खरेदीसाठी
शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
मराठवाड्यातील पशुपालकांची मोठया प्रमाणात असलेल्या गरज लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील संकरीत
गो पैदास प्रकल्प प्रक्षेत्रावर पंधरा एकर क्षेत्रावर सुधारीत चारापिकांची लागवड करण्यात आलेली आहे. कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते दि. १६ जुलै रोजी चारापिकांच्या
ठोबांचा पुरवठ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संशोधन
संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार अधिकारी (पशुसंवर्धन) डॉ. कनले, वरिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह
चौहान, डॉ. अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत दोन लक्ष ठोंबाचा परभणी जिल्हा
परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास पुरवठा करण्यात आला असुन सन २०१८-१९ मध्ये एकुण २५ लक्ष
ठोंबाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, मराठवाडयात दुग्धव्यवसायास मोठा वाव असुन चारापिकांची कमतरता ही पशुपालकांसमोर मुख्य समस्या आहे. दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या दर्जेदार सुधारित चारापिकांच्या ठोंबाची पशुपालकांनी लागवडीसाठी उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर सतरा बहुवार्षिक व दहा हंगामी चारापिकांची ठोंबे नाममात्र दरात विक्रीसाठी उपलब्ध असुन सद्यस्थिती व हवामानचारापिकांच्या लागवडीस अत्यंत उपयुक्त आहे.

सद्यस्थितीत संकरीत गो पैदास
प्रकल्प येथील पंधरा एकर क्षेत्रावर बहुवार्षिक संकरीत नेपीयर गवताच्या जयवंत, गुणवंत, संपदा (डीएचएन-६), बीएनएच-१०, आयजीएफआरआय-७, सीओबीएन-५ इत्यादी चारापिकांच्या जाती उपलब्ध असुन पॅराग्रास, दशरथ, बहुवार्षिक ज्वार ही चारापिके
विक्रीस उपलब्ध आहेत.