Wednesday, September 16, 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित विविध कार्यक्रमांचे आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण; स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात सकाळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या भारतातील विलिनीकरणाच्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. या ऐतिहासिक लढ्यात मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.