस, दशरथ आदी चारापिकांचे बेणे विक्रीसाठी
उपलब्ध आहेत. सदरिल प्रक्षेत्राचा विकास संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. विक्रीसाठी डॉ दिनेंशसिंग चौव्हाण मोबाईल
क्रमांक 942317175 किंवा श्री दुधाटे 7588082119 यांच्याशी सपर्क साधवा.