वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि ग्लोबल विकास ट्रस्ट, ग्लोबल परळी, सिरसाळा यांच्यात दिनांक १४ जुलै रोजी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि ट्रस्टचे मुख्य विश्वस्थ मा श्री मयंक गांधी यांच्या मुख्य उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, डॉ डी एस मिश्रा, श्याम पम्मी, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, श्रीमती मिनल गांधी, ट्रस्टचे विश्वस्थ डॉ हरिशचंद्र वांगे, डॉ हिराकांत काळपांडे आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी कल्याणाकरिता परभणी कृषि विद्यापीठ शासनाचे विविध विभाग, देश – विदेशातील विविध संस्था, कृषि कंपन्या, अशासकीय संस्था यांच्याशी सामंजस्य करार करून कार्य करित आहे. सर्वांच्या सहकार्याने शेती व शेतकरी कल्याणाचे उद्दीष्टे आपण साध्य करू शकतो. माती व जल संवर्धन अत्यंत आवश्यक असुन अनियंत्रित रासायनिक किटकनाशके व खतांचा वापर टाळुन शेतीत अधिकाधिक उत्पादनापेक्षा शाश्वत उत्पादन प्राप्त करण्यावर भर दयावा लागेल. शेतीत निविष्ठांचा अधिकाधिक वापरापेक्षा योग्य प्रमाणात व कार्यक्षम वापर आवश्यक आहे.
मा श्री मयंक गांधी म्हणाले की, महाराष्ट्रातील परळी भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण पाहता, ग्लोबल विकास ट्रस्टने ग्लोबल परळी प्रकल्प सुरू केला. नैराश्यग्रस्त शेतकरी बांधवाना प्रेरणा देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता कार्य करित आहे. ट्रस्टच्या प्रयत्नामुळे आज अनेक शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. हे कार्य विद्यापीठाच्या तांत्रिक पाठबळाने पुढे नेण्यास मदत होणार आहे. कृषि विद्यापीठे ग्रामीण भागात क्रांती घडवु शकतात, असे ते म्हणाले.
सदर
सामंजस्य कराराबाबत प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ
सचिन मोरे यांनी केले. ग्लोबल विकास ट्रस्ट, ग्लोबल
परळी, सिरसाळा २०१६ पासून महाराष्ट्रात
मृदा संवर्धन, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचे कार्य करत आहे.
शेतक-यांच्या आर्थिक उन्नती करता कार्य करित असुन नैराश्यग्रस्त शेतकरी बांधवाना
प्रेरणा देण्याचे कार्य करते. विद्यापीठाकडे असलेले विविध विषयातील शास्त्रज्ञ सदर
ट्रस्ट्रच्या कृषि विषयक उपक्रमास ज्ञान
तांत्रिक पाठबळ देण्याचे कार्य करणार आहे. विशेषत: प्रशिक्षणाव्दारे क्षमता विकासावर
भर देण्यात येणार आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्याकरिता ग्लोबल
विकास ट्रस्ट्रच्या माध्यमातुन संशोधनात मदत होणार असुन सदर ट्रस्टचे कृषीकुल केंद्रात
माती विश्लेषण प्रयोगशाळा, वनस्पती पॅथॉलॉजी लॅब, मायक्रोबियल कल्चरल लॅब, फूड प्रोसेसिंग युनिट,
रेशीम उत्पादन युनिट इत्यादींच्या स्थापनेसाठी तांत्रिक मार्गदर्शन विद्यापीठ
तज्ञ करणार आहे. परळी परिसरातील शेतकरी बांधवाचा विकासाकरिता प्रयत्न केला जाणार आहे.
मराठवाडा विभागात ट्रस्ट माध्यमातुन फळबाग लागवडीची मोहिम राबविण्यात येत असुन याला
संशोधनाची जोड देण्याचे कार्य विद्यापीठ करणार आहे.