वनामकृवितील स्पर्धा मंचाचा २३ वा वर्धापन दिन साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या स्पर्धा मंचाचा २३ वा वर्धापन दिन दिनांक १६ जुन रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर अप्पर पोलीस अधिक्षक मा श्री यशवंत काळे, सहाय्यक आयुक्त (जीएसटी) मा श्री धनंजय देशमुख, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, डॉ पी आर झंवर, डॉ संतोष कदम, डॉ सुरेश वाईकर, डॉ अमोल भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठातुन अनेक पदवीधर देशात व राज्यात विविध पदावर कार्य करीत आहेत. यात वैद्यनाथ वसतीगृहातील स्पर्धा मंचाची भुमिका महत्वाची आहे. स्पर्धा मंचात ग्रामीण भागातुन येणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, येथे आपणास चोवीस तास अभ्यास करता येतो, वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन केले जाते, याचा निश्चितच लाभ होतो. कठोर मेहनत व शिस्त हेच जीवनात कोणत्याही क्षेत्रात आपणास यश प्राप्त करून देते. कोणत्याही क्षेत्रात कार्य करतांना शेती आणि शेतकरी विकासात आपले योगदान दयावे, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात अप्पर पोलीस अधिक्षक मा श्री यशवंत काळे, सहाय्यक आयुक्त वस्तु सेवा व कर मा श्री धनंजय देशमुख, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, डॉ पी आर झंवर आदींनीही मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धांमंचाने वृक्ष लागवड मोहिम हाती घेतल्याचे स्पर्धामंचाचे अध्यक्ष श्री सदानंद शिराळे यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाचे विविध पदावर निवड झालेल्या ७० पेक्षा जास्त पदवीधरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिकेत बिरादार यांनी केले तर आभार पृथ्वीराज साबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन स्पर्ध मंचाच्या सदस्य विद्यार्थ्यांनी केले होते.