वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय येथून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेली विद्यार्थीनी कु. प्राची गट्टाणी हीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘राष्ट्रीय परीक्षा एजन्सी’ (एनटीए) द्वारे आयोजित केंद्रिय विद्यापीठातून पदव्युत्तर (गृहविज्ञान) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेमध्ये २४८ गुण प्राप्त करून देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला.
महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मंचचा तिला उपयोग झाला. कु. प्राची गट्टाणी हिने पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापासूनच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेची तयारी सुरू केली. तिला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रोत्साहन देत राहिले. तिच्या यशासाठी डॉ. वीणा भालेराव आणि प्रा. प्रियंका स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. सुनील जावळे डॉ. गोदावरी पवार, डॉ. मिर्झा यांचे मार्गदर्शन तिला लाभले. यशाबद्दल डॉ. जया बंगाळे, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. नाहीद खान, डॉ. सुनीता काळे, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. इरफान सिद्दिकी, डॉ. शंकर पुरी, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. कल्पना लहाडे, डॉ. अश्विनी बिडवे आदी कर्मचा-यांनी तिचे अभिनंदन केले.