वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार
शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्र व
महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद
येथील पैठण रोड वरील कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर महिला शेतकरी मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. सदरिल मेळाव्याचे उदघाटन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा मा. अॅड श्रीमती देवयानीताई डोणगांवकर यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख
अतिथी म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती पवनीत कौर या उपस्थित राहणार
आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार असुन कोल्हापुर
येथील स्वंयमसिध्दा संस्थेच्या संचालिका मा. श्रीमती कांचनताई परूळेकर या
विशेष मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्त्रज्ञ
महिला शेतक-यांना उपयुक्त कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी सदरिल
मेळाव्यास जास्तीत जास्त महिला शेतकरी व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे
आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या
प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत
देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री टी एस मोटे, कार्यक्रम समन्वयक प्रा
दिप्ती पाटगांवकर आदींनी केले आहे.