वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने कृषिरत महिला, पोषण समृद्ध खेडे हा कार्यक्रम राबविण्यात येत असुन दिनांक ०६ जुलै रोजी मौजे मुरूंबा येथे पोषणबाग निर्मितीसाठी शेतकरी महिलांना पालेभाज्या आणि फलभाज्यांच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी महिलांना पोषणबागेचे महत्व विषद करण्यात आले. सदर प्रकल्पाच्या घटक समन्वयीका डॉ. सुनीता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद देशमुख आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी स्वप्नील मगर, रुपेश रसाळ, मुक्ता झाडे यांनी परिश्रम घेतले.