वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ अंतर्गत असलेल्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयात दिनांक १ जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषि दिन
साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी कृषि दिनाचे व
वृक्षलागवडीचे महत्व या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी
सांगितले की,
आजच्या
पर्यावरण संकटाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड ही केवळ एक औपचारिकता न राहता ती
प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जबाबदारीने पार पाडण्याची आवश्यकता आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या संत
तुकारामांच्या ओळी आजही आपल्या दैनंदिन जीवनात प्रकर्षाने लागू करणे गरजेचे आहे
असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास विभाग
प्रमुख प्रा.विवेकानंद भोसले, डॉ. हरीश आवारी, डॉ. रघुनाथ जायभाये, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. पंडित मुंडे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. संदीप पायाळ, डॉ. मधुकर मोरे, डॉ. रवींद्र
शिंदे,
डॉ.
प्रमोदीनी मोरे,
प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ.विशाल इंगळे, इंजी. लक्ष्मीकांत
राऊतमारे,
इंजी.
शिवणकर,
डॉ.
गजानन वसू,
डॉ.
अश्विनी गावंडे,
डॉ.
ओंकार गुप्ता,
डॉ.
अनिकेत वईकर,
डॉ. शैलजा देशवेन्ना
तसेच कर्मचारी,
विद्यार्थी
व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक
व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे
यांनी केले,
तर
आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
विद्यार्थी प्रतिनिधी समर्थ असुटकर, वरद बिनोरकर, करण खोमने, मधुरा बुचाले, कुनाल गडाख, सतेज मेटकर, किंजल मोरे तसेच मंचक डोबे, राजाराम वाघ, प्रमोद राठोड इत्यादींनी
विशेष परिश्रम घेतले.