माती परीक्षणाच्या आधारे करा खताचे व्यवस्थापन …… डॉ गजानन गडदे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी तालुक्यातील मौजे मटकहाळा येथे दिनांक २४ मे रोजी खरीप हंगामाच्या पुर्वनियोजनाच्या दृष्टीने शेतकयांसोबत फेस टु फेस मिटींग हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी शेतकयांच्या मातीपरीक्षण अहवालानुसार पिकांना खतांची मात्रा देण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी येणाया खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तुर पिकाच्या खत व्यवस्थापन, सोयाबीनचे वाण एमएयुएस-७२५, एमएयुएस-६१२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-१६२ व एमएयुएस-७१, तुर पिकाचे बिडीएन-७११, बिडीएन-७१६, गोदावरी आदी वाणाबाबत माहिती देऊन बीजप्रक्रिया, रूंद वरंबा सरी पद्धत, आंतरमशागत, तणनाशके, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, शंखी गोगलगाय आदी विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने प्रकाशित केलेले सोयाबीन व तुर पिकाची घडीपत्रिका शेतकयांना वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिलायंस फाऊंडेशनचे श्री रामा राऊत, मनोज काळे व विद्यापीठाचे नितीन मोहिते यांनी परीश्रम घेतले.